Maharashtra Breaking News Live Updates, 23 October 2024 : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून बैठकांचा धडाका सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा चालू आहे. तर, महायुतीमधील भारतीय जनता पार्टीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील ४५ उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, आज (२३ ऑक्टोबर) महाविकास आघाडीचं जागावापट जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच इतरही अनेक राजकीय घडामोडी आज पाहायला मिळतील. या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल. राज्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा वेध आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 23 October 2024 : विधानसभेची रणधुमाळी सुरू, उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

12:55 (IST) 23 Oct 2024
मुंबई विद्यापीठात ‘बीबीए’ आणि ‘बीसीए’ अभ्यासक्रम रखडले, संबंधित अभ्यासमंडळ व अभ्यासक्रम तयार नसल्याने अभ्यासक्रम रखडले

मुंबई : मुंबई विद्यापीठाकडे संबंधित अभ्यासमंडळ व अभ्यासक्रमच तयार नसल्याने शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ‘बीबीए’ आणि ‘बीसीए’ हे अभ्यासक्रम सुरू करता आलेले नाहीत.

सविस्तर वाचा...

12:46 (IST) 23 Oct 2024
"निवडून आल्यावर भावाच्या मतदारसंघातील…", अमित ठाकरेंचं आदित्य ठाकरेंच्या वरळीबद्दल मोठं वक्तव्य

समुद्रकिनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेत अमित ठाकरे अनेक वर्षांपासून काम करत आहेत. दरम्यान, माहिम विधासभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यावर दादर-माहीमचा समुद्रकिनारा स्वच्छ-सुंदर बनवेन असं अमित ठाकरे म्हणाले. यावर त्यांना विचारण्यात आल की, तुमच्या भावाच्या (आदित्य ठाकरे) मतदारसघातही अर्धा समुद्रकिनारा आहे. त्याबाबत काय निर्णय घ्याल? यावर अमित ठाकरे म्हणाले, "निवडून आल्यावर भावाच्या मतदारसंघातील समुद्रकिनारा देखील साफ करून देईन".

12:39 (IST) 23 Oct 2024

' मला आमदार करायला निघाले होते, आता पत्नीसाठी अडून ' या इच्छुकाने डागली खासदारावर तोफ.

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील गुंता चांगलाच वाढत असून आता आरोपाचा धुरळा उडू लागला आहे. आर्वीत तर काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांच्या भूमिकेवर संताप नोंदविणे सूरू केले आहे.

सविस्तर वाचा...

12:26 (IST) 23 Oct 2024
‘माझी टीएमटी’ मोबाईल ॲप ची केवळ घोषणा

ठाणे – परिवहन सेवेतील प्रवाशांचा सुट्ट्या पैशाचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केलेले माझी टीएमटी हे ॲप केवळ घोषणाच आहे का असा सवाल प्रवाशांकडून विचारला जाऊ लागला आहे. लोकार्पणाच्या वेळी हे ॲप काही बसमार्गावर सुरु करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते.

सविस्तर वाचा

12:25 (IST) 23 Oct 2024
कल्याण पश्चिमेत भाजपचे नरेंद्र पवार, शिवसेनेचे रवी पाटील यांच्या बंडखोरीची शक्यता; पहिल्या यादीत शिवसेनेचा उमेदवार जाहीर नाही

कल्याण – कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी जाहीर केली तर या मतदारसंघात इच्छुक असलेले शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार बंडखोरी करण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेने या मतदारसंघातील उमेदवार पहिल्या यादीत जाहीर केला नसल्याचे समजते.

सविस्तर वाचा

12:25 (IST) 23 Oct 2024
दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील फडके रोड गुरूवार, शुक्रवार वाहतुकीसाठी बंद

डोंबिवली – दिवाळी सणानिमित्त डोंबिवली पूर्वेतील फडके रोड तरूणाईने गजबजून गेलेला असतो. दिवाळी पहाट, दीपावली पूर्व संध्या उत्सवी कार्यक्रमांची फडके रोडवर रेलचेल असते. हा सगळा विचार करून वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी येत्या गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत फडके रोडवरील अप्पा दातार चौकमार्गे होणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा

12:24 (IST) 23 Oct 2024
ठाण्यात उद्यापासून प्रचाराची रणधुमाळीला सुरूवात; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव अर्ज भरणार

ठाणे : येत्या उद्या (गुरुवारी) येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड, मनसे नेते अविनाश जाधव हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे अर्ज दाखल करण्यापुर्वी तिन्ही पक्षांकडून शहरात मिरवणुका काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

