Maharashtra Politics Updates Today : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचे दोन दोन दिवस शिल्लक असतानाही महायुती आणि महाविकास आघाडीतील घोळ संपलेले नाहीत. दोन्ही आघाड्यांतील सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. बंडोबांना शांत करण्याची मोहीम पक्षांच्या नेत्यांना हाती घ्यावी लागली आहे. महायुतीतील जागावाटपाचा तिढा कायम असतानाच महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदीही चव्हाट्यावर आली आहे. तर, आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास वेग येणार आहे. काहींनी गुरुपुष्यामृत योग म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी अर्ज भरले. तर, उर्वरित आज आणि उद्यामध्ये अर्ज दाखल करतील. बारामती विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी अजित पवार आणि युगेंद्र पवार यांनी आज अर्ज दाखल केले आहेत. तर, ठाण्यात संजय केळकर, एकनाथ शिंदेा यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलंय.

आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार किती?

महाविकास आघाडी
काँग्रेस – १००
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ७६
शिवसेना (उद्धव ठाकरे) – ८४

महायुती
भाजपा – १४६
शिवेसना (एकनाथ शिंदे) – ६५
राष्ट्रवादी (अजित पवार) – ४९

Live Updates

Maharashtra Breaking News Today, 28 October 2024 : विधानसभेचा अर्ज भरण्यास सुरुवात; उरले फक्त दोन दिवस

21:30 (IST) 28 Oct 2024
विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात आठ माजी नगरसेवक, पूर्वीच्या कार्यकाळातील मिळून डझनभर नगरसेवक

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात आठ नगरसेवक आपले नशीब आजमावणार आहेत.

सविस्तर वाचा...

20:40 (IST) 28 Oct 2024
‘...तर ‘नोटा’ला मतदान’ हलबा समाज भाजप, काँग्रेसवर नाराज

नागपूर : राज्यातील २८ ते ३० विधानसभा मतदारसंघात हलबा समाजाचे मत आहे. परंतु, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून हलबा समाजाचा एकही उमेदवार दिला गेला नसल्याने हलबा समाज संतापला आहे.

सविस्तर वाचा...

20:05 (IST) 28 Oct 2024
मुंबई सेंट्रलच्या बीआयटी चाळ राहिवाशांचा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा, चाळीच्या पुनर्विकासासाठी राहिवासी एकवटले

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील बीआयटी चाळींचा पुनर्विकास बीडीडी चाळींच्या धर्तीवर करावा या मागणीसाठी चाळीतील रहिवासी एकवटले असून त्यांनी विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे.

सविस्तर वाचा...

19:40 (IST) 28 Oct 2024
अनुराधा नागवडे यांनी महाविकास आघाडी करून भरला उमेदवारी अर्ज

अनुराधा नागवडे यांनी महाविकास आघाडी करून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये आज अनुराधा नागवडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून व महाविकास आघाडी कडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष असणाऱ्या अनुराधा नागवडे व त्यांचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असणारे राजेंद्र नागवडे यांनी पदाची राजीनामे देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करत शिवबंधन बांधले. ज्या दिवशी प्रवेश केला त्याच दिवशी त्यांना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून देण्यात आले. आज उमेदवारी अर्ज भरताना ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते साजन पाचपुते राजेंद्र नागवडे यांच्यासह हजारो समर्थक उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भव्य रॅली काढण्यात आली.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये या उमेदवारीवरून मोठी बिघाडी झाल्याची देखील दिसून येते. माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून उमेदवारीची जोरदार मागणी केली होती. त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात असतानाच अचानक फेरबदल होऊन अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडी करून उमेदवारी देण्यात आल्यामुळे जगताप समर्थक नाराज असून ते आजच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनुपस्थित होते एवढेच नव्हे तर उद्या २९ तारखेला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा देखील माजी आमदार राहुल जगताप यांनी केली आहे.

19:38 (IST) 28 Oct 2024
आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नीने साध्या पद्धतीने भरला उमेदवारी अर्ज

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा बबनराव पाचपुते यांनी साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरला आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळे चिन्ह घेऊन लढवणारे आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भारतीय जनता पक्षाकडून यावेळी उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनी आज चित्रा वाघ यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरला. यावेळी विक्रमसिंह पाचपुते उपस्थित होते.

उमेदवार बदलण्यास पक्षाचा नकार

भारतीय जनता पक्षाने पहिल्याच यादीमध्ये प्रतिभा पाचपुते यांचे नाव जाहीर केले. यानंतर मुंबई येथे जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची आमदार बबनराव पाचपुते यांनी भेट घेतली व पत्नी ऐवजी मुलगा विक्रम सिंह पाचपुते याला पक्षाने उमेदवारी द्यावी अशी मागणी केली मात्र पक्षाने कोणताही बदल केला नाही प्रतिभा पाचपुते यांनाच उमेदवारी राहील असे पक्षाने सांगितले. यामुळे आज प्रतिभा पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली तरी देखील मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पाचपुते समर्थक उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रतिभा पाचपुते म्हणाल्या की, आमदार बबनराव पाचपुते हे मागील पन्नास वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे . मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे केली आहे आणि विकास हाच आमच्या खऱ्या अर्थाने प्रचाराचा व विजयासाठी प्रमुख मुद्दा आहे.

यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, प्रतिभा पाचपुते यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्यामध्ये विकास कामे आणखी करण्याची प्रतिभा आहे यामुळे त्यांचा विजय होणार आहे.

संगमनेर येथील घटनेचा निषेध

चित्रा वाघ पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, संगमनेर येथील घटना ही निश्चितच निषेधार आहे आम्ही त्यांचा निषेध करतो. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली आहे. अशा घटना समाजामध्ये घडल योग्य नाही आम्ही कधीही अशा घटनांची समर्थन करत नाही.

आरक्षण भारतीय जनता पक्ष देणार

यावेळी चित्रा वाघ म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष देणार आहे. विरोधी पक्ष कधीही मराठा समाजाला आरक्षण देणार नाही. हे जनतेला देखील माहित आहे त्यामुळे महायुती सोबतच सर्व समाज राहील असे श्रीमती वाघ म्हणाल्या.

19:16 (IST) 28 Oct 2024
धारावी प्रकल्पात मराठी माणसासाठी ७० ते ७५ टक्के घरे राखीव ठेवा, निवडणूकीच्या तोंडावर पार्ल्यातील संस्थेचा मराठीचा जाहीरनामा

मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पार्ले पंचम या संस्थेने मराठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मुंबईतील मराठी टक्का घसरत चालला असून मुंबईत घर घेणे मराठी माणसाला परवडेनासे झाले आहे.

सविस्तर वाचा...

18:41 (IST) 28 Oct 2024
मागील वीस वर्ष रत्नागिरी वनवासात गेल्याने आता जनतेला बदल हवा आहे - बाळ माने

रत्नागिरी : महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे सुरेंद्र तथा बाळ माने यांनी सोमवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना कार्यालयाबाहेर झालेल्या मेळाव्याला हजारो शिवसैनिकांसह महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) व सहकारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. मात्र नाराज उदय बने हे यावेळी अनुपस्थित राहिल्याने ठाकरे गटातील नाराजी उघड झाली.

18:36 (IST) 28 Oct 2024
आर्णी व उमरखेडमध्ये भाजपकडून विद्यमान आमदारांना डच्चू; रिपाईं (आ)चेही स्वप्न भंगले

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी व उमरखेड या दोन्ही मतदारसंघात भाजपने अखेर भाकरी फिरवली. विद्यमान आमदारांना डच्चू देवून आर्णी येथे माजी आमदार तर उमरखेडमध्ये नवीन चेहऱ्यास संधी दिली. महायुतीत उमरखेडची जागा रिपाईं (आ)ने मागितली होती. मात्र रिपाईंचेही स्वप्न भंगले.आर्णी हा अनुसूचित जमाती तर उमरखेड हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ आहे.

सविस्तर वाचा

18:35 (IST) 28 Oct 2024
उत्तर नागपूरमध्ये तिसऱ्यांदा राऊत- माने लढत

नागपूर: अनुसूचित जातीसाठी राखीव उत्तर नागपूर मतदारसंघातून माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नितीन राऊत यांच्याविरोधात भाजपने पुन्हा एकदा डॉ. मिलींद माने यांच्यावर विश्वास दाखवला आहे. डॉ. माने यांनी २०१४ मध्ये नितीन राऊत यांचा पराभव केला होता. तर २०१९ मध्ये डॉ. राऊत यांनी डॉ. मानेंना पराभूत करून वचपा काढला आहे.

सविस्तर वाचा

18:35 (IST) 28 Oct 2024
नवी मुंबईत नाईक विरोधक चक्रव्युहात

नवी मुंबई : नवी मुंबईत कोणत्याही परिस्थितीत गणेश नाईक नको असा धोशा लावत त्यांच्याविरोधात सर्वपक्षीय मोट बांधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या विरोधकांची ऐरोली विधानसभा मतदारसंघात मोठी कोंडी झाल्याचे पहायला मिळत आहे. गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसेनेने (ठाकरे) एम.के.मढवी यांना उमेदवारी दिली असून ऐरोलीतील तीन प्रभागांपुरता प्रभाव असलेल्या मढवी यांचेही राजकारणात मित्र कमी शत्रु अधिक अशी परिस्थिती आहे.

सविस्तर वाचा

18:06 (IST) 28 Oct 2024
अनुराधा नागवडे यांनी महाविकास आघाडी करून जोरदार शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

अनुराधा नागवडे यांनी महाविकास आघाडी करून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये आज अनुराधा नागवडे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून व महाविकास आघाडी कडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष असणाऱ्या अनुराधा नागवडे व त्यांचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष असणारे राजेंद्र नागवडे यांनी पदाची राजीनामे देऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करत शिवबंधन बांधले. ज्या दिवशी प्रवेश केला त्याच दिवशी त्यांना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून देण्यात आले.

आज उमेदवारी अर्ज भरताना ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते साजन पाचपुते राजेंद्र नागवडे यांच्यासह हजारो समर्थक उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भव्य रॅली काढण्यात आली. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीमध्ये या उमेदवारीवरून मोठी बिघाडी झाल्याची देखील दिसून येते. माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून उमेदवारीची जोरदार मागणी केली होती. त्यांची उमेदवारी अंतिम मानली जात असतानाच अचानक फेरबदल होऊन अनुराधा नागवडे यांना महाविकास आघाडी करून उमेदवारी देण्यात आल्यामुळे जगताप समर्थक नाराज असून ते आजच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनुपस्थित होते एवढेच नव्हे तर उद्या 29 तारखेला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा देखील माजी आमदार राहुल जगताप यांनी केली आहे.

18:04 (IST) 28 Oct 2024
स्थानिक शिवसैनिक विरोधात, मात्र कथोरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; चर्चांना उधाण, शिवसैनिक भूमिका बदलणार का याकडे लक्ष

मुरबाड विधानसभा मतदारसंघात बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आमदार किसन कथोरे यांच्या विरुद्ध बंडाचे निशाण फडकवले असतानाच सोमवारी किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील गुलदस्त्यात आहे. सविस्तर वाचा

18:02 (IST) 28 Oct 2024
ठाण्यात राजकीय पक्षांचे शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्री शिंदे, संजय केळकर, नजीब मुल्ला, केदार दिघे, संदीप पाचंगे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

वसुबारसच्या दिवसाचा मुहूर्त साधत शिवसेनेचे कोपरी पाचपखाडीतील उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे शहरातील भाजपचे उमेदवार संजय केळकर आणि कळवा-मुंब्य्रातील राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे उमेदवार नजीब मुल्ला या महायुतीच्या नेत्यांनी मिरवणुकांद्वारे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. सविस्तर वाचा

16:39 (IST) 28 Oct 2024
भोसरी विधानसभेतून महाविकास आघाडीकडून अजित गव्हाणे यांचा अर्ज दाखल; लांडगे विरुद्ध गव्हाणे असा सामना होणार

महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी दुपारी दीड वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या चरणी श्रीफळ वाढविले.  छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सविस्तर वाचा…

16:37 (IST) 28 Oct 2024
जनता माझ्या पाठीशी, शंकर जगताप, राहुल कलाटे हे माझ्यासाठी आव्हान नाही – नाना काटे

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाना काटे यांनी बंडखोरी करत जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरात दर्शन घेऊन नाना काटे यांच्या रॅलीची सुरवात झाली.

सविस्तर वाचा…

16:36 (IST) 28 Oct 2024
Maharashtra Live News : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर, सात जणांच्या यादीत कोणाला संधी?

https://twitter.com/ANI/status/1850855402457719283

16:34 (IST) 28 Oct 2024
भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते कल्याणमधील नाराजांची समजूत काढण्यास अपयशी; नरेंद्र पवार, महेश गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज दाखल

महायुती, महाविकास आघाडीचे नेते कल्याण पूर्व, पश्चिमेतील विधानसभेसाठी इच्छुक नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यास अपयशी ठरले आहेत. त्यामुळे भाजपचे नरेंद्र पवार, शिंदे शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठींकडून होणाऱ्या कारवाईची तमा न बाळगता सोमवारी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांना दाखल केले.

