Maharashtra Politics Live Updates Today : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात इच्छूक उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज भरले असून आता अर्ज मागे घेण्याकरता घोडेबाजार सुरू आहे. बंडखोरांची नाराजी थोपवण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रयत्न सुरू असून येत्या ४ तारखेला कोण अर्ज मागे घेतंय हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, दुसरीकडे प्रचार सभा अद्याप सुरू झालेल्या नसून माध्यमांना मुलाखती देण्यात येत आहेत. या मुलाखतींमधून अनेक गौप्यस्फोट, टीका टिप्पणी सुरू आहे. ऐन दिवाळीच्या काळात निवडणुकांचा महौल तयार झाल्याने सामान्य नागरीकही आता मतदानाची वाट पाहत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी आज भाजपात जाहीर प्रवेश दिला. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला आहे.

Live Updates
11:37 (IST) 31 Oct 2024
Maharashtra Live News : "सना मलिक माझी बहीण, माझी लढाई...", फहाद मलिक यांची भाजपावर टीका

सना मलिक माझी बहीण आहे. माझी तिच्याविरोधात लढाई नाही. ज्यांनी महाराष्ट्राने लुटलं, महाराष्ट्राला कमजोर केलं, हिंदूंना मुस्लिमांपासून लांब केलं अशा भाजपाविरोधात माझी लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र बनवण्याकरता आमची लढाई आहे - फहाद अहमद, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार

10:47 (IST) 31 Oct 2024
Maharashtra Live News : "...तर मी माझा पक्षच बंद करेन", 'या' मंत्र्याचं नाव ऐकताच राज ठाकरे असं का म्हणाले?

राज ठाकरे पुढचे मुख्यमंत्री बनतील असं वाटत होतं. पण ते राहिले कुठे. आठवले स्वतः मंत्री बनलेत, मग राज ठाकरे का नाही? असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, "आठवलेंसारखा मंत्री बनू? त्यापेक्षा मी पक्ष बंद करेन." ABP News ने घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते.