Maha Vikas Aghadi Seat Sharing Updates: महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी महायुती व विरोधातील महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाची जोरदार चर्चा आहे. दोन्ही बाजूंकडून उमेदवार जाहीर केले जात असून अद्याप निश्चित असा जागावाटपाचा फॉर्म्युला काही जाहीर केला जात नाहीये. त्यामुळे दोन्ही बाजूंचं नेमकं ठरलंय काय? याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. दुसरीकडे आज काही उमेदवार अर्ज दाखल करत असताना दुसरीकडे नाराज इच्छुकांचीही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
Maharashtra Breaking News Today, 24 October 2024: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग!
राष्ट्रवादी काग्रेस ( शरद पवार ) यांच्या पक्षाकडून परंडा विधानसभेवर दावा सांगण्यात आला असून राहुल मोटे यांच्यासाठी जागा प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.
NCP Sharad Pawar Candidate List: जयंत पाटलांनी जाहीर केली उमेदवारांची यादी
कर्जत जामखेड रोहित पवार
शिरुर अशोक पवार
वडगावशेरी बापूसाहेब पठारे
मुक्ताताईनगर रोहिणी खडसे
बारामती युगेंद्र पवार
आंबेगाव देवदत्त निकम
तासगाव कवठेमहांकाळ रोहित पाटील
हडपसर प्रशांत जगताप
विधानसभा निवडणुकीतील या नव्या घडामोडीमुळे अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे.
छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता ते येत्या २८ ऑक्टोबर रोजी नांदगावमधून विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज भरणार आहेत.
मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांचा उमेदवारी अर्ज भरताना आयोजीत सभेत तावडे बोलत होते.
भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील आता मनसेचे उमेदवार
नाशिक : भाजपने तिकीट वाटपात डावलल्याने बंडाचे निशाण फडकविणारे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांना मनसेने नाशिक पश्चिम मतदार संघातून मैदानात उतरविले आहे.
राज्यातील सर्वात लक्षवेधी असणाऱ्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आमदार प्रा. राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे.
ठाण्यातील निष्ठावान शिवसैनिकांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर राजन विचारे यांचा गुरुवारी अर्ज दाखल केल्यानंतर गाऱ्हाणे घातले.
कराड : सातारा जिल्हा हा शरद पवारांचा. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्हेतर भाजपचा बालेकिल्ला झाला असल्याचा टोला लगावताना, जिल्ह्यात महायुतीचे भाजप चार, शिवसेना (शिंदे), राष्ट्रावादी (अजित पवार) पक्षाला प्रत्येकी दोन जागांचे सूत्र ठरल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी कराडमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.
सोलापूर : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सोलापूर शहर मध्य विधानसभा जागेवर काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांचा वारसदार ठरविण्यासाठी महाविकास आघाडीत चढाओढ वाढली. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप व शिवसेनेत (शिंदे) दावेदारी कायम आहे.
सोलापूर : मोहोळ राखीव विधानसभा जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यशवंत माने यांना पुनश्च दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे इच्छुकांची भाऊगर्दी झालेल्या महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीची लॉटरी कोणाला मिळणार, याची सार्वत्रिक उत्सुकता कायम आहे.
संगमनेर : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात आणि राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे या मोठ्या नेत्यांत कितीही वाद झाले तरी पुढच्या पिढीतील डॉ. जयश्री थोरात आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी अद्याप पर्यंत एकमेकांवर कधीही टीका टिप्पणी केली नव्हती.
पुणे : पुण्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सर्वच पक्षातील इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. या मतदारसंघात कोणताही आमदार सलग दोन वेळा निवडून येत नाही, हा इतिहास आहे. येथील मतदार प्रत्येक विधानसभा निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देतात.
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची पहिली यादी जाहीर करताना, पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा असलेल्या, तसेच पक्षांतर्गत आणि भाजपचा विरोध असलेल्या विद्यमान आमदारांना उमेदवारी देऊन वेगळी खेळी केली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates: डॉ. सान्वी जेठवानी यांनी तृतीयपंथी म्हणून उमेदवारीची मागणी
मनोज जरांगेंनी हा विषय मोठ्या प्रमाणावर हाती घेतला आहे. जर एका आवाजात आख्ख्या महाराष्ट्रात मुद्दा पेटत असेल, तर आम्हा तृतीयपंथीयांचादेखील मुद्दा मनोज जरांगेंनी मांडावा. जर त्यांनी तृतीयपंथीयांना उमेदवारी दिली आणि आम्हाला निवडून आणलं तर आमच्या समुदायाचं, गरीबांचं भलं होईल आणि त्यांच्या पाठिशी आम्ही कायम उभे राहू. म्हणून आम्ही उमेदवारी मागण्यासाठी आम्ही आंतरवलीत आलो आहोत - डॉ. सान्वी जेठवानी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिलेल्या विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
गोळीबार प्रकरणामुळे भाजपचे कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड तुरूंगात आहेत.