सविस्तर वाचा…

16:32 (IST) 28 Oct 2024
Yavatmal Vidhan Sabha Constituency: यवतमाळात महाविकास आघाडीत बंडाचे निशाण; माजी आमदार संदीप बाजोरीया यांनी भरला उमदेवारी अर्ज

Sandeep Bajoria in Yavatmal Vidhan Sabha Constituency यवतमाळ – उमेदवारीवरून महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी बिघाडी होत असताना आता यवतमाळ विधानसभा मतदारसंघाची यात भर पडली आहे. यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेश उपाध्यक्ष विधानपरिषदेचे माजी सदस्य संदीप बाजोरीया यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकविले आहे. त्यामुळे यवतमाळची लढत आता चौरंगी होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

16:08 (IST) 28 Oct 2024
Maharashtra Live News : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही भाजपाचा उमेदवार ठरला!

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत नांदेड येथून काँग्रेसचे वसंत चव्हाण निवडून आले होते. परंतु, त्यांचं अकाली निधन झाल्याने या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लागली आहे. या जागेवरून आता भाजपाने डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी दिली आहे. ते नांदेड ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत.

https://twitterx.com/BJP4Maharashtra/status/1850845664953168164

15:36 (IST) 28 Oct 2024
चिंचवड विधानसभा: डीपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात अमोल कोल्हे....;नाना काटेंचा नेमका रोख कुणाकडे?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात यशस्वी झाले आहेत. अशी टीका बंडखोर नाना काटे यांनी कोल्हे यांच्यावर केली आहे. महायुतीमधून अजित पवार गटाचे नाना काटे हे बंडखोरी करत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. खासदार अमोल कोल्हे यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर सडकून टीका केली. महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला.

15:03 (IST) 28 Oct 2024
वरोऱ्यात काँग्रेस, भाजपमध्ये बंडाचे वारे

चंद्रपूर : वरोरा मतदारसंघात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचे बंधू प्रवीण काकडे यांच्यासाठी उमेदवारी खेचून आणताच काँग्रेस तसेच धानोरकर कुटुंबात बंडाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात असून डॉ. चेतन खुटेमाटे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत.

सविस्तर वाचा

13:02 (IST) 28 Oct 2024
तिकीट वाटपात विजय वडेट्टीवार यांची खासदार धानोरकर यांच्यावर मात

चंद्रपूर: विधानसभा निवडणुकीत सहा तिकीट मीच वाटणार असे जाहीर वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात केली आहे. वडेट्टीवार चार समर्थकांना उमेदवारी मिळवून देण्यात यशस्वी झाले तर धानोरकर या केवळ स्वतःच्या भावाची उमेदवारी आणू शकल्या.

सविस्तर वाचा

13:02 (IST) 28 Oct 2024
Sangli Vidhan Sabha Constituency: वसंतदादा पाटील घराण्यात उमेदवारीवरून फुटीचे ग्रहण ?

Vasantdada Patil Family in Sangli Vidhan Sabha Constituency सांगली : राज्यात राजकीय क्षेत्रात एकेकाळी प्रबळ असलेल्या सांगलीतील वसंतदादा घराण्यात विधानसभा उमेदवारीवरून पुन्हा एकदा फुटीचे ग्रहण लागण्याची चिन्हे दिसत आहेत. दादा घराण्यातील थोरली विरूध्द धाकटी पाती असा हा संघर्ष आता नव्या वळणावर पोहचला असून लोकसभा निवडणुकीत एकसंघ दिसणारी काँग्रेस संघटना फुटीच्या उंबरठ्यावर पोहचली आहे.

सविस्तर वाचा

12:47 (IST) 28 Oct 2024
कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटलांच्या अडचणीत वाढ

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ' टेन्शन ' वाढले आहे. उमेदवारी न मिळाल्याने भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बंडखोरी करत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

12:47 (IST) 28 Oct 2024
कोल्हापुरात 'मविआ'त उमेदवारीवरून गोंधळ; दगडफेक, बंडखोरी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होताच चार मतदारसंघात बंडाचे झेंडे लागले आहेत. काही ठिकाणी नाराजी उफाळून आली आहे. कोल्हापूर उत्तर मधील उमेदवारीवरून तर जिल्हा काँग्रेस भवनावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला. यामुळे महाविकास आघाडी अंतर्गत बंडखोरांची नाराजी दूर करण्याचे कडवे आव्हान निर्माण झाले आहे.

सविस्तर वाचा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates in Marathi

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह

Maharashtra Breaking News Live Today, 28 October 2024 : विधानसभेचा अर्ज भरण्यास सुरुवात; उरले फक्त दोन दिवस

Story img Loader