Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Updates Today: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ सात दिवस उरले आहेत. १८ नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यासाठी आता सर्वच पक्षांकडून प्रचाराला गती देण्यात येत आहे. महाराष्ट्रात आज केंद्रीय नेत्यांच्या सभा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चंद्रपूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सभा घेणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबईत काही सभा आणि रॅली पार पडणार आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते हे चिखली (बुलढाणा) आणि गोंदिया जिल्ह्यात प्रचारसभा घेणार आहेत. या व्यतिरिक्त राज्यातील नेतेही ठिकठिकाणी सभा आणि मिरवणुकांमध्ये सहभागी होणार आहेत. पुढील सात दिवस राज्याच्या प्रचारात आणखी नवीन मुद्दे येतात की, कटेंगे तो बटेंगे आणि लाल संविधान हेच मुद्दे कायम राहणार? हे कळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Live Today, 12 November 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह

12:14 (IST) 12 Nov 2024

सहा निवृत्त अधिकाऱ्यांना आमदारकीचे वेध

मुंबई : शासनात अनेक वर्षे सेवा केल्यावर राजकीय महत्त्वाकांक्षा बळावलेले सहा निवृत्त सनदी अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात नशीब अजमवित आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवांचाही समावेश आहे.

वाचा सविस्तर…

11:54 (IST) 12 Nov 2024

बुलढाण्यात संजय गायकवाड यांच्यासमक्ष जयश्री शेळकेंचे तुल्यबळ आव्हान; कोण बाजी मारणार?

बुलढाणा : ऐंशीच्या दशकात जिल्ह्यात बऱ्यापैकी पाळेमुळे रोवलेल्या शिवसेनेसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पहिली ऐतिहासिक सभा ‘बुस्टर’ ठरली. १९९० च्या फेब्रुवारी महिन्यात मेहकरमध्ये ती जाहीर सभा झाली होती. साधे व्यासपीठ, ध्वनिवर्धक व्यवस्था, हिंदुत्ववादी विचारांनी पेटलेल्या अठरापगड जातीच्या युवकांची भरगच्च गर्दी, असे त्या सभेचे चित्र होते. ती सभा जिल्ह्याच्या राजकारणातील शिवसेनेच्या जोरदार आगमनाची वर्दी देणारी ठरली.

वाचा सविस्तर…

11:53 (IST) 12 Nov 2024

नागपुरात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दिग्गजांच्या सभा, कोण कोण येणार?

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या आठवड्यात नागपूर व विदर्भात दिग्गज नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. भाजपचे स्टार प्रचारक व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मंगळवारी नागपुरात तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी नागपूर ग्रामीणमध्ये दोन सभा होणार आहेत.

वाचा सविस्तर…

10:55 (IST) 12 Nov 2024

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी (१२ नोव्हेंबर) आगमन होणार असल्याने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचेही अधिकारी शहरात दाखल झाले आहेत.

वाचा सविस्तर…

10:54 (IST) 12 Nov 2024

कोल्हापूरमध्ये पक्षाच्या उमेदवाराविरोधात विरोधकांना उघड मदत

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे वारे तापले टाकले असताना एकेक कार्यकर्ता जवळ करून प्रचाराला गती देण्यावर राजकीय पक्षांनी भर दिला असताना दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात बरेच प्रमुख पदाधिकारी, दुसऱ्या फळीतील प्रमुख कार्यकर्ते हे उघडपणे विरोधी गटाला साथ देऊन प्रचारात सक्रिय झाले आहेत.

वाचा सविस्तर…

10:46 (IST) 12 Nov 2024

Maharashtra News Live: मर्दांच्या पक्ष प्रमुखाने, एवढे घाबरायचे कारण काय? भाजपाची उबाठावर टीका

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची वणी येथे निवडणूक आयोगकडून तपासणी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा व्हिडीओ काढून संताप व्यक्त केला होता. तसेच पंतप्रधान मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्याही हेलिकॉप्टरची तपासणी करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता भाजपाकडून ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. “जेवणाच्या ताटावरच ज्यांनी केली होती केंद्रीय मंत्र्यांना अटक..

कोरोनात पत्रकारांना आणले फरफटत..

कुणाच्या घरावर चालवले बुलडोझर

कुणाचे फोडले डोळे..

मुख्यमंत्री असताना केवढे केले होते यांनी अनधिकृत चाळे.. मर्दांच्या पक्ष प्रमुखाने, एवढे घाबरायचे कारण काय?

लोकशाही आणि नियतीच्या दरबारात असतो समान न्याय!”, अशा शब्दात भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी टीकास्र सोडले.

10:09 (IST) 12 Nov 2024
Maharashtra News Live: राज ठाकरेंच्या जातीयवादी आरोपावर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीयवादी असल्याची टीका केली होती. पुण्यात छगन भुजबळ यांचा सत्कार करत असताना त्यांच्या डोक्यावरील पुणेरी पगडी काढून फुले पगडी घालण्यात आली होती, हा एक प्रकारचा जातीयवाद असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांनी शरद पवारांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, काहीही बोलणे हे राज ठाकरे यांचे वैशिष्ट आहे. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे, एवढेच आपण करू शकतो.

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज