Maharashtra Breaking News Live Updates, 21 October 2024 : राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपाबाबत राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. यावरू आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणीदेखील सुरु झाली आहे. अशात भाजपाने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दरम्यान, आज किंवा उद्या इतर पक्षांच्या उमेदवारांची यादीही जाहीर होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोघांनीही जागावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर केलेलं नाही. त्यामुळे राजकीय चर्चांनीही उधाण आलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत विदर्भातील १२ जागांवरून मतभेद आहेत. यातील काही जागांवर ठाकरे गटाने दावा केला आहे. मात्र काँग्रेस या जागा सोडायला तयार नाही. जागावाटपाचा हा तिढा आता दिल्लीत पोहोचला आहे. महाराष्ट्रातील काही नेते दिल्लीत ठाण मांडून आहेत. दुसरीकडे राज्यात परिवर्तन महाशक्ती आघाडीदेखील स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. एकंदरितर राज्यातील राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 21 October 2024 : भाजपाकडून पहिली यादी जाहीर होताच बंडाचे वारे, जागावाटपाचा तिढा कायम असताना ९९ नावांची घोषणा

14:08 (IST) 21 Oct 2024
महाविकास आघाडी विकासाच्या अजेंड्यावर तयार झालेली नाही -चंद्रशेखर बावनकुळे

जेव्हा महायुतीच्या उमेदवाराचे चेहरे समोर येतील, तेव्हा जनता महायुतीला मतदान करेल, जनता महायुतीचा सरकार आणण्यासाठी मतदान करणार आहे. भाजपाची दुसरी आणि तिसरी यादी लवकरच येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड जागा परंपरागत भाजपची आहे, त्यामुळे भाजपकडे राहील असे दिसते, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

13:59 (IST) 21 Oct 2024
दक्षिण नागपूर आमचा पारंपरिक गड, ती जागा आम्हाला मिळायला हवी- अभिजित वंजारी

तिकीट मागण्याचा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे, संघर्ष वैगेरे काही नाही. उमेदवारी मागणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, मात्र त्या त्या मतदार संघातील त्या पक्षाची स्थिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिव्ह मेरिटवर जागा वाटप झाल्या तर महाविकास आघाडीच्या बाजूने विदर्भात चांगला निकाल लागेल. दक्षिण नागपूर पारंपारिक आमची जागा राहिली आहे. या ठिकाणी अनेक काँग्रेसचे आमदार निवडूण आले, दक्षिण नागपूरचे पहिले आमदार माझे वडील होते. त्यामुळे हा काँग्रेसचा गड असल्याने आमच्याकडे राहावं ही आमची रास्त मागणी आहे, अशी प्रतिक्रिया अभिजित वंजारी यांनी दिली.

13:58 (IST) 21 Oct 2024
महायुतीत अर्जुनी मोरगावचा तिढा कायम, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमध्ये रस्सीखेच!

२०१९ च्या निवडणुकीत बडोले यांचा अवघ्या ७०० मतांनी निसटता पराभव झाला होता.

सविस्तर वाचा…

13:44 (IST) 21 Oct 2024
भंडारा जिल्ह्यातील उमेदवारांची प्रतीक्षाच; तीनपैकी एकाही मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा नाही

भाजपच्या पहिल्या यादीत भंडारा जिल्ह्यातील तीनपैकी एकाही मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाचा समावेश नाही.

सविस्तर वाचा…

13:09 (IST) 21 Oct 2024
निलेश राणे शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार? संजय शिरसाट यांचे मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?

निलेश राणेंचा शिवसेनेच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा शिंदे गटातील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.

12:53 (IST) 21 Oct 2024
“खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर..”, बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना इशारा

भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी एका मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता आमदार होणंही अवघड झालं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री सोडा, आता ते आमदार तरी राहतात का?’, असा सवाल करत सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातांवर खोचक टीका केली होती. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखेंना इशारा देत हल्लाबोल केला आहे. “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर”, असं जयश्री थोरात यांनी म्हटलं आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात जयश्री थोरात बोलत होत्या.

सविस्तर वाचा

12:42 (IST) 21 Oct 2024

रस्त्यात टेम्पो पार्किंग जीवावर बेतले, अपघातात एक ठार

नवी मुंबई : जलद गती मार्गावर वाहन पार्क करणे नियमबाह्य असतानाही शीव पनवेल मार्गावर अनेक ठिकाणी जड अवजड वाहने पार्क केली जातात. अशाच एका बेकायदा पार्क केलेल्या टेम्पोचा अंदाज न आल्याने टेम्पोला एक कार धडकली .

सविस्तर वाचा…

12:39 (IST) 21 Oct 2024
काँग्रेससमोर पेच; मुस्लीम की हलबा उमेदवार?

नागपूर : हरियाणातील पराभवानंतर महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक विविध समाजाचे दबाव पक्षावर वाढले आहे. काँग्रेससाठी हरियाणा अनुकूल असल्याचे सर्व सर्वेक्षणातून स्पष्ट झाले होते. परंतु, तेथील जाट समाज विरुद्ध इतर असे समीकरण घडून आले व ते भाजपच्या पथ्यावर पडले.

वाचा सविस्तर…

12:39 (IST) 21 Oct 2024
उद्धव ठाकरे यांची स्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी…

नागपूर : महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची स्थिती वाईट झाली असून त्यांचे हाल पाहावत नाही. त्यांची स्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे.. त्यांच्या मागे कोणी शिल्लक राहिलेले नाही. कोई लौटा दे मेरे बिते हुये दिन अशी त्यांची अवस्था झाली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

वाचा सविस्तर…

12:22 (IST) 21 Oct 2024
मुंबईत अदानीसाठी जागा, मग गिरणी कामगारांसाठी का नाही, संतप्त गिरणी कामगारांचा प्रश्न, मुंबईतच पुनर्वसनाची मागणी

मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली अदानी समूहाला मुंबईतील शेकडो हेक्टर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सविस्तर वाचा…

12:16 (IST) 21 Oct 2024
शिरूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का, ज्ञानेश्वर आबा कटके यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिरूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक समन्वयक, बांधकाम विभाग-पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांचा प्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

12:06 (IST) 21 Oct 2024
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी डोंबिवलीत

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी दुपारी साडे चार वाजता डोंबिवलीतील कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा येथे येत आहेत. कल्याण ग्रामीणमधून मनसेतर्फे राजू पाटील हे एकमेव उमेदवारीचे दावेदार आहेत.

वाचा सविस्तर…

11:48 (IST) 21 Oct 2024
पती कामावर जाताच पत्नी पैशासाठी ठेवायची ग्राहकांशी शारीरिक संबंध

नागपूर : भारी कपडे, महागडा मेकअप आणि फिरायची सवय असलेल्या तरुणीचे कंपनीत मजूर असलेल्या युवकाशी लग्न झाले. घरात जेमतेम पैसे येत असल्यामुळे आर्थिक अडचण येत होती. तरीही पत्नी नेहमी पैशाची मागणी करुन आपली हौस पूर्ण करण्याचा हट्ट करीत होती. पतीच्या तुटपुंज्या पगारात काहीही होणार नाही, असे लक्षात आल्यानंतर पत्नीने थेट शरीरविक्री करण्याचा निर्णय घेतला.

वाचा सविस्तर…

11:40 (IST) 21 Oct 2024
आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ – विजय वडेट्टीवार

महाविकास आघाडीत तीन पक्ष आहे. आघाडी म्हणून लढताना थोडीफार नाराजी राहू शकते. नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ. १७ जागांचा तिढा अद्याप बाकी आहे. उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत सर्व चर्चा संपेल. आम्ही काल हायकमांडबरोबर चर्चा केली. तसेच या जागांचा मार्ग कसा काढायचा यावरदेखील बोललो आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.