ठाणे शहर मतदार संघातून मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
गडचिरोली भाजपात असंतोषाची ठिणगी; एक मोठा गट पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत…
गडचिरोली : विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांना उमेदवारी दिल्यास भाजपमधील एक मोठा गट पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
पारंपारिक प्रचाराच्या पलीकडे जाऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जाहीर केली एआयवर आधारित नवी जाहिरात
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या समर्थकांशी संपर्क साधण्यासाठी नाविन्यपूर्ण मोहिमा राबवण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रयोग केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससह तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून पक्ष आपला राजकीय संदेश राष्ट्रवादी बळकट करत आहे. https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1849292497488314755
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: पक्षांतराच्या चर्चेवर समीर भुजबळांची प्रतिक्रिया
मनमाडच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर माझी भूमिका स्पष्ट करेन - समीर भुजबळ
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: पंकजा मुंडे धनंजय मुंडेंसह अर्ज भरण्यासाठी उपस्थित
महायुतीची यादी जवळपास जाहीर झाली आहे. धनंजय मुंडेंची सूचक म्हणून, महायुतीची नेता म्हणून आणि बहीण म्हणून मी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मी उपस्थित आहे. आम्ही पहिली यादी जाहीर केली यातून आमचा आत्मविश्वासच दिसून येतोय. लोकांमध्ये चांगल्या योजनांचा चांगला परिणाम दिसून येतोय - पंकजा मुंडे</p>
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates: धनंजय मुंडेंचा अर्ज भरण्यासाठी पंकजा मुंडेही उपस्थित राहणार
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आमदार व उमेदवार धनंजय मुंडे यांचा अर्ज भरण्यासाठी पंकजा मुंडेही उपस्थित राहणार आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024 : नांदगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीने विद्यमान आमदार सुहास कांदे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या मतदारसंघातून छगन भुजबळ यांचे सुपूत्र समीर भुजबळ इच्छुक आहेत. महत्त्वाचे म्हणजे समीर भुजबळ हे नांदगाव मतदारसंघातून लवकरच अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचीही माहिती आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान या चर्चांवर आता मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार ) नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आज दिग्गजांचे अर्ज होणार दाखल!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल होणार आहेत. गुरुपुष्यामृत योग साधून अनेक उमेदवारांनी आज अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त निवडला आहे. आज अर्ज दाखल करणाऱ्या नेत्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे, भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले हर्षवर्धन पाटील, मुंबईत अतुल भातखळकर, येवल्यात छगन भुजबळ, ठाण्यात राजन विचारे, सांगलीत जयंत पाटील, कळवा-मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाड, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील आदी नेत्यांचा समावेश आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: उमेदवारी यादीत पक्षांना ‘नऊ’ आकड्याची भुरळ
मुहूर्त पाहून शुभ कार्य करण्यात आणि मुहूर्त नसताना ते टाळण्यात राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते आघाडीवर असतात. हाच योग यंदा विधानसभेच्या निमित्ताने भाजप, मनसे आणि शिवसेनेने साधलेला दिसतो आहे. भाजपने महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीत ९९ जणांना स्थान दिले. याचा शुभ आकडा नऊ येतो. मनसे आणि शिवसेनेने मंगळवारी आपल्या प्रत्येकी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली. याचा शुभ अंकही ९ येतो. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी उमेदवारी यादीच्या निमित्ताने नऊचा योग साधल्याची चर्चा रंगली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मविआच्या फॉर्म्युल्यात १५ जागांचा हिशेबच नाही; या जागांचं नेमकं काय होणार? वडेट्टीवार म्हणतात…
महाविकास आघाडीच्या जागावाटप फॉर्म्युल्याची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. मेरिटवर फॉर्म्युला ठरल्याचं सांगताना मविआमधील तिन्ही पक्षांनी समसमान जागावाटप जाहीर केलं आहे.
महायुतीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावर सहमती झाल्याचं बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर झालं. पण गुरुवारी सकाळी वडेट्टीवार यांनी काँग्रेस १००-१०५ जागा लढवेल, असं म्हटल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
Maha Vikas Aghadi Seat Sharing Live Updates: विजय वडेट्टीवारांच्या दाव्यावर संजय राऊतांची सूचक प्रतिक्रिया
वडेट्टीवार खूप हुशार, विद्वान गृहस्थ आहेत. ते विरोधी पक्षनेते आहेत. खूप काळ त्यांनी शिवसेनेत काम केलंय. आता ते काँग्रेसचे नेते आहेत. ते मेरिटवर बोलत आहेत. त्यांचं स्वागत आहे - संजय राऊत</p>