Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Updates Today: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ सात दिवस उरले आहेत. १८ नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यासाठी आता सर्वच पक्षांकडून प्रचाराला गती देण्यात येत आहे. महाराष्ट्रात आज केंद्रीय नेत्यांच्या सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रपूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सभा घेणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबईत काही सभा आणि रॅली पार पडणार आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते हे चिखली (बुलढाणा) आणि गोंदिया जिल्ह्यात प्रचारसभा घेणार आहेत. या व्यतिरिक्त राज्यातील नेतेही ठिकठिकाणी सभा आणि मिरवणुकांमध्ये सहभागी होणार आहेत. पुढील सात दिवस राज्याच्या प्रचारात आणखी नवीन मुद्दे येतात की, कटेंगे तो बटेंगे आणि लाल संविधान हेच मुद्दे कायम राहणार? हे कळेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Live Today, 12 November 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह
रामटेकमध्ये काँग्रेसचा ‘मविआ’विरोधातच प्रचार? शिवसेनेचा आरोप
नागपूर : आघाडीचा घटक असूनही काँग्रेस पक्षातील नेते काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांचा प्रचार करत आहे. काँग्रेसची ही भूमिका संशयास्पद असून त्यांना छुपा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विशाल बरबटे यांनी केला.
शरद पवार यांची उद्या भोसरीत सभा, तर गुरुवारी पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच रोड शो
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष, जेष्ठ नेते शरद पवार यांची उद्या बुधवारी (१३ नोव्हेंबर) भोसरीतील गाव जत्रा मैदानावर जाहीर सभा होणार आहे. तर, गुरुवारी (१४ नोव्हेंबर) पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात रोड-शो होणार आहे.
“बिन कामाचा रे बिन कामाचा, अडीच वर्ष…”, शहाजी बापू पाटील यांनी केली उद्धव ठाकरेंची मिमिक्री
“काल या ठिकाणी उद्धव ठाकरे येऊन गेले. बिन कामाचा रे बिन कामाचा. अडीच वर्ष आम्हीच मुख्यमंत्री केलं. एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री करुया म्हणून आम्हीच मुख्यमंत्री केलं”, असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची उद्धव ठाकरे यांची मिमिक्री करत टीका केली.
कोल्हापुरात स्वपक्षाविरोधात अनेक नेते मैदानात
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात बरेच प्रमुख पदाधिकारी, दुसऱ्या फळीतील प्रमुख कार्यकर्ते हे उघडपणे विरोधी गटाला साथ देऊन प्रचारात सक्रिय झाले आहेत.
‘शेतकरी दारू पितात, त्यामुळे…’, काँग्रेसच्या ‘या’ माजी आमदाराची चित्रफित प्रसारित
अमरावती : काँग्रेसचे माजी आमदार आणि धामणगाव रेल्वे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांनी शेतकऱ्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे.
दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री घातला धिंगाणा
भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आणि हे प्रकरण मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचले.
एका मतदारसंघात बंडखोरी, दुसऱ्यामध्ये ‘पक्षनिष्ठा’; काँग्रेस खासदार, माजी मंत्री बंडखोराच्या प्रचारात
नागपूर: महाविकास आघाडीच्या (शिवसेना ठाकरे गट) उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केल्यामुळे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेले काँग्रेस नेते व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या प्रचारात खुद्द रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि माजी मंत्री सुनील केदार उतरल्याने शिवसेना संतापली आहे.
हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघात भाजपला गड राखण्याचे आव्हान
छत्रपती संभाजीनगर – फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असून, जनसंघाच्या काळापासून येथे वर्चस्व राहिलेले आहे. यावेळी भाजपकडून मतदारसंघात प्रथमच अनुराधा चव्हाण या महिला उमेदवाराला संधी देण्यात आली असून, त्यांची येथे काँग्रेसचे विलास औताडेंसोबत प्रमुख लढत होत आहे.
जयदत्त क्षीरसागरांच्या भूमिकेतले मळभ दूर; एका पुतण्याला बळ, दुसऱ्याला कळ
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केलेले बीडमधील ज्येष्ठ नेते, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतल्याने त्यांच्याभोवती निर्माण झालेले मळभ दूर झाले.
सध्याच्या घडीला मुरबाडमध्ये किसन कथोरे विरूद्ध सुभाष पवार अशी थेट लढत असून हे दोन्ही उमेदवार कुणबी समाजातून येतात. मतदारसंघात प्रभावी आगरी उमेदवार नाही. त्यामुळे अशा स्थितीत मतदारसंघातील कुणबी मतांचे विभाजन होणार हे निश्चित मानले जात आहे.
“अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत”, अभिनेते भाऊ कदम यांना विश्वास, आणखी काय म्हणाले?
आपल्या विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी आज पिंपरीत महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा प्रचार केला. यावेळी त्यांना नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि ते होतील. असा विश्वास अभिनेते भाऊ कदम यांनी व्यक्त केला आहे.
सविस्तर वाचा….
यवतमाळ : वणी येथे भाजप प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान दोन कार्यकर्त्यांच्या वादाने जातीय स्वरूप घेतले. भाजपच्या कार्यकर्त्यावर त्याने कुणबी समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप होत आहे. त्यातच सोमवारी येथे प्रचारासाठी आलेले शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्ध्व ठाकरे यांची बॅग तपासण्यात आल्याने ही दोन्ही प्रकरणे येथे भाजपच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Live: एकनाथ शिंदेंसमोर ‘गद्दार, गद्दार’ घोषणा देणाऱ्या संतोष कटकेंचा उबाठाकडून सत्कार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा मुंबईतील साकिनाका येथे आले असताना सोमवारी सायंकाळी संतोष कटके नामक व्यक्तीने त्यांच्या वाहनासमोर गद्दार, गद्दार अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर आज त्या व्यक्तीला मातोश्रीवर आमंत्रित करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी संतोष कटकेंच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना पक्षप्रवेश दिला. संतोष कटके म्हणाले की, मी कोणत्याही पक्षात नव्हतो. फक्त एकनाथ शिंदे यांना एकदा गद्दार म्हणून हाक मारायची होती. ती मी मारली.
अमरावती : मी लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी एकदा नाही, शंभरवेळा तुरूंगात जाण्यास तयार आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी लगावला.
साधनांच्या पर्यायाने प्रचार साहित्य विक्रीवर परिणाम
नाशिक : विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपण्यास अवघे सात दिवस उरल्याने दुचाकी फेरी, समाज माध्यम, प्रत्यक्ष घरोघरी जावून प्रचारावर भर देण्यात येत आहे. याचा परिणाम प्रचार साहित्य विक्रीवर होत आहे.
धाराशिव जिल्ह्यात जाहीर सभेसाठी जात असताना आजही उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. औसा येथील हॅलिपॅडवर उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली. ही तपासणी सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडीओ काढला. निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे विचारत उद्धव ठाकरेंनी त्यांचीही चौकशी केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक : २०२४
— Sandeep Tikate (@SandeepTikate) November 12, 2024
उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची आज पुन्हा तपासणी.
स्थळ : औसा हेलिपॅड, लातूर #MaharashtraAssembly pic.twitter.com/89NjD3QrBe
मूर्तिजापूरमध्ये भाजप व वंचितमध्ये लढा, राष्ट्रवादीला बंडखोरी व अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे
अकोला : मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भाजप व वंचित आघाडीमध्ये वर्चस्वाची लढाई आहे. मतदारसंघात जातीय राजकारणासह मतविभाजनाचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरेल. राष्ट्रवादी शरद पवार गटाला बंडखोरीसह अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
पवार काका पुतण्यांनी दिलेल्या उमेदवारांमुळे तेली समाजात फूट पडण्याची भीती
वर्धा : आधी लोकसभा व आता विधानसभा निवडणुकीत राजकीय सजग झालेल्या तेली समाज संघटनेने तिकीट वाटपात प्रत्येक पक्षाने समाधानकारक उमेदवारी द्यावी म्हणून अधिकृत भूमिका मांडली होती.
भाजप आमदारांच्या प्रतिमेला चपलांचा हार, झेंडेपार लोह खाणीचा मुद्दा तापला
गडचिरोली : छत्तीसगड सीमेलगत कोरची तालुक्यातील झेंडेपार लोहखाणीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लावलेल्या फलकावरील (‘बॅनर’) भाजप आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रतिमेला चपलाचा हार घालून गावकऱ्यांनी निषेध व्यक्त केला. “झेंडेपार विकणारा आमदार कृष्णा गजबे” अशा आशयाचे फलक देखील लावले होते.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पश्चिम विदर्भात लढतीतील महिलांची संख्या दुपटीने वाढली असून यंदा तब्बल ४७ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
नवी मुंबई : बेलापूर मतदारसंघात बंडाचा झेंडा रोवणाऱ्या संदीप नाईक यांची तब्बल २० दिवसांनंतर प्रचार अंतिम टप्प्यात असताना भाजपने पक्षातून हकालपट्टी केली.