सविस्तर वाचा

12:24 (IST) 23 Oct 2024
रुस्तमजी अर्बेनिया गृहसंकुलाच्या उन्नत मार्गाच्या हालचालींना वेग

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गालगतच्या साकेत पूलाजवळील रुस्तमजी गृहसंकुलातील नागरिकांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. ठाणे महापालिकेने या उन्नत सेवा मार्गिकेच्या निर्माणासाठी नगरविकास विभागाकडे या मार्गिकेसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी पत्र पाठविले आहे. उन्नत मार्गिका तयार झाल्यास येथील २५ ते ३० हजार रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

सविस्तर वाचा

12:20 (IST) 23 Oct 2024
मोटारीच्या धडकेत महापालिकेतील सफाई कामगार महिलेचा मृत्यू; खराडी भागातील घटना

पुणे : मोटारीच्या धडकेत पदपथावरील गवत काढणाऱ्या सफाई कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंढवा-खराडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी मोटार चालकाला अटक केली.

सविस्तर वाचा

12:19 (IST) 23 Oct 2024
निवडणुकीच्या तोंडावर शहरात टोळक्याकडून दहशतीचे प्रकार – वारजे, पर्वती, चंदननगर पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल

पुणे : निवडणुकीच्या तोंडावर शहरात टाेळक्याकडून दहशत माजविण्यच्या घटना वाढीस लागल्या आहेत. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून, याप्रकरणी वारजे, पर्वती, चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.

सविस्तर वाचा

12:19 (IST) 23 Oct 2024
पिंपरी विधानसभा: १८ माजी नगरसेवक विरोधात गेल्यास अण्णा बनसोडे म्हणाले, अजित पवार जो निर्णय…

पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत नाराज माजी नगरसेवकांचा एक गट विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात उभा राहिला आहे. यावर आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार जो योग्य निर्णय घेतील तो मला मान्य असेल. चार इच्छुकांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास त्या व्यक्तीचं मी काम करेन असं स्पष्टपणे आमदार बनसोडे यांनी सांगितलं आहे.

सविस्तर वाचा

11:14 (IST) 23 Oct 2024
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची मोटार पेटवण्याचा प्रकार

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या तासगावमधील एका पदाधिकाऱ्याची मोटार पेटवण्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार वैयक्तिक की राजकीय वादातून हे अजून स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मणेराजुरी (ता. तासगाव) येथील राजमाने वस्ती रस्त्यावर तासगाव बाजार समितीचे संचालक रामचंद्र पवार यांचे घर आहे. घराचे बांधकाम सुरू असल्याने शेजारीच असलेल्या शेडमध्ये त्यांच्या मोटारीस (एमएच १० बीक्यु ३७७७) काल मध्यरात्री अज्ञाताने आग लावली. यामध्ये ही मोटार जळून खाक झाली. तसेच शेडलाही आगीची धग बसली असून शेडचेही नुकसान झाले आहे. घरही पेटवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. अज्ञाताने ज्वालागृही पदार्थाचा फवारा मारून मोटार पेटवली असल्याची शंका आहे.

या प्रकरणी पवार यांनी तासगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार राजकीय वादातून झाला की वैयक्तिक वादातून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस मात्र, या प्रकरणी सर्व शक्यता गृहीत धरून तपास करत आहेत

11:14 (IST) 23 Oct 2024
मविआत जागावाटपावरून वाद? उमेदवाऱ्या जाहीर करण्यास वेळ का लगतोय? राऊत म्हणाले…

शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले,

"महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पार्ट्या असा आमचा मोठा थाट आहे, मोठा संसार आहे. आम्ही काल रात्री ९९ टक्के काम पूर्ण केलं आहे. लवकरच आम्ही जागावाटप जाहीर करू. इतरांनी त्यांच्या यादी जाहीर केल्या असतील तर त्यांना करू द्या. कारण त्यांना विरोधी पक्षातच बसायचं आहे. आम्हाला फार घाई नाही. आम्ही उद्याचे सत्ताधारी आहोत. आम्हाला उद्या सरकार स्थापन करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघ तोलून-मापून, मोजून त्याचं वाटप केलं जाईल. येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जेवढा वेळ लागणं अपेक्षित आहे तितका वेळ आम्ही घेत आहोत. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष मिळून आम्ही आज पत्रकार परिषद घेऊ. आता आम्हाला बैठकीची गरज भासणार नाही. कारण कालच्या बैठकीत सर्वकाही ठरलं आहे.