Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Updates, 16 November 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून आता प्रचारासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. त्यातही शेवटचा शनिवार-रविवार असल्यामुळे सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सभा महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी हे विविध ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांचाही जोरदार प्रचार सुरू आहे. व्होट जिहाद, मशिदीवरील भोंगे हे मुद्दे शेवटच्या टप्प्यात प्रचारात आणण्यात आले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून आता वाद-प्रतिवाद होण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Live Today, 16 November 2024 | विधानसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या अपडेट्स
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत मतदारसंघातील साडेतीन, चार लाख मतदारांपर्यंत उमेदवाराला पोहचणे मोठे आव्हान असल्याने या काळात उमेदवारांचे संपूर्ण कुटुंबच प्रचारासाठी घराबाहेर पडले आहे.
Maharashtra News Live : पंतप्रधान स्मृतीभ्रंश झालाय, काँग्रेस नेते राहुल गांधींची टीका
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आमच्या पंतप्रधानांना स्मृतीभ्रंश झाला आहे. ते प्रत्येक सभेत वेगवेगळे दावे करत आहेत. आम्ही जे बोलतोय, तेच परत पंतप्रधान बरळत आहेत. आम्ही सांगतोय, भाजपा संविधानावर आक्रमण करत आहे. तर ते म्हणतात, काँग्रेस संविधानावर आक्रमण करत आहे. एका वर्षांपासून मी हे बोलत आहे. लोक माझं ऐकतायत, हे कळल्यानंतर आता मोदीही तेच बोलू लागले आहेत.
Maharashtra News Live: ‘पुण्यात विशिष्ट समाजाचे लोक भाजपाला मतदान करतात’, Vote Jihad वर शरद पवारांची टीका
Sharad Pawar on Vote Jihad: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने व्होट जिहाद मुद्द्यांवर विशेष भर दिला आहे. यावरून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्रातील ‘या’ विधानसभेत प्रचारासाठी सहा भाषांचा वापर, तीन राज्यांचा…
गडचिरोली : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारासाठी राजकीय पक्षांकडून विविध प्रयोग केले जात आहेत. अशात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघात एक, दोन नव्हे तर तब्बल सहा विविध भाषांचा वापर प्रचारासाठी होतो आहे.
Maharashtra News Live: ‘५०० रुपयांत घर चालतं, वरचे हजार रुपये जास्तीचे आहेत’, भाजपा महिला नेत्याची मुक्ताफळे
कोल्हापूरमध्ये भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरून वादग्रस्त विधान केलेले असतानाच आता कोल्हापूरच्या हातकंणगले विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेवरून एक अजब विधान झाले आहे. ५०० रुपयांमध्ये घरचा खर्च चालतो, कुठे आहे महागाई? असा युक्तीवाद भाजपा नेत्या निता दांडेकर-माने यांनी केला आहे. त्या जयसिंगपूर शहराच्या माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांचे सासरे अशोक माने हे महायुतीचे उमेदवार आहेत.
या आहेत निता दांडेकर-माने, भाजप नेत्या, जयसिंगपूर शहराच्या माजी नगराध्यक्ष, त्या म्हणत आहेत ५०० रुपयांत महिन्याला घर चालते, कुठ महागाई आहे. यांचे सासरे अशोक माने महायुतीकडून हातकणंगले विधानसभेला उभे आहेत, धनंजय महाडीक नंतर पुन्हा एक बौद्धिक दिवाळखोरी… pic.twitter.com/Jng5Fwyam1
— Vaibhav Kokat (@ivaibhavk) November 14, 2024
Maharashtra News Live: देवेंद्र फडणवीसांचे डोके ठिकाणावर आहे का? संजय राऊत यांचा परखड प्रश्न
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आपण एक राहिलो तर पाकिस्तानवरही तिरंगा फडकवू. त्यांचे डोके ठिकाणावर आहे का? ही कुठली निवडणूक आहे? पाकिस्तानवर तिरंगा फडकविण्याचे राहुद्या. पण पाकव्याप्त काश्मीर घेण्याच्या वल्गना तुमचे नेते करत आहेत. ते आधी ताब्यात घ्या. तिथे तिरंगा फडकवून दाखवा. मणिपूरला जाऊन तिरंगा फडकवून दाखवा. त्यानंतर लडाखला जिथे चीनने घुसखोरी केली आहे, तिथे जाऊन तिरंगा फडकवून दाखवा. तुम्हाला एखाद्या समाजाची, धर्माची मते मिळत नाहीत, म्हणून व्होट जिहाद म्हणायचे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मुस्लीमांना कदापी आरक्षण मिळू देणार नाही म्हणजे नाही, असे शहा म्हणाले.<br />