Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Updates, 16 November 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून आता प्रचारासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. त्यातही शेवटचा शनिवार-रविवार असल्यामुळे सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभा महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी हे विविध ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे. व्होट जिहाद, मशिदीवरील भोंगे हे मुद्दे शेवटच्या टप्प्यात प्रचारात आणण्यात आले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून आता वाद-प्रतिवाद होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Live Today, 16 November 2024 | विधानसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या अपडेट्स
राज ठाकरेंना महायुतीत यायचे असेल तर आधी…आठवलेंनी सांगितला भविष्यातला प्लॅन…
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वारंवार स्वत:च्या पक्षाची भूमिका व झेंडे बदलू नये, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दोनच दिवस शिल्लक राहिले असताना, जळगाव जिल्ह्यातील शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवारांच्या प्रचारासाठी अभिनेता गोविंदा यांनी शनिवारी पाचोऱ्यात हजेरी लावली. मात्र, रोड शो सुरू असताना अचानक छातीत दुखू लागल्याने गोविंदा रोड शो अर्धवट सोडून मुंबईत परतले.
Rajnath Singh: “डॉ. आंबेडकरांना भारतरत्न नरेंद्र मोदींनी दिला”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा दावा
काँग्रेस अनुसुचित जाती जमातीची जनगणना करण्याची मागणी करत आहे. मात्र कुठल्या जातीला किती आरक्षण देणार हे जाहीर करत नाही. काँग्रेस लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात विविध पक्षांचे स्टार प्रचारक नागपूर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
आमच्या भविष्यासाठी अमितकाका तुम्हाला आमदार व्हावेच लागेल, मनसे पदाधिकाऱ्याच्या कन्येचे प्रचारादरम्यान अमित ठाकरेंना पत्र
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दादर – माहीम विधानसभेतील तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
पुणे : विधासभा निवडणुकीमुळे राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू ठेवण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याशिवाय ज्या शाळांमधील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे
राहुल गांधींची माध्यमांवर आगपाखड; म्हणाले, “शेतकरी व गरिबांचा मुद्दा…”
चंद्रपूर : देशातील प्रसार माध्यमे शेतकरी व गरिबांचा मुद्दा उचलून धरत नाहीत. माध्यमांमध्ये मजूर, शेतमजूर, शेतकरी दिसत नाहीत, आदिवासी, बेरोजगारीचा विषय दिसत नाही.
Maharashtr Live News : कोविड काळाता मविआने मलिदा खालला- देवेंद्र फडणवीस
लोक मरत असताना मविआ घोटाळा करत होती – देवेंद्र फडणवीस</p>
कोविड काळाता मविआने मलिदा खालला- देवेंद्र फडणवीस
तुमच्याकडचे बंद पडणारे प्रकल्प मी सुरू करणार- देवेंद्र फडणवीस
५ हजारांहून अधिक पक्की घरे मनिषाताईंनी दिली- देवेंद्र फडणवीस
उमेदवाराचे वाहन पेटविल्याने यवतमाळच्या निवडणुकीला गालबोट, कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमदेवार बिपीन चौधरी यांचे वाहन अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी पेटवून दिले.
मोदींनी संसदेला ओलीस ठेवले होते…काँग्रेस प्रवक्त्याच्या आरोपाने…
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसच्या निशान्यावर आहेत तर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केले आहे.
कल्याण ग्रामीणमधील विधानसभा मतदारसंघात शिळफाटा येथे वाहनातून पाच कोटी जप्त
शिळफाटा परिसरात स्थिर सर्वेक्षण विभागाचे एक पथक कार्यरत आहे. हे पथक शनिवारी सकाळी संशयास्पद वाहनांची तपासणी करत होते.
5.5 Crore seize in Kalyan: कल्याणमध्ये निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई; एटीएम व्हॅनमधून साडे पाच कोटी रुपये जप्त
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील निवडणूक भरारी पथकाने शिळफाटा रोडवर तपासणी करताना एटीएम व्हॅनमधून साडे पाच कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही व्हॅन हिताची कॅश मॅनेजमेंट कंपनीची असून नवी मुंबईवरून डोंबिवलीच्या दिशेने जात होती. या व्हॅनमध्ये ५ कोटी ५५ लाख रुपये सापडले असून व्हॅनमधील रोख रक्कमेबाबत दस्तऐवज मागितले असता योग्य दस्ताऐवज दिले नसल्याचा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मविआ सरकारमुळे राज्याला आजही दुष्परिणाम भोगावे लागताहेत, केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत यांची टिका
ठाणे : पाच वर्षांपुर्वी महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला जनादेश दिला असतानाही त्याचा अपमान करत महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले आणि अडिच वर्षात हे सरकार पडले.
