Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates, 16 November 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून आता प्रचारासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. त्यातही शेवटचा शनिवार-रविवार असल्यामुळे सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभा महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी हे विविध ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे. व्होट जिहाद, मशिदीवरील भोंगे हे मुद्दे शेवटच्या टप्प्यात प्रचारात आणण्यात आले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून आता वाद-प्रतिवाद होण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra News Live Today, 16 November 2024 | विधानसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या अपडेट्स

13:59 (IST) 16 Nov 2024

‘इन्हे’ कोन नही जानता अमित शहा ‘हे’ आवाहन करण्यास विसरले

चंद्रपूर : अमित शहा बल्लारपूर मतदार संघाचे उमेदवार तथा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, राजुराचे उमेदवार देवराव भोंगळे व वरोराचे उमेदवार करन देवतळे यांना विजयी करा असे आवाहन मतदारांना करण्यास विसरले.

सविस्तर वाचा...

13:57 (IST) 16 Nov 2024

खळबळजनक! पेट्रोल टाकून उमेदवाराचे वाहनच पेटविले…

यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील तिसरी आघाडी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमदेवार बिपीन चौधरी यांचे वाहन शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातांनी पेटवून दिले.

सविस्तर वाचा...

13:56 (IST) 16 Nov 2024

VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी

नागपूर : राज्यात गेल्या काही वर्षात रेल्वे अपघातात तब्बल १३ वाघ मृत्यूमुखी पडले आहेत. आतापर्यंत रेल्वेच्या धडकेत हत्तीच्या मृत्यूची वाढती आकडेवारी समोर येत होती.

सविस्तर वाचा...

13:55 (IST) 16 Nov 2024

‘अकोला पश्चिम’मध्ये भाजप व काँग्रेसमध्ये शाब्दिक वॉर; नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी

अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्ये ‘शाब्दिक वॉर’ सुरू झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.

सविस्तर वाचा...

13:54 (IST) 16 Nov 2024

महाराष्ट्रातील ‘या’ विधानसभेत प्रचारासाठी सहा भाषांचा वापर, तीन राज्यांचा…

गडचिरोली : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रयोग केले जात आहेत.

सविस्तर वाचा...

13:53 (IST) 16 Nov 2024

“आजवर काय केले तेही सांगत नाही अन् पुढे काय करणार ते पण बोलत नाही,” चर्चेतील टीका

वर्धा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टॉप गियरवर आला आहे. बड्या नेत्यांची सभा लागत असल्याने उदासीन दिसणारा ग्रामीण भाग सहभागी होत भाषणाचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा...

13:52 (IST) 16 Nov 2024

कमळ म्हणजेच पाना…नवनीत राणाच्या नवीन डावाने महायुतीत ठिणगी…,

अमरावती : भाजपच्‍या स्‍टार प्रचारक नेत्‍या नवनीत राणा यांनी दर्यापूर मतदारसंघात महायुतीच्‍या विरोधात उघड प्रचार सुरू केल्‍याने वातावरण तापले आहे.

सविस्तर वाचा...

13:45 (IST) 16 Nov 2024
Chandrapur Vidhan Sabha 2024: स्नेहमिलन दिवाळीचे, जेवणात मटनचॉप्स…निवडणुकीने सणाची व्याख्याच…

दिवाळी आटोपून पंधरवडा झाला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांची दिवाळी सुरूच आहे.

सविस्तर वाचा...

13:44 (IST) 16 Nov 2024
Yavatmal Vidhan Sabha 2024: कुटुंब रमले प्रचारात…कुणी पहिल्यांदा ओलांडला बंगल्याचा उंबरठा, कुणी धूळभरल्या वाटेवर….

विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत मतदारसंघातील साडेतीन, चार लाख मतदारांपर्यंत उमेदवाराला पोहचणे मोठे आव्हान असल्याने या काळात उमेदवारांचे संपूर्ण कुटुंबच प्रचारासाठी घराबाहेर पडले आहे.

सविस्तर वाचा...

13:19 (IST) 16 Nov 2024

Maharashtra News Live : पंतप्रधान स्मृतीभ्रंश झालाय, काँग्रेस नेते राहुल गांधींची टीका

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आमच्या पंतप्रधानांना स्मृतीभ्रंश झाला आहे. ते प्रत्येक सभेत वेगवेगळे दावे करत आहेत. आम्ही जे बोलतोय, तेच परत पंतप्रधान बरळत आहेत. आम्ही सांगतोय, भाजपा संविधानावर आक्रमण करत आहे. तर ते म्हणतात, काँग्रेस संविधानावर आक्रमण करत आहे. एका वर्षांपासून मी हे बोलत आहे. लोक माझं ऐकतायत, हे कळल्यानंतर आता मोदीही तेच बोलू लागले आहेत.

https://youtube.com/live/pIzYy5ytAsA?feature=share

13:09 (IST) 16 Nov 2024

Maharashtra News Live: 'पुण्यात विशिष्ट समाजाचे लोक भाजपाला मतदान करतात', Vote Jihad वर शरद पवारांची टीका

Sharad Pawar on Vote Jihad: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने व्होट जिहाद मुद्द्यांवर विशेष भर दिला आहे. यावरून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा

12:51 (IST) 16 Nov 2024

महाराष्ट्रातील 'या' विधानसभेत प्रचारासाठी सहा भाषांचा वापर, तीन राज्यांचा…

गडचिरोली : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रयोग केले जात आहेत. अशात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघात एक, दोन नव्हे तर तब्बल सहा विविध भाषांचा वापर प्रचारासाठी होतो आहे.

सविस्तर वाचा...

12:10 (IST) 16 Nov 2024

Maharashtra News Live: '५०० रुपयांत घर चालतं, वरचे हजार रुपये जास्तीचे आहेत', भाजपा महिला नेत्याची मुक्ताफळे

कोल्हापूरमध्ये भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त विधान केलेले असतानाच आता कोल्हापूरच्या हातकंणगले विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून एक अजब विधान झाले आहे. ५०० रुपयांमध्ये घरचा खर्च चालतो, कुठे आहे महागाई? असा युक्तीवाद भाजपा नेत्या निता दांडेकर-माने यांनी केला आहे. त्या जयसिंगपूर शहराच्या माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांचे सासरे अशोक माने हे महायुतीचे उमेदवार आहेत.

https://twitter.com/ivaibhavk/status/1856978064959254783

11:34 (IST) 16 Nov 2024

Maharashtra News Live: देवेंद्र फडणवीसांचे डोके ठिकाणावर आहे का? संजय राऊत यांचा परखड प्रश्न

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आपण एक राहिलो तर पाकिस्तानवरही तिरंगा फडकवू. त्यांचे डोके ठिकाणावर आहे का? ही कुठली निवडणूक आहे? पाकिस्तानवर तिरंगा फडकविण्याचे राहुद्या. पण पाकव्याप्त काश्मीर घेण्याच्या वल्गना तुमचे नेते करत आहेत. ते आधी ताब्यात घ्या. तिथे तिरंगा फडकवून दाखवा. मणिपूरला जाऊन तिरंगा फडकवून दाखवा. त्यानंतर लडाखला जिथे चीनने घुसखोरी केली आहे, तिथे जाऊन तिरंगा फडकवून दाखवा. तुम्हाला एखाद्या समाजाची, धर्माची मते मिळत नाहीत, म्हणून व्होट जिहाद म्हणायचे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

Amit Shah opposes Muslim reservation in Chhatrapati Shivaji Maharajs Maharashtra

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मुस्लीमांना कदापी आरक्षण मिळू देणार नाही म्हणजे नाही, असे शहा म्हणाले.<br />