Maharashtra Politics Live Updates Today : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात इच्छूक उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज भरले असून आता अर्ज मागे घेण्याकरता घोडेबाजार सुरू आहे. बंडखोरांची नाराजी थोपवण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रयत्न सुरू असून येत्या ४ तारखेला कोण अर्ज मागे घेतंय हे पाहावं लागणार आहे. दरम्यान, दुसरीकडे प्रचार सभा अद्याप सुरू झालेल्या नसून माध्यमांना मुलाखती देण्यात येत आहेत. या मुलाखतींमधून अनेक गौप्यस्फोट, टीका टिप्पणी सुरू आहे. ऐन दिवाळीच्या काळात निवडणुकांचा माहौल तयार झाल्याने सामान्य नागरिकही आता मतदानाची वाट पाहत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी आज भाजपात जाहीर प्रवेश दिला. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन मतदारसंघात २१ उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणी शिवसेना विरोधात शिवसेना दोन मतदारसंघ तर एका मतदारसंघात भाजप विरोधात शिवसेना अशी लढत होईल. मात्र या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटात अधिकृत उमेदवार रिंगणात नाही. त्यामुळे काँग्रेस मतदार भगव्याला पसंती देईल अशी अपेक्षा आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुती शिवसेनेचे उमेदवार दिपक केसरकर, महाविकास आघाडी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांच्यांत लढत होईल. दरम्यान भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सौ अर्चना घारे परब यांनी बंडखोरी केली आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजप विरोधात शिवसेना अशी लढत होईल. या ठिकाणी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर रिंगणात आहेत. आमदार राणे तिसऱ्यांदा निवडणूकीस सामोरे जात आहेत.
कुडाळ विधानसभा मतदारसंघ शिवसेना विरोधात शिवसेना लढत होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात राणे पुत्र निलेश राणे शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार आहेत.
दिवाळीनिमित्त बारामतीत पवार कुटुंब एकत्र दिसणार का? या प्रश्नावर मोघम उत्तर अजित पवारांनी दिलं.
अकोला, वाशीम जिल्ह्यातील पक्ष, आघाड्यांमधील उदंड बंडामुळे मतविभाजनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पक्षांच्या अधिकृत उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
काँग्रेसने पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र लिहून महाराष्ट्राच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
Congress has again written to the Election Commission demanding the removal of Maharashtra DGP Rashmi Shukla from her post of Director General of Police (DGP), in Maharashtra. pic.twitter.com/04rhjYId2q
— ANI (@ANI) October 31, 2024
Wishing Prakash Ambedkar Ji a speedy recovery. Get Well Soon!@Prksh_Ambedkar
— Supriya Sule (@supriya_sule) October 31, 2024
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेविका भिमाबाई पोपटराव फुगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार गटात इन्कमिंग सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वीच अजित पवार गटात असणारे अजित गव्हाणे यांनी तुतारी हातात घेतली. भोसरी विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देखील मिळालेले आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातून अजित गव्हाणे यांची ताकत वाढल्याचे बोललं जात आहे.
ठाणे : दबावाखाली येऊन कुणाच्याही हातचे बाहुले बनू नये. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे आपले काम आहे. पकडून आणून कोणालाही बसविणे, हे आपले काम नाही ” असा आशयाचा मजकूर ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मुंब्रा – कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसांवर आरोप केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला हृदयविकाराचा झटका
नाशिक : विधानसभा निवडणुकीचार प्रचार आता कुठे सुरु होत असताना जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघातील शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना गुरूवारी हृदयविकाराचा झटका आला.
आम्ही पक्षचिन्ह आणि पक्षनाव ढापलेलं नाही. आम्ही शिवसेना सोडलीच नाही. आम्ही शिवसेना नावही बदललं नाही, शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेचा धनुष्यबाण आमच्याकडे नाही. आम्ही इतर पक्षात गेलो नाही, नवीन पक्ष काढला नाही. त्यामुळे ढापलेला पक्ष नाही – संजय शिरसाट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतंच विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केलं होतं. निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल आणि पुढचा मुख्यमंत्री भाजपाचा होईल, असे राज ठाकरे म्हणाले होते. या विधानावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा
पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने तिकीट कापल्यानंतर नाराज झालेले वनगा मागच्या चार दिवसांपासून आपल्या घरातून बेपत्ता झाले होते. तिकीट न मिळाल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका आणि उद्धव ठाकरेंचे कौतुक वनगा यांनी केले होते. शिंदे गटात येऊन चूक झाली, असेही ते म्हणाले होते. मात्र घरी परतल्यानंतर आता श्रीनिवास वनगा यांचे सूर बदलल्याचे दिसले. सविस्तर वृत्तसाठी क्लिक करा
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून वर्सोवा मतदारसंघात शिवसेनेला (उद्धव ठाकरे) फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) या मतदारसंघात अल्पसंख्यांक उमेदवार दिल्यामुळे पक्षातील मराठी कार्यकर्ते आणि समर्थर नाराजीचा सूर आळवू लागले आहेत. सविस्तर वाचा…
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुंब्रा – कळवा या बालेकिल्ल्याला आता शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून सुरुंग लावण्यासाठी शिवसेना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदेनी आव्हाडांच्या विरोधात उभे असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्या प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतली असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वाचा…
जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीला उधाण आले असून सिंदखेड राजा मतदारसंघात तर दोन सत्ताधारी मित्रपक्ष एकमेकांसमोर अधिकृतरित्या उभे ठाकले आहेत. यामुळे ‘मैत्रीपूर्ण लढती’ची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. सविस्तर वाचा…
जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि आमगाव देवरी या चारही मतदारसंघांत बंडखोरीचे पीक आले आहे. महायुतीला बंडखोरी शमवण्यात काही ठिकाणी यश आले असले, तरी महाविकास आघाडीची मात्र डोकेदुखी वाढली आहे. सविस्तर वाचा…
दहा वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या राजकारणाची ओहोटी सुरू झाली. सविस्तर वाचा…
Balasaheb Ambedkar was admitted to a hospital in Pune in the early hours of Thursday morning, October 31, for a chest pain.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 31, 2024
Balasaheb Ambedkar is being treated at the ICU for a blood clot in his heart. ??? ??????? ????????? ?? ?????? and ?? ????…
? स. ११.४४ वा. | ३१-१०-२०२४?मुंबई.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 31, 2024
LIVE | पत्रकार परिषद#MaharashtraElection2024 #Mumbai #MahaYuti https://t.co/KtUe786jWD
Here I am submitting my resignation from @INCIndia party after serving the party for 44 years… pic.twitter.com/3e02roPJzH
— Ravi Raja (@raviraja60) October 31, 2024
सना मलिक माझी बहीण आहे. माझी तिच्याविरोधात लढाई नाही. ज्यांनी महाराष्ट्राने लुटलं, महाराष्ट्राला कमजोर केलं, हिंदूंना मुस्लिमांपासून लांब केलं अशा भाजपाविरोधात माझी लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र बनवण्याकरता आमची लढाई आहे – फहाद अहमद, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार
राज ठाकरे पुढचे मुख्यमंत्री बनतील असं वाटत होतं. पण ते राहिले कुठे. आठवले स्वतः मंत्री बनलेत, मग राज ठाकरे का नाही? असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, “आठवलेंसारखा मंत्री बनू? त्यापेक्षा मी पक्ष बंद करेन.” ABP News ने घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते.