Maharashtra Breaking News , 23 October 2024 : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून बैठकांचा धडाका सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा चालू आहे. तर, महायुतीमधील भारतीय जनता पार्टीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील ४५ उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, आज (२३ ऑक्टोबर) महाविकास आघाडीचं जागावापट जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच इतरही अनेक राजकीय घडामोडी आज पाहायला मिळतील. या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल. राज्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा वेध आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Live Today, 23 October 2024 : विधानसभेची रणधुमाळी सुरू, उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
वर्धा : भाजपची पहिली यादी जाहीर झाली. त्यात नाव असणारे कामाला लागले तर नाव नसणारे विद्यमान यांच्या पोटात भीतीचा गोळा उमटला. ते धावाधाव करीत असल्याचे चित्र आहे. मात्र भाजप अंतर्गत गुंता असलेल्या काही जागा अद्याप जाहीर झालेल्या नसतानाही एका उमेदवाराने आपली उमेदवारी जाहीर करीत अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त पण जाहीर केला आहे.
भाईंदर :- रिक्षा चालकांना भेटवस्तू देऊन विनापरवानगी प्रचाराचे स्टिकर वाहनांवर लावल्याप्रकरणी आमदार गीता जैन यांचे बंधू सुनिल जैन यांच्याविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १५ ऑक्टोबर पासून आचारसंहिता घोषित करण्यात आली आहे.
सोलापूर: विधानसभा निवडणुकीसाठी एका राजकीय पक्षाने उमेदवारी जाहीर केलेल्या एका नेत्याची छबी एसटी बसमध्ये प्रवाशांना दिसेल, अशा दर्शनी भागावर पाहायला मिळाली.
धुळे – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिसांनी ऑलआऊट ऑपरेशन मोहीम राबवली. या मोहिमेत सहा बंदुका, आठ जिवंत काडतुसे, १६ तलवारी, कोयता, गुप्ती असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तसेच गावठी दारु, विदेशी दारु, गांजा, गुटखा अशा अमली पदार्थांची तस्करी करणार्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.
बदलापूर : मुरबाड तालुक्यात १५ वर्षांत फुटले नव्हते, तेवढे नारळ गेल्या १५ दिवसांत मुरबाडमध्ये फुटले, असा टोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व महाविकास आघाडीचे मुरबाड मतदारसंघातील नियोजित उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी आमदार किसन कथोरे यांना लगावला.
सावंतवाडी: कणकवली मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलाथापालथ सुरु आहे. असं असतांना अचानक राजकीय दृष्ट्या संवेदनशील कणकवली तालुक्यात “श्रीधर नाईक अमर रहे”, “सत्यविजय भिसे अमर रहे”, आजचा सत्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील काळा दिवस असा उल्लेख असलेले बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.
संभाजी ब्रिगेड व ठाकरेंच्या शिवसेनेची युती तुटली आहे. संभाजी ब्रिगेड आता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू शकते. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीला मदत केली होती. त्यानंतर विधानसभेत आम्ही तुम्हाला पाच ते सहा जागा देऊ असं मविआच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं होतं. या निवडणुकीसाठी आम्ही राज्यभर तयारी केली आहे. आम्ही विदर्भात तीन व मराठवाड्यात तीन जागांची मागणी केली आहे. मात्र आम्हाला एकही जागा मिळत नसेल तर आम्ही या आघाडीत का राहावं? भविष्यात आपल्या राज्याला पुढे न्यायचं असेल तर आमच्या चळवळीचा हातभार लागेल. परंतु, मविआमधील कोणत्याही घटकपक्षाला आमची अथवा आमच्या चळवळीची गरज नसेल तर आम्ही मविआतून बाहेर पडतो.
शहराध्यक्षाने विरोध केल्याच्या दुसऱ्याचदिवशी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मुंबई : दागिने व्यवसायाच्या आडून विकण्यात येत असलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा (ई-सिगारेट) साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत सुमारे ३० लाखांचा ई-सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांतील सुमारे एक हजार २३० कंत्राटी पदे रद्द करण्यात आली असून आता रुग्णालयांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघामधून अपक्ष निवडणूक लढवून दोन लाखाहून अधिक मते घेत सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का देणारे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह कोकण पट्ट्यातील १८ विधानसभा मतदार संघात उमेदवार उभे करणार आहेत.
मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांनी घर खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावरून भाडेतत्वावर कुर्ल्यामध्ये घर घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्या संकेतस्थळाद्वारे आरोपीनीं एका दलालाशी संपर्क साधला होता.
नागपूर : माटे चौक ते आयटी पार्क या रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणाचा सर्वसामान्य जनता आणि या मार्गाने जाणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असतानाही हे अतिक्रमण कायमस्वरूपी का हटवले जात नाही? विक्रेत्यांना कोणाचा आशीर्वाद आहे? पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना सर्वसामान्यांच्या त्रासाबाबत काहीच देणे-घेणे नाही का? अतिक्रमण विभाग झोपेचे सोंग का घेत आहे? असे अनेक सवाल प्रशासनाच्या बेपर्वा वृत्तीला कंटाळून नागरिकांनी उपस्थित केले आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठाकडे संबंधित अभ्यासमंडळ व अभ्यासक्रमच तयार नसल्याने शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून ‘बीबीए’ आणि ‘बीसीए’ हे अभ्यासक्रम सुरू करता आलेले नाहीत.
समुद्रकिनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेत अमित ठाकरे अनेक वर्षांपासून काम करत आहेत. दरम्यान, माहिम विधासभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्यावर दादर-माहीमचा समुद्रकिनारा स्वच्छ-सुंदर बनवेन असं अमित ठाकरे म्हणाले. यावर त्यांना विचारण्यात आल की, तुमच्या भावाच्या (आदित्य ठाकरे) मतदारसघातही अर्धा समुद्रकिनारा आहे. त्याबाबत काय निर्णय घ्याल? यावर अमित ठाकरे म्हणाले, “निवडून आल्यावर भावाच्या मतदारसंघातील समुद्रकिनारा देखील साफ करून देईन”.
‘ मला आमदार करायला निघाले होते, आता पत्नीसाठी अडून ‘ या इच्छुकाने डागली खासदारावर तोफ.
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील गुंता चांगलाच वाढत असून आता आरोपाचा धुरळा उडू लागला आहे. आर्वीत तर काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमर काळे यांच्या भूमिकेवर संताप नोंदविणे सूरू केले आहे.
ठाणे – परिवहन सेवेतील प्रवाशांचा सुट्ट्या पैशाचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केलेले माझी टीएमटी हे ॲप केवळ घोषणाच आहे का असा सवाल प्रवाशांकडून विचारला जाऊ लागला आहे. लोकार्पणाच्या वेळी हे ॲप काही बसमार्गावर सुरु करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते.
कल्याण – कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी जाहीर केली तर या मतदारसंघात इच्छुक असलेले शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील, भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार बंडखोरी करण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेने या मतदारसंघातील उमेदवार पहिल्या यादीत जाहीर केला नसल्याचे समजते.
डोंबिवली – दिवाळी सणानिमित्त डोंबिवली पूर्वेतील फडके रोड तरूणाईने गजबजून गेलेला असतो. दिवाळी पहाट, दीपावली पूर्व संध्या उत्सवी कार्यक्रमांची फडके रोडवर रेलचेल असते. हा सगळा विचार करून वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी येत्या गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत फडके रोडवरील अप्पा दातार चौकमार्गे होणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे : येत्या उद्या (गुरुवारी) येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड, मनसे नेते अविनाश जाधव हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे अर्ज दाखल करण्यापुर्वी तिन्ही पक्षांकडून शहरात मिरवणुका काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
ठाणे : मुंबई नाशिक महामार्गालगतच्या साकेत पूलाजवळील रुस्तमजी गृहसंकुलातील नागरिकांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. ठाणे महापालिकेने या उन्नत सेवा मार्गिकेच्या निर्माणासाठी नगरविकास विभागाकडे या मार्गिकेसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी पत्र पाठविले आहे. उन्नत मार्गिका तयार झाल्यास येथील २५ ते ३० हजार रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
सविस्तर वाचा
पुणे : मोटारीच्या धडकेत पदपथावरील गवत काढणाऱ्या सफाई कामगार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंढवा-खराडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी मोटार चालकाला अटक केली.
पुणे : निवडणुकीच्या तोंडावर शहरात टाेळक्याकडून दहशत माजविण्यच्या घटना वाढीस लागल्या आहेत. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघे जखमी झाले असून, याप्रकरणी वारजे, पर्वती, चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीत नाराज माजी नगरसेवकांचा एक गट विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात उभा राहिला आहे. यावर आमदार अण्णा बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार जो योग्य निर्णय घेतील तो मला मान्य असेल. चार इच्छुकांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास त्या व्यक्तीचं मी काम करेन असं स्पष्टपणे आमदार बनसोडे यांनी सांगितलं आहे.
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या तासगावमधील एका पदाधिकाऱ्याची मोटार पेटवण्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार वैयक्तिक की राजकीय वादातून हे अजून स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील राजमाने वस्ती रस्त्यावर तासगाव बाजार समितीचे संचालक रामचंद्र पवार यांचे घर आहे. घराचे बांधकाम सुरू असल्याने शेजारीच असलेल्या शेडमध्ये त्यांच्या मोटारीस (एमएच १० बीक्यु ३७७७) काल मध्यरात्री अज्ञाताने आग लावली. यामध्ये ही मोटार जळून खाक झाली. तसेच शेडलाही आगीची धग बसली असून शेडचेही नुकसान झाले आहे. घरही पेटवण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. अज्ञाताने ज्वालागृही पदार्थाचा फवारा मारून मोटार पेटवली असल्याची शंका आहे.
या प्रकरणी पवार यांनी तासगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुध्द तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार राजकीय वादातून झाला की वैयक्तिक वादातून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस मात्र, या प्रकरणी सर्व शक्यता गृहीत धरून तपास करत आहेत
शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले,
“महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना, समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, दोन्ही कम्युनिस्ट पार्ट्या असा आमचा मोठा थाट आहे, मोठा संसार आहे. आम्ही काल रात्री ९९ टक्के काम पूर्ण केलं आहे. लवकरच आम्ही जागावाटप जाहीर करू. इतरांनी त्यांच्या यादी जाहीर केल्या असतील तर त्यांना करू द्या. कारण त्यांना विरोधी पक्षातच बसायचं आहे. आम्हाला फार घाई नाही. आम्ही उद्याचे सत्ताधारी आहोत. आम्हाला उद्या सरकार स्थापन करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघ तोलून-मापून, मोजून त्याचं वाटप केलं जाईल. येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जेवढा वेळ लागणं अपेक्षित आहे तितका वेळ आम्ही घेत आहोत. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष मिळून आम्ही आज पत्रकार परिषद घेऊ. आता आम्हाला बैठकीची गरज भासणार नाही. कारण कालच्या बैठकीत सर्वकाही ठरलं आहे.