Maha Vikas Aghadi Seat Sharing Updates: महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी महायुती व विरोधातील महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाची जोरदार चर्चा आहे. दोन्ही बाजूंकडून उमेदवार जाहीर केले जात असून अद्याप निश्चित असा जागावाटपाचा फॉर्म्युला काही जाहीर केला जात नाहीये. त्यामुळे दोन्ही बाजूंचं नेमकं ठरलंय काय? याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे. दुसरीकडे आज काही उमेदवार अर्ज दाखल करत असताना दुसरीकडे नाराज इच्छुकांचीही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Breaking News Today, 24 October 2024: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग!

10:37 (IST) 24 Oct 2024

Maha Vikas Aghadi Seat Sharing Live Updates: श्रीगोंद्याचा प्रश्न संपला आहे – संजय राऊत

बेलापूरमध्ये संदीप नाईक तासाभरापूर्वी पक्षात आले आणि त्यांना उमेदवारी दिली गेली. मग त्यांच्या पक्षाच्या वरीष्ठांवर आरोप करून चालेल का? कुणाला उमेदवारी द्यायची हा पक्षाचा प्रश्न आहे. शिंदखेड्यात राजेंद्र शिंगणे १० तासांपूर्वी पक्षात आले आणि त्यांना लगेच उमेदवारी दिली. मग काय आरोप करायचे का? नगरमध्ये निलेश लंके वेगळ्या पक्षात होते. नंतर शरद पवारांच्या पक्षात आले आणि खासदार झाले. जिंकण्याची क्षमता गृहीत धरून जागा दिल्या जातात. तिकीट ज्याला नाकारलं जातं, ते आरोप करणार. पण शक्यतो संयमानं बोललं पाहिजे. श्रीगोंद्याचा विषय संपलेला आहे. उमेदवारी न मिळालेल्यांबद्दल मला वेदना आहेत. स्पर्धेत कधीकधी ते मागे पडतात. हे दुर्दैव असतं. याचा अर्थ त्या कार्यकर्त्याचं महत्त्व कमी झालं असं मी मानत नाही. राहुल जगताप चांगले कार्यकर्ते आहेत. शरद पवारांसोबत त्यांनी निष्ठेनं काम केलं आहे. पण दुर्देवानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, असे लोक कोणत्याही पक्षाचे असोत, आमची सत्ता आल्यानंतर त्याची भरपाई केली जाईल – संजय राऊत

10:34 (IST) 24 Oct 2024

Maha Vikas Aghadi Seat Sharing Live Updates: आम्ही सेंच्युरी करू, अजून काही ओव्हर खेळायच्या बाकी आहेत – संजय राऊतांचं जागावाटपावर सूचक विधान

सांगोला, परांड्यात २०१९ ला शिवसेनेचे उमेदवार जिंकून आले आहेत. त्यावर चर्चा चालू आहे. प्रत्येक जागेवर माध्यमांमध्ये चर्चा करता येत नाही. आम्ही सेंच्युरी मारू, कारण अजून काही ओव्हर खेळायच्या शिल्लक आहेत. ८५ पर्यंत आम्ही आलोय, सेंच्युरीसाठी १५ बाकी आहेत. दोन षटकार मारले आणि एक चौकार झाला तर सेंच्युरी होईल. मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. वानखेडेवर कोण कधी सेंच्युरी मारेल सांगता येत नाही – संजय राऊत

10:32 (IST) 24 Oct 2024

Maha Vikas Aghadi Seat Sharing Live Updates: संजय राऊतांचं जागावाटपावर विधान..

२८८ जागांवर उमेदवार द्यावेच लागतील. त्यावरून एवढे प्रश्न निर्माण होण्याचं कारण नाही. मविआ २८८ जागा लढणारच आहे. काल शरद पवारांनी आम्हाला सांगितलं की साधारण ८५ जागांची बोलणी नक्की झाली आहेत तर ती जाहीर करा. उरलेल्या जागांबाबत निर्णय घ्यावाच लागेल. उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी आज सुरूवात झाली आहे. त्यामुळे फार वेळ काढून चालणार नाही. शेवटच्या क्षणी उमेदवारांची अदलाबदल होऊ शकते. ती होणं गरजेचं असतं. तीही होईल. त्यामुळे आमची बेरीज चुकली यात कशाला जायचं? महाराष्ट्रात आम्ही १७५ जागा जिंकू हीच आमची बेरीज आहे – संजय राऊत

10:20 (IST) 24 Oct 2024

Maharashtra Assembly Election 2024 Live Updates: संभाजी ब्रिगेड-मनोज जरांगे पाटील युती होणार?

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी बुधवारी रात्री उशीरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाशी युती तुटल्यानंतर संभाजी ब्रिगेड व मनोज जरांगे पाटील एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांची देवाणघेवाण, मादक द्रव्य, मद्या विक्री, तस्करी आणि हवाला यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिले आहेत

Maharashtra Breaking News Today, 24 October 2024: महायुती व महाविकास आघाडीनं विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली!