Maharashtra Breaking News Updates, 21 October 2024 : राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपाबाबत राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. यावरू आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणीदेखील सुरु झाली आहे. अशात भाजपाने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दरम्यान, आज किंवा उद्या इतर पक्षांच्या उमेदवारांची यादीही जाहीर होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोघांनीही जागावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर केलेलं नाही. त्यामुळे राजकीय चर्चांनीही उधाण आलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत विदर्भातील १२ जागांवरून मतभेद आहेत. यातील काही जागांवर ठाकरे गटाने दावा केला आहे. मात्र काँग्रेस या जागा सोडायला तयार नाही. जागावाटपाचा हा तिढा आता दिल्लीत पोहोचला आहे. महाराष्ट्रातील काही नेते दिल्लीत ठाण मांडून आहेत. दुसरीकडे राज्यात परिवर्तन महाशक्ती आघाडीदेखील स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. एकंदरितर राज्यातील राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 21 October 2024 : भाजपाकडून पहिली यादी जाहीर होताच बंडाचे वारे, जागावाटपाचा तिढा कायम असताना ९९ नावांची घोषणा

20:16 (IST) 21 Oct 2024
पिंपरी : पर्यटनाच्या बहाण्याने नारळ पाणी विक्रेत्याकडून खंडणीसाठी घरमालकाचे विमानाने अपहरण; बेटावर डांबले

पोलिसांचे एक पथक अपहृत आरोपींचा शोध घेण्याकरीता झारखंड व पश्चिम बंगालला रवाना करण्यात आले.

सविस्तर वाचा...

20:16 (IST) 21 Oct 2024
आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य हेल्पलाईन!

मुंबई : धावपळीच्या जीवनात येणारा मानसिक तणाव घालविण्यासाठी योग्यवेळी मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या प्रतिपादन कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी केले.

सविस्तर वाचा...

20:05 (IST) 21 Oct 2024
बेस्ट चालकाचे निर्दोषत्व सिद्ध व्हायला तब्बल तेवीस वर्षे, दोषी असल्याचा कोणताही पुरावा नसल्याची उच्च न्यायालयाची टिप्पणी

बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवून एका पादचाऱ्याच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी खटला चालवण्यात आला होता.

सविस्तर वाचा...

19:54 (IST) 21 Oct 2024
म्हाडा मुंबई मंडळ सोडत ऑक्टोबर २०२४ : २०१७ पैकी ४०० हून अधिक घरे परत, तर १५३० विजेत्यांची घरासाठी स्वीकृती

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांसाठीच्या आॅक्टोबर २०२४ मधील सोडतीतील ४४२ विजेत्यांनी घरे परत (सरेंडर) केली आहेत.

सविस्तर वाचा...

19:36 (IST) 21 Oct 2024
गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळला, चकमकीत पाच नक्षल्यांना कंठस्नान

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नक्षलवादी घातपात करु शकतात, ही शक्यता गृहित धरुन पोलीस सतर्क आहेत.

सविस्तर वाचा...

19:09 (IST) 21 Oct 2024
बिबट्याच्या मृत्यूमागे घातपात, वन अधिकाऱ्यांचा संशय

नाशिक : शहराजवळील म्हसरुळ शिवारातील एका विहिरीत शरीराभोवती तारेच्या सहाय्याने वजनदार लोखंडी वस्तू बांधलेल्या स्थितीत बिबट्याचा मृतदेह आढळून आला.

सविस्तर वाचा...

19:07 (IST) 21 Oct 2024
कल्याण पूर्वेत सुलभा गायकवाड यांचे काम न करण्याचा शिवसेना नगरसेवकांचा इशारा

एकही शिवसैनिक महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांचा प्रचार करणार नाही, असा इशारा या बैठकीत देण्यात आला.

सविस्तर वाचा...

18:23 (IST) 21 Oct 2024
पुणे: शाळकरी मुलाशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध गुन्हा

कोंढवा भागातील एका शाळकरी मुलावर सोसायटीच्या आवारात अल्पवयीनांनी अत्याचार केल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती.

सविस्तर वाचा...

17:58 (IST) 21 Oct 2024
मुरबाडमधून सुभाष पवारांची बंडखोरी, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश, उमेदवारीवरही शिक्कामोर्तब

शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख आणि ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस ( शरद पवार ) पक्षात प्रवेश केला आहे.

वाचा सविस्तर...

17:49 (IST) 21 Oct 2024
राज ठाकरेंकडून दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा; राजू पाटील यांना कल्याण ग्रामीणमधून तर अविनाश जाधव यांना...

उमेदवारांच्या यादीवर शेवटचा हात फिरवला जातो आहे. आज किंवा उद्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होईल. पण त्यापूर्वी कल्याण ग्रामीणमधून मी राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करतो आहे. येत्या २४ तारखेला मी दोघांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येत आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली

17:45 (IST) 21 Oct 2024
Video: एसटी आगारात चालक-अधिकार्‍यांमध्ये हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

भंडारा : दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात बस चालक आणि एसटी अधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झालेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अधिकारी आणि चालक एकमेकांना लाथा, बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत.

वाचा सविस्तर...

17:44 (IST) 21 Oct 2024
क‌ळवा-मुंब्र्यात अजित पवार गटाला धक्का, अनेक पदाधिकाऱ्यांची शरद पवार गटात वापसी

ठाणे : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणारे माजी नगरसेवक मिराज खान यांच्यासह पदाधिकारी बिलाल शेख (जसबीर ) आणि राजनाथ यादव यांनी नुकताच शरद पवार गटात पक्ष प्रवेश करत घरवापसी केली आहे.

वाचा सविस्तर...

17:43 (IST) 21 Oct 2024
ग्राहक आणि विकासक यांच्यातील ' सलोखा ' वाढला, महारेराच्या सलोखा मंचाकडून १७४९ तक्रारींचे निराकरण ५५३ तक्रारींवर सुनावणी सुरू

मुंबई : न्यायालयात न जाता महारेराच्या सलोखा मंचाकडे धाव घेत जलद गतीने आपल्या तक्रारींचे निवारण करण्याकडे आता ग्राहकांचा कल वाढला आहे.

सविस्तर वाचा...

17:34 (IST) 21 Oct 2024
रायगड: हरिहरेश्वर येथील हल्लेखोर पर्यटकांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

ज्योती धामणस्कर या महिलेची पिंपरी चिंचवड येथून आलेल्या पर्यटकांनी गाडीखाली चिरडून हत्या केली होती.

सविस्तर वाचा...

17:34 (IST) 21 Oct 2024
चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपचे काम न करण्यावर ठाम तर भाजपने दिला ‘हा’ इशारा

गृहकलह मिटल्याने चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांच्याऐवजी त्यांचे दीर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

सविस्तर वाचा...

17:22 (IST) 21 Oct 2024
दोन दिवसांत मुंबईतील १३ विमानांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, तपासणीत सर्व धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न

मुंबई : गेल्या दोन दिवसांत मुंबईतील १३ विमानांत बॉम्ब ठेवल्याचा धमक्या मिळाल्या आहेत. त्यात पाच आंतरराष्ट्रीय व आठ देशांतर्गत विमानांचा समावेश आहे.

सविस्तर वाचा...

17:11 (IST) 21 Oct 2024
यवतमाळ मतदारसंघ : प्रत्येकी नऊ वेळा अल्पसंख्याक व कुणबी उमेदवारास संधी

१९५२ पासून आजपर्यंत झालेल्या १८ निवडणुकींमध्ये मतदारसंघात अत्यल्प मतदारसंख्या असलेल्या समाजाने येथील प्रतिनिधीत्व केले आहे.

सविस्तर वाचा...

17:10 (IST) 21 Oct 2024
अलिबागमधून भाजपचे दिलीप भोईर बंडखोरीच्या तयारीत

येत्या एक ते दोन दिवसात याबाबत अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान महायुतीपूढे असणार आहे.

सविस्तर वाचा...

17:10 (IST) 21 Oct 2024
संदीप नाईक यांचे ‘एकला चालो रे’, समर्थकांना हवी तुतारी… नवी मुंबईतील बंडाची दिशा आज ठरणार ?

भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी उभारलेले बंडाचे वारे नेमक्या कोणत्या दिशेने वाहणार याचा फैसला मंगळवारी सकाळी होण्याची चिन्हे आहेत.

सविस्तर वाचा...

17:04 (IST) 21 Oct 2024
ठाण्यात हिट अँड रन, भरधाव मर्सिडीज कारची तरूणाला धडक, अपघातात तरुणाचा मृत्यू

ठाण्यात ‘हिट अँड रन’चा प्रकार समोर आला आहे. एका मर्सिडीज कारच्या धडकेत दर्शन हेगडे (२१) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

वाचा सविस्तर...

17:03 (IST) 21 Oct 2024
Video : ताडोबातील ‘छोटा मटका’ झाडांवर नखाने ओरबाडत होता अन्…

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘छोटा मटका’ नावाच्या वाघाने झाडाच्या खोडावर नखाने ओरबाडत त्याच्या उपस्थितीची खूण दर्शवत इतर वाघांना त्याच्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली.

वाचा सविस्तर...

17:00 (IST) 21 Oct 2024
“भाजपाशी हातमिळवणी करणं म्हणजे औरंगजेबाशी...” अमित शाह यांच्याशी भेट झाल्याच्या चर्चांवर संजय राऊतांचे स्पष्टीकरण!

संजय राऊत आणि अमित शाह यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चांवर आता संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले. संजय राऊत आणि अमित शाह यांची भेट झाली हा हास्यास्पद प्रश्न आहे. या शक्तींशी सगळ्यात जास्त कुणी संघर्ष केला असेल तर तो शिवसेनेने केला आहे. त्यांनी आमचा पक्ष फोडला. आमचे सरकार पाडले. आमचे चिन्ह चोरले आणि त्यापेक्षा हा महाराष्ट्र गद्दारांच्या हाती दिला. त्यामुळे जर कुणी अशी शंका घेत असेल तर ते एका बापाच्या औलादी नाहीत. महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणाऱ्यांशी हातमिळवणी करणार नाही. त्यांच्याशी हातमिळवणी करणं म्हणजे औरंगजेबाशी हातमिळवणी करण आहे, असं संजय राऊत म्हणाले.

16:47 (IST) 21 Oct 2024

दिवाळीच्या तोंडावर सहा दिवसात सोन्याच्या दरात मोठे बदल, हे आहेत आजचे दर…

नागपूर: दिवाळी या सनामध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात सोने- चांदीचे दागिने खरेदी करतात. नागपुरातील सराफा व्यवसायिकांनी या काळात ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहे.

सविस्तर वाचा...

16:30 (IST) 21 Oct 2024
मावळमध्ये आमदार सुनील शेळके, भाजपमधील वाद फडणवीसांच्या दरबारात

मावळच्या जागेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मावळच्या जागेबाबत आशावादी असल्याचे भेगडे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

16:29 (IST) 21 Oct 2024
स्वबळ न तपासताच ठाकरे गटाचा ‘त्या’ बारा जागांवरील आग्रहाने पेच

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा वाद विकोपाला गेला असून त्यासाठी पूर्व विदर्भातील १२ जागा कारणीभूत ठरल्याचे सांगितले जाते.

सविस्तर वाचा...

16:29 (IST) 21 Oct 2024

आर्थिक फसवणुकीत ‘जामतारा’ देशात अव्वल; सर्वाधिक सायबर गुन्हेगार झारखंड-राजस्थानात

नागपूर : देशभरात सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रीय झाल्या असून सर्वाधिक सायबर गुन्हेगार छत्तीसगढ, राजस्थान आणि बिहार राज्यात कार्यरत आहेत.

सविस्तर वाचा...

16:29 (IST) 21 Oct 2024
कोणता झेंडा घेऊ हाती…… कार्यकर्तेही सैरभैर

जिल्‍ह्यातील आठ मतदारसंघांपैकी सर्वच ठिकाणी बंडखोरीची लागण होण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

सविस्तर वाचा...

16:29 (IST) 21 Oct 2024
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले मताधिक्य भाजपसाठी अडचणीचे!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मिळालेले मताधिक्य भाजपसाठी अडचणीचा विषय ठरले आहे.

सविस्तर वाचा...

16:28 (IST) 21 Oct 2024
बहुजन चेहरा महायुती, आघाडीच्या उमेदवारांचे राजकीय गणित बिघडवणार? गोंदियात प्रस्थापितांपुढे कडवे आव्हान

एखादा तुल्यबळ बहुजन चेहरा रिंगणात उतरल्यास दोन्ही अग्रवाल उमेदवारांसमोर त्याचे कडवे आव्हान असणार आहे.

सविस्तर वाचा...

16:28 (IST) 21 Oct 2024
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचाच दबदबा ?

BJP Dominance in Thane: शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या कडव्या विरोधानंतरही भाजपने आपल्याला हवे तेच उमेदवार रिंगणात उतरवून यामध्येही शिंदेसेनेचा फारसा विचार केलेला नाही.

सविस्तर वाचा...

लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरविल्याने मोठा फटका बसलेल्या भाजपने ९९ उमेदवारांच्या यादीत बहुतांश आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. रविवारी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील या पहिल्या फळीतील नेत्यांचा समावेश आहे. मात्र यादी जाहीर होताच अनेक मतदारसंघांत बंडाचे वारे वाहू लागले असून काही नाराज नेते बंडाच्या पवित्र्यात आहेत.