11:14 (IST) 21 Oct 2024
“उद्धव ठाकरेच मुख्‍यमंत्री व्‍हावेत..”, आमदार यशोमती ठाकूर यांच्‍या वक्‍तव्‍याची चर्चा

अमरावती : प्रथम सत्ताधारी महायुतीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर महाविकास आघाडी आपला चेहरा जाहीर करेल, असे स्‍पष्‍टीकरण दिले. तरीही मुख्‍यमंत्रीपदाची चर्चा सुरूच आहे. त्‍यातच आता काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्‍यमंत्री व्‍हावेत, असे विधान केल्‍याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.

वाचा सविस्तर…

11:12 (IST) 21 Oct 2024
नागपुरातील गुंडांच्या टोळ्यामध्ये पिस्तूलांचा सर्रास वापर, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय

नागपूर : शहरात गुंडांच्या टोळ्यामध्ये पिस्तूल वापर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक गुन्हेगारांच्या टोळीकडे मध्यप्रदेश-उत्तरप्रदेशातून आणलेल्या देशी बनावटीच्या पिस्तूल आढळून येत आहेत.

वाचा सविस्तर…

11:11 (IST) 21 Oct 2024
मुसळधार पावसाचा ३८ हजार हेक्टरवरील पिकांना फटका; चांदवड, देवळा, पेठमध्ये सर्वाधिक नुकसान

नाशिक : शनिवारी रात्री मुसळधार वादळी पावसाने चांदवड, देवळा, पेठ या तालुक्यांसह सिन्नर, नाशिक आणि निफाड भागास चांगलेच झोडपले. चांदवडमध्ये दोन बंधारे फुटून उमराणे, परसूल भागात तारांबळ उडाली.

वाचा सविस्तर…

11:01 (IST) 21 Oct 2024
भाजपाकडून पहिली यादी जाहीर होताच, देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर घडामोडींना वेग

भाजपाकडून पहिली यादी जाहीर होताच, देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आला आहे. भाजपा नेते भीमराव तपकीर, भारती लव्हेकर, मुरजी पटेल हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले आहेत.

10:58 (IST) 21 Oct 2024
उद्या संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडीची जाहीर करण्याचा प्रयत्न – नाना पटोले

महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणताही वाद नाही. विदर्भातील जागांवरही काहीच वाद नाही. उद्या संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडीची जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

10:43 (IST) 21 Oct 2024
“मी सरन्यायाधीशांच्या पायाचं तीर्थ प्यायला तयार कारण ते विष्णूचे…”; संजय राऊतांची खोचक टीका

अयोध्या प्रकरणाचा निकाल देण्यापूर्वी मी देवाची पूजा करताना देवाकडेच मदत मागितली होती, असं विधान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रियी दिली आहे. ते देवांची प्रार्थना करतात म्हणूनच त्यांनी नरेंद्र मोदींना गणपतीच्या आरतीला बोलवलं होतं. ते संविधानावर विसंबून नाही. कायद्याचं पुस्तक त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाही. त्यांना साक्षात्कार होता, त्यानुसार ते निर्णय घेत असावे, असं लोकांच्या मनात येऊ शकतं. ईश्वराची इच्छा काय त्यापेक्षा संविधानाची इच्छा काय हे महत्त्वाचे आहे. शिवसेनेला न्याय देऊ नका, हे ईश्वराच्या मनात नक्कीच नसेल. विष्णूच्या १३ व्या अवतराचा साक्षात्कार त्यांना झाला असेल आणि त्यानुसार विधानसभेची मुदत संपल्यानंतरही ते आमदारांच्या अपात्रतेचा आणि चिन्हाबाबतचा निर्णय देऊ शकत नसतील, तर नक्कीच मी सरन्यायाधीशांच्या पायाचं तीर्थ प्यायला तयार आहे, कारण ते विष्णूचे १४ वे अवतार असू शकतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरविल्याने मोठा फटका बसलेल्या भाजपने ९९ उमेदवारांच्या यादीत बहुतांश आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. रविवारी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील या पहिल्या फळीतील नेत्यांचा समावेश आहे. मात्र यादी जाहीर होताच अनेक मतदारसंघांत बंडाचे वारे वाहू लागले असून काही नाराज नेते बंडाच्या पवित्र्यात आहेत.