Manoj Jarange Patil in Yeola VidhanSabha: छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात मनोज जरांगे पाटलांची एंट्री, येवलेकरांनी केले जंगी स्वागत
छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर येथेच्छ टीका केलेली आहे. आता जरांगे पाटील हे नाशिकच्या येवला विधानसभा मतदारसंघात आले आहेत याठिकाणी असलेल्या मराठा समाजाने त्यांचे जंगी स्वागत केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
“धर्माचा वापर करून महाविकास आघाडीचे प्रमुख नेते वोट जिहाद करत आहेत”, फडणवीस यांची टीका
अल्पसंख्याक मते मिळवण्यासाठी महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याविरुद्ध सगळ्यांना एक व्हावे लागणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर : काँग्रेस नेते नरेश पुगलिया व भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार एकाच मंचावर…
बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची एकाच मंचावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला निमंत्रण देणारी भेट ठरली आहे.
संविधान बदल अन् ‘ चारसो पार’ चा नारा:मोदी, शाहांविरुद्ध एफआयआर करा,काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संदेश सिंगलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
प्रचाराचा प्रवास… तालीम ते गुन्हेगारी टोळ्या
निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराच्या पाठिशी मतदारांबरोबर पैसा आणि बळ आवश्यक असते, हा समज आता राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये दृढ झाला आहे.
Gadchiroli Naxal Attack : अमित शहांच्या गडचिरोली दौऱ्याआधी भामरागडमध्ये बॉम्बस्फोट, सुदैवाने…
नक्षल्यांनी घातपाताच्या दृष्टीने हा स्फोट घडवून आणल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.
Ramdas Kadam Dapoli Rally: ‘सत्ता आल्यानंतर आदित्य ठाकरेंना बर्फाच्या लादीवर झोपवून…’, रामदास कदम यांची टीका
सत्ता आल्यानंतर दिशा सालियन प्रकरण पुन्हा बाहेर काढा आणि त्यात आदित्य ठाकरे दोषी आढळला तर त्याला बर्फाच्या लादीवर झोपवून नको त्या जागेवर फटके द्या, असे विधान शिवसेना (शिंदे) पक्षाचे माजी आमदार रामदास कदम यांनी केले. दापोली येथे योगेश कदम यांच्यासाठी जाहीर प्रचार सभा आयोजित केलेली असताना रामदास कदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाषण करताना ही मागणी केली.
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
बैठकीला अदानींसमवेत गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दुपारी धामणगाव रेल्वे येथील प्रचार सभेत बोलताना केला.
रवी राणांच्या विरोधात बच्चू कडूंची पत्नीही मैदानात
अमरावती : बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनी प्रीती बंड यांच्या प्रचारासाठी भातकुली येथे सभा घेतली. त्यामुळे बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
‘इन्हे’ कोन नही जानता अमित शहा ‘हे’ आवाहन करण्यास विसरले
चंद्रपूर : अमित शहा बल्लारपूर मतदार संघाचे उमेदवार तथा राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, राजुराचे उमेदवार देवराव भोंगळे व वरोराचे उमेदवार करन देवतळे यांना विजयी करा असे आवाहन मतदारांना करण्यास विसरले.
खळबळजनक! पेट्रोल टाकून उमेदवाराचे वाहनच पेटविले…
यवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील तिसरी आघाडी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमदेवार बिपीन चौधरी यांचे वाहन शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातांनी पेटवून दिले.
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
नागपूर : राज्यात गेल्या काही वर्षात रेल्वे अपघातात तब्बल १३ वाघ मृत्यूमुखी पडले आहेत. आतापर्यंत रेल्वेच्या धडकेत हत्तीच्या मृत्यूची वाढती आकडेवारी समोर येत होती.
‘अकोला पश्चिम’मध्ये भाजप व काँग्रेसमध्ये शाब्दिक वॉर; नेत्यांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी
अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेसमध्ये ‘शाब्दिक वॉर’ सुरू झाल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.
महाराष्ट्रातील ‘या’ विधानसभेत प्रचारासाठी सहा भाषांचा वापर, तीन राज्यांचा…
गडचिरोली : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रयोग केले जात आहेत.
“आजवर काय केले तेही सांगत नाही अन् पुढे काय करणार ते पण बोलत नाही,” चर्चेतील टीका
वर्धा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टॉप गियरवर आला आहे. बड्या नेत्यांची सभा लागत असल्याने उदासीन दिसणारा ग्रामीण भाग सहभागी होत भाषणाचा आनंद घेत असल्याचे चित्र आहे.
कमळ म्हणजेच पाना…नवनीत राणाच्या नवीन डावाने महायुतीत ठिणगी…,
अमरावती : भाजपच्या स्टार प्रचारक नेत्या नवनीत राणा यांनी दर्यापूर मतदारसंघात महायुतीच्या विरोधात उघड प्रचार सुरू केल्याने वातावरण तापले आहे.
दिवाळी आटोपून पंधरवडा झाला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांची दिवाळी सुरूच आहे.