Maharashtra Breaking News , 23 October 2024 : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांकडून बैठकांचा धडाका सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा चालू आहे. तर, महायुतीमधील भारतीय जनता पार्टीने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पाठोपाठ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील ४५ उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, आज (२३ ऑक्टोबर) महाविकास आघाडीचं जागावापट जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच इतरही अनेक राजकीय घडामोडी आज पाहायला मिळतील. या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल. राज्यातील राजकीय व सामाजिक घडामोडींचा वेध आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Live Today, 23 October 2024 : विधानसभेची रणधुमाळी सुरू, उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
नाशिक : समाज माध्यमातून प्रचार करताना उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षांनी समाज माध्यमात दिलेल्या राजकीय जाहिराती तसेच संदेश यांनाही आदर्श आचारसंहिता तरतुदी लागू आहेत. अशी सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली आहे.
उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना अर्जात त्यांच्या सर्व समाज माध्यमांच्या खात्यांचा तपशील नमूद करणे आवश्यक आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षांनी समाज माध्यमाद्वारे केलेला जाहिरातींवरील खर्च त्यांच्या खर्चाचे हिशेबात दाखविणे आवश्यक आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षांनी समाज माध्यमात दिलेल्या राजकीय जाहिराती तसेच संदेश यांनाही आदर्श आचारसंहिता तरतुदी लागू आहेत. इलेक्ट्रॅानिक माध्यमाव्दारे करावयाच्या प्रचार जाहिरातीसाठी माध्यम प्रमाणिकरण सनियंत्रण समिती द्वारा तपासूनच, अशा जाहिराती प्रसारीत करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हास्तरावर सदर समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची मुद्रित माध्यम, समाज माध्यमाद्वारे करण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातींवर करडी नजर राहणार आहे.
शिवसेनेबरोबरची युती तोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत, असे आखरे यांनी सांगितले.
वाहनाने जखमीला काही अंतरापर्यंत फरफरट नेले, असे सत्र न्यायालयाने गणेश याला जामीन नाकारताना नमूद केले होते.
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णालयात रुग्णांची संख्या जास्त असतानाच न्यायवैद्यक प्रकरणांचा भारही ससूनवर वाढला आहे. हा भार कमी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबईच्या भरारी पथकाने मुंबई गोवा महामार्गावर राजापूर बस स्थानक समोर मोठी कारवाई करताना एका आयशर टेम्पो मधील सुमारे ८० लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. ही घटना घडून काही तास उलटत नाहीत तोच बुधवारी सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान राजापूर मतदार संघातील स्थिर सर्वेक्षण पथकाने अनुस्कुरा घाटात दहा लाख रुपये किमतीच्या इनोवा गाडीसह सुमारे २७हजार ६४० किमतीची गोवा बनावटीच्या विदेशी दारूपकडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयीत आरीफ सलीम शेख याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ )(ई )नुसार गुन्हा दाखल केला आहे.
विधानसभा निवडणुकीत जागा न दिल्यास महायुतीच्या प्रचारात सहभागी होणार नाही, असा इशाराही रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रात्री विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.
ठाणे : शिवसेना (ठाकरे गट) ने पहिली उमेदवारी जाहीर केली असून यामध्ये कोपरी- पाचपखाडी मतदार संघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नाशिक : राष्ट्रवादीने (अजित पवार) ३८ जागांवरील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली खरी, मात्र त्यामध्ये नाशिकमधील निफाड मतदारसंघाचा समावेश नसल्याने पक्षाचे आमदार दिलीप बनकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धुळे : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत बूट आणि पायमोजे उपलब्ध करुन देण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीमुळे साक्रीचे गटशिक्षणाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाचे वेतन भविष्य निर्वाह निधी अधीक्षक महेंद्र सोनवणे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : पोलीस असल्याची बतावणी करुन सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून ७० लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने चोरून नेल्याचे उघडकीस आले.
नाशिक : शिवसेना दुभंगल्यानंतर सर्वात प्रथम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देणारे सुहास कांदे आणि सर्वात शेवटी गुवाहाटीला जाणारे दादा भुसे या विद्यमान आमदारांच्या उमेदवारीवर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे.
कल्याण : ‘मागील पंधरा वर्षापासून विकासापासून दूर असलेल्या कल्याण पूर्व विभागाचा विकास करण्यासाठी आता आपणास साथ द्या, आपण एक नवा इतिहास घडवू,’ असे समाज माध्यमी फलक शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी सामायिक केले आहेत.
कल्याण : कल्याण पूर्वेत आपण महायुतीच्या उमेदवार म्हणून सुलभा गायकवाड यांचेच काम करायचे आहे. कोणीही अपक्ष निवडणूक लढवू नये किंवा बंडखोरीचा पवित्रा घेऊ नये, अशी तंबी शिवसेनेच्या वरिष्ठांनी स्थानिकांना दिल्याचे समजते.
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने बजावलेले समन्स दिल्लीतील पतियाळा न्यायालया मार्फत बजावण्यात येणार आहे.
नागपूर : शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वर्धा मार्गावर ‘नो राईट टर्न’ उपक्रम सुरू केला. परंतु, मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर केलेला हा प्रयोग अंगलट येत असल्याचे चित्र आहे. फक्त प्रयोगच करायचा असेल तर पोलीस उपायुक्तांनी वाहनचालकांना वेठीस धरू नये, अशा नकारात्मक प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहेत.
श्रीगोंदा येथील अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत आज मुंबई येथे मातोश्रीवर समर्थकांसह जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. नागवडे यांनी प्रवेश करतात त्यांना महाविकास आघाडीचे जागं वाटप जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेच्यावतीने एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे. यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी उमेदवारीसाठी मोठा संघर्ष केला आहे. उमेदवारी मिळावी आणि पक्षालाही जागा मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील सर्व नेते मुंबई येथे तळ ठोकून थांबलेले आहे. महाविकास आघाडीचा राज्यातील जागा वाटपाचा घोळ अजूनही कायम असताना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नागवडे यांना पक्ष प्रवेश देत त्याच ठिकाणी एबी फॉर्म देखील देण्यात आला आहे.
कल्याण : पक्षीय नेते, पदाधिकारी सार्वजनिक रस्त्यावरील वाहनांचा विचार न करता कार्यालयासमोरील रस्त्यावर आडवी तिडवी वाहने उभी करत असल्याने शहरातील वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
नागपूर : कळमना भागात भटक्या जमातीची वस्ती आहे. त्यांना राज्य शासनाने जमीन देऊन ४० वर्षांपूर्वी येथे वसवले. परंतु अद्याप जातीचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ ते घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या वस्तीत कोणत्याही पक्षाने मत मागायला येऊ नये, अशा आशयाचे फलक लावले आहेत.
नागपूर: दिवाळीच्या तोंडावर सोने- चांदीच्या दरातील वाढ थांबण्याचे नाव घेत नाही. नवरात्रीनंतर बघता बघता नागपुरातील सराफा बाजारात चांदीच्या दराने प्रति किलो एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. तर सोन्याचे दरही विक्रमी उंचीवर गेल्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.
बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदारसंघात महायुतीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकवल्यानंतर आता भाजप आमदार आणि उमेदवार किसन कथोरे यांनी शिवसेनेला धक्का दिला आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकवरून तस्करी केलेले चार धनेश पक्षी (हॉर्नबिल) सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतले.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “येत्या शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे त्यावेळी माझ्याबरोबर असतील. माझा लोकांवर विश्वास होता आणि आजही आहे. मी इलेक्शन खेळतो, लढत नाही. मागील निवडणुकीतील पराभवानंतर अजय चौधरींना फोन करणारा पहिला मी होतो. चांगल्या कामांना आम्ही नेहमी पाठिंबा देतो”.
यावेळी नांदगावकरांना विचारण्यात आलं की तुमच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी, भाजपासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता महाराष्ट्राच्या निवडणुकीत ते तुम्हाला पाठिंबा देतील का? किंवा तुमच्यात मैत्रीपूर्ण लढती होतील का? यावर नांदगावकर म्हणाले, मनसे व महायुतीच्या मैत्रीपूर्ण लढतींबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही. भाजपाने आम्हाला पाठिंबा द्यावा किंवा देऊन नये याचा निर्णय ते घेतील. राज ठाकरे हे दिलदार व्यक्ती आहेत. त्यांनी पाठिंबा द्यावा म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिला नव्हता.
कल्याण : कल्याण पूर्वेतील नांदिवली तर्फ भागातील नमस्कार ढाब्यासमोरील सार्वजनिक रस्त्यावर एका रिक्षा चालकाने भरधाव वेगात रिक्षा चालवून दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या एका महिलेच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
यंदाची विधानसभा निवडणूक अनेक अर्थाने महत्वाची आणि तेवढीच आगळी वेगळी ठरण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुंबईतील विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे धमकी सत्र सुरूच असून मंगळवारीही एक्स (ट्वीटर) हँडलद्वारे १० विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी प्राप्त झाली होती. याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली.
नाशिक: सध्या पावसाळी वातावरणाचा पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी फवारणी करावी लागत आहे. दिंडोरी तालुक्यात द्राक्षबागेत किटकनाशक फवारणीप्रसंगी ३२ वर्षाच्या शेतकऱ्याच्या तोंडात विषारी औषध गेल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
रवींद्र वडजे (३२, रा. आंबेवणी, दिंडोरी) हे द्राक्षबागेत किटक नाशकाची फवारणी करण्याची तयारी करीत होते. टाकीतील पाण्यात किटकनाशक टाकण्यासाठी बाटलीचे बूच खोलत असताना रवींद्र यांच्या तोंडात विषारी औषध गेले. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. परिसरातील अन्य लोकांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
पालघर तालुक्यातील सातपाटी व मुरबे दरम्यान असणाऱ्या खाडीमध्ये आज सकाळी हजारोंच्या संख्येने मासेमृत पडल्याची घटना समोर आली आहे. प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत पावल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून मच्छीमार समुदायाने या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
निवडणूक काळात तातडीच्या जप्तीचे आयुक्तांचे आदेश
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्था तसेच आर्थिक प्रकरणांशी संबंधित सर्व तपास व अंमलबजावणी यंत्रणांनी अधिक चोखपणे जबाबदारी पार पाडावी.