Maharashtra Vidhan Sabha Election Updates: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप व खोचक टोलेबाजीही पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे मनसे, वंचित बहुजन आघाडी व इतर अपक्षांमुळे अनेक मतदारसंघांमध्ये निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण चांगलंच तापलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today, 14 November 2024: विधानसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या अपडेट्स!

11:24 (IST) 14 Nov 2024

आमदारकीच्या ३५ वर्षांत पाणी न आणणाऱ्यांकडून उपोषणाचे ढोंग, रोहित पाटील यांच्यावर टीका

सांगली : दीड दिवसाचे उपोषण करून जर दुष्काळी भागाला पाणी मिळाले असेल, तर आजही काही भाग पाण्यापासून वंचित का राहिला? आमदारकीच्या ३५ वर्षांत पाणी न आणणाऱ्यांकडून हे उपोषणाचे ढोंग असल्याची टीका भाजपचे स्वप्नील पाटील यांनी रोहित पाटील यांचे नाव न घेता उपस्थित केली.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आरवडे येथे प्रचार सभेत पाटील बोलत होते. या वेळी उमेदवार श्री. पाटील यांच्यासह प्रमोद शेंडगे, सुखदेव पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

11:23 (IST) 14 Nov 2024

माजी आमदार शिवशरण पाटील यांची ‘घरवापसी’

सोलापूर : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू असताना सोलापुरात माजी आमदार शिवशरण पाटील-बिराजदार यांनी भाजपचा राजीनामा देऊन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात ‘घरवापसी’ केली आहे.

निवडणूक प्रचारासाठी सोलापुरात आलेले उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवशरण पाटील-बिराजदार यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या हाताच्या मनगटावर ठाकरे यांनी शिवबंधन बांधले. यावेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

11:23 (IST) 14 Nov 2024

अतिरेक्यांच्या बॅगा तपासल्या असत्या तर पुलवामा घडले नसते, दिलीप सोपल यांची टीका

सोलापूर : जर अतिरेक्यांच्या बॅगा तपासल्या असत्या तर पुलवामा घडले नसते. दहशतवादी हल्ला टळला जाऊन ४० जवान शहीद झाले नसते, अशी टीका बार्शीतील ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांनी सभेत बोलताना केली आहे.

विधानसभा निवडणुकीत नेत्यांच्या बॅगा तपासण्याच्या घटनांचा संदर्भ देत सोपल यांनी ही टीका केली. सोपल म्हणाले, की बॅगा तपासण्याची एवढी सतर्कता पाच वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये दाखवली गेली असती तर तेथील पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला नसता. स्फोटके भरलेल्या बॅगा वाहून आलेल्या गाड्या तपासल्या नाहीत. त्यामुळेच दहशतवादी हल्ला होऊन त्यात केंद्रीय राखीव दलाचे ४० जवान शहीद झाले. मोदी सरकारचे हे अपयश असल्याची टीका सोपल यांनी केली.

11:22 (IST) 14 Nov 2024

कोल्हापुरात प्रचाराचा मुद्दा पोहोचला पोलिसांपर्यंत

कोल्हापूर : ‘लाडकी बहीण योजने’बाबत वादग्रस्त विधान झाल्यानंतर आता हा मुद्दा पोलीस – जिल्हा प्रशासनापर्यंत पोहचला आहे. महिलांना धमकावण्याप्रकरणी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर पोलीस व निवडणूक आयोगाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी केली आहे. तर, खासदार महाडिक यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अलका लांबा यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भाजप महिला मोर्चाने पोलिसांकडे केली आहे.

लांबा यांनी याबाबतचे निवेदन जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिले. फुलेवाडी येथील प्रचार सभेत खासदार महाडिक यांनी महिलांना दमदाटीची भाषा केली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या प्रचार सभेत दिसल्या, की त्यांचे फोटो काढा, त्यांची व्यवस्था केली जाईल, असे विधान केले होते. हा महिलांना धमकाविण्याचा प्रकार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

11:21 (IST) 14 Nov 2024

जातीय मुद्यांशिवाय निवडणुका लढवाव्यात – सुप्रिया श्रीनेत

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या निवडणुकीत शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिला सुरक्षा हे विषय बाजूला ठेवून भाजप केवळ जाती धर्माचे राजकारण करत आहे. या मुद्द्यांशिवाय भाजपनं निवडणुका लढवून दाखवाव्यात, असे आव्हान काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिले.

11:20 (IST) 14 Nov 2024

काँग्रेसचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या कारला अपघात

राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांच्या कारला एका ट्रकने धडक दिल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. सुदैवाने या अपघातामध्ये नितीन राऊता यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

वाचा सविस्तर…

11:18 (IST) 14 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election Live: धनंजय मुंडेंची शरद पवार गटावर टोलेबाजी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी शरद पवार गटावर खोचक शब्दांत टीका करताना उमेदवार निवडीवरून टोला लगावला. “दोन नाही, तीन नाही १२ जण तुतारीची उमेदवारी घ्यायला पुढे होते. उमेदवारी तर एकालाच मिळणार आहे. पण कामाला तर सगळ्यांनाच लावलं. आई, जावई, मुलगी असे सगळेच. मी त्यांच्यातल्या एका नेत्याला म्हटलं अरे लवकर फायनल करा. अचानक कराल, देणार तर एकालाच आहात. एक उमेदवारी द्याल, ११ जणांपैकी दोन-तीन जण वेडे होतील”, असं त्यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला!

लोकसभेतील मतांचे गणित विधानसभेत कायम राहणार? महायुती व मविआचे समीकरण जुळवण्याचे लक्ष्य (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Maharashtra News Today, 14 November 2024: राज्य विधानसभा निवडणुकीशी संबंधित बितंबातमी!