माजी मंत्री अशोक शिंदे स्वगृही, पक्षांतराचे एक वर्तुळ पूर्ण
वर्धा : तीनवेळा आमदार व एकदा मंत्री राहिलेले अशोक शिंदे स्वगृही म्हणजे परत शिवसेना (उबाठा)मध्ये दाखल झाले आहेत. आज त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले.
ठाणे जिल्ह्यात ‘पिपाणी’मुळे ‘तुतारी वाजविणाऱ्यां’ची डोकेदुखी ?
ठाणे जिल्ह्यात आता विधानसभा निवडणूकीसाठी शरद पवार गटाने पाच उमेदवार उभे केले आहेत. या पाचही उमेदवारांसमोर अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आता पिपाणीमुळे तुतारी वाजविणाऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या विकासासाठी महापालिका, महापौरांना अधिक अधिकार हवेत, ‘मुंबई फर्स्ट’च्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांची भूमिका
मुंबई : मुंबईच्या विकासासाठी सर्वात आधी मुंबई महापालिकेची निवडणूक घ्यायला हवी. सर्वोच्च न्यायालय गेली दोन वर्षे फक्त तारखांवर तारखा देत आहे. प्रभागांची संख्या कितीही असू द्या आधी निवडणूक घ्या, कोणीही जिंकेल, पण निवडणूक झाली पाहिजे, अशी भूमिका शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी मांडली.
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, शिल्पकार आपटेची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
मुंबई : मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शिवाजी महाराजांचा कांस्य पुतळा कोसळल्याचा दावा आपटे याने जामिनाची मागणी करताना केला आहे.
Maharashtra News Live: राहुल गांधींची चिखलीमधील सभा रद्द; स्वतःच माहिती देताना म्हणाले…
राहुल गांधी यांची बुलढाण्यातील चिखली येथे जाहीर सभा आणि रॅली होणार होती. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांची येथील सभा रद्द करण्यात आली आहे. यानंतर राहुल गांधी यांनी स्वतः एक व्हिडीओ पोस्ट करून याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, “मला चिखलीत यायचे होते. सोयाबिनचे शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधायचा होता. मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मला आज तेथे येता येणार नाही. पण इंडिया आघाडीचे सरकार तुमची काळजी घेईल, असा शब्द शेतकऱ्यांना देतो.”
नेता विपक्ष श्री @RahulGandhi का महाराष्ट्र की जनता के लिए संदेश:
— Congress (@INCIndia) November 12, 2024
मैं आप सभी से माफी चाहता हूं। मुझे आज चिखली आना था। वहां मुझे सोयाबीन के किसानों से मिलना था और एक जनसभा को संबोधित करना था, लेकिन हवाई जहाज में तकनीकी खराबी के कारण नहीं आ पाया।
मैं जानता हूं कि महाराष्ट्र में… pic.twitter.com/6nylQ8MZR2
ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये आचार संहितेच्या काळात मागील सुमारे एक महिन्याच्या कालावधीत २३ कोटी ४१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मैदाने नव्हे; प्रचारानंतरच्या ‘श्रमपरिहारा’ची ठिकाणे! महापालिका, पोलिसांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता
नवी मुंबई</strong> : शहरात्र प्रचाराचा धडाका सुरू आहे. बेलापूर व ऐरोली मतदारसंघात सर्वच राजकीय पक्ष व युती आघाडी व अपक्षांनी प्रचाराला जोरदार सुरवात केली आहे.
Maharashtra News Live: नवाब मलिकांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीकडून उच्च न्यायालयात याचिका
वैद्यकीय कारणांसाठी सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना अंतरिम जामीन दिला होता. मात्र त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. आता ईडीने त्यांच्या जामीनाला आव्हान देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता उच्च न्यायालय मलिकांना दिलासा देणार की त्यांचा जामीन फेटाळणार?
ठाणे जिल्ह्याच्या प्रचारातून वाहतूक कोंडीचा मुद्दाच हरवला
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात हजारो कोट्यवधी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सार्वजनिक वाहतुकीचे राष्ट्रीय प्रकल्प उभारले जात असले तरी जिल्ह्यातील प्रामुख्याने कल्याण ग्रामीण आणि पश्चिम, डोंबिवली, ठाणे शहर, भिवंडी ग्रामीण आणि पश्चिम याचबरोबर शहापूर या विधानसभा मतदारसंघांमधील अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या जटील आहे.