Maharashtra Breaking News Updates, 21 October 2024 : राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपाबाबत राजकीय पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू आहे. यावरू आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणीदेखील सुरु झाली आहे. अशात भाजपाने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दरम्यान, आज किंवा उद्या इतर पक्षांच्या उमेदवारांची यादीही जाहीर होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोघांनीही जागावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर केलेलं नाही. त्यामुळे राजकीय चर्चांनीही उधाण आलं आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत विदर्भातील १२ जागांवरून मतभेद आहेत. यातील काही जागांवर ठाकरे गटाने दावा केला आहे. मात्र काँग्रेस या जागा सोडायला तयार नाही. जागावाटपाचा हा तिढा आता दिल्लीत पोहोचला आहे. महाराष्ट्रातील काही नेते दिल्लीत ठाण मांडून आहेत. दुसरीकडे राज्यात परिवर्तन महाशक्ती आघाडीदेखील स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. याबाबत आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. एकंदरितर राज्यातील राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे.
Maharashtra Breaking News Live Today, 21 October 2024 : भाजपाकडून पहिली यादी जाहीर होताच बंडाचे वारे, जागावाटपाचा तिढा कायम असताना ९९ नावांची घोषणा
परिवर्तन महाशक्ती आघाडीची १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यापैकी ८ जागा प्रहार जनशक्ती पक्षाला तर दोन जागा राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत. राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार, अचलपूरमधून बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रावेरमधून अनिल चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय चांदवड विधानसभा मतदारसंघातून गणेश निंबाळकर, देगलूर बिलोलीमधून सुभाष साबणे, ऐरोलीमधून अंकुश कदम, हदगाव हिमायतनगरमधून माधव देवसरकर, हिंगोलीमधून गोविंदराव भवर, राजुरामधून वामनराव चटप यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिरोळ आणि मिरज या दोन जागां स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत. मात्र, या जागांवर उदेवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.
जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून काही उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे. पहिला एबी फॉर्म भरत गावित यांना देण्यात आला आहे. त्यांना नवापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्याची आल्याची माहिती आहे. भरत गावित हे पूर्वी भाजपात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.
बनावट कागदपत्रांव्दारे बॅंकखाते बनविणारी टोळी गजाआड, नवी मुंबईच्या सायबर पथकाची कारवाई
पनवेल ः न्हावाशेवा या परिसरातील एका व्यक्तीची साडेदहा लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकरणाचा तपास करताना नवी मुंबई पोलीसांच्या सायबर पथकातील ऑनलाईन फसवणूक करणा-या मोठ्या टोळीचा छडा लावला.
कल्याण : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेने पालिका मुख्यालय, डोंबिवलीतील विभागीय मुख्यालयात आयुक्त, उपायुक्त यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येणारे लोकशाही दिन कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते फलाट क्रमांक पाचच्या दरम्यान एक पादचारी पूल उभारणीचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून सुरू आहे. या पुलाच्या कामात अडथळा येत असल्याने फलाट क्रमांक पाचवरील दक्षिण बाजूकडील उतार मार्गिका (रॅम्प) सोमवारपासून प्रवाशांसाठी बंद करण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने घेतला आहे.
अकोला : स्वराज इंडिया पक्षाचे संस्थापक तथा राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांच्या अकोल्यातील सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी गोंधळ घातला.
भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांच्या भाषणादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची घटना घडली आहे. यावेळी योगेंद्र यादव यांचं भाषण बंद पाडण्यात आलं. अकोल्यात आज योगेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनात ‘लोकशाहीची सुरक्षा आणि आपलं मत’ या चर्चेवर विचार सभा सुरू होती. यावेळी योगेंद्र यादव भाषण करत असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी माईक हातातून हिसकावून घेत गोंधळ घातला.
दुर्मीळ आजारामुळे कंबरेपासून खालचा भाग निकामी होऊनही १३ वर्षीय मुलगी पुन्हा उभी राहिली!
पुणे : एका १३ वर्षीय मुलीला दुर्मीळ आणि गंभीर असलेला मणक्याचा क्षयरोग झाला डॉक्टरांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे या मुलीवर उपचार केले. यानंतर १५ दिवसांत तिच्या शरीराच्या कंबरेपासून खालच्या भागाची हालचाल पूर्ववत झाली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच बीडमधील राजकीय घडामोडींवरून भाजपपुढील डोकेदुखीत वाढ होत आहे.
Babanrao Lonikar : विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रयत्नात पराभव झाला तरी मिळालेल्या जवळपास २८ हजार मतांमुळे त्यांचा आत्मविश्वास मात्र वाढला होता.
जेव्हा महायुतीच्या उमेदवाराचे चेहरे समोर येतील, तेव्हा जनता महायुतीला मतदान करेल, जनता महायुतीचा सरकार आणण्यासाठी मतदान करणार आहे. भाजपाची दुसरी आणि तिसरी यादी लवकरच येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड जागा परंपरागत भाजपची आहे, त्यामुळे भाजपकडे राहील असे दिसते, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
तिकीट मागण्याचा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे, संघर्ष वैगेरे काही नाही. उमेदवारी मागणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, मात्र त्या त्या मतदार संघातील त्या पक्षाची स्थिती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिव्ह मेरिटवर जागा वाटप झाल्या तर महाविकास आघाडीच्या बाजूने विदर्भात चांगला निकाल लागेल. दक्षिण नागपूर पारंपारिक आमची जागा राहिली आहे. या ठिकाणी अनेक काँग्रेसचे आमदार निवडूण आले, दक्षिण नागपूरचे पहिले आमदार माझे वडील होते. त्यामुळे हा काँग्रेसचा गड असल्याने आमच्याकडे राहावं ही आमची रास्त मागणी आहे, अशी प्रतिक्रिया अभिजित वंजारी यांनी दिली.
२०१९ च्या निवडणुकीत बडोले यांचा अवघ्या ७०० मतांनी निसटता पराभव झाला होता.
भाजपच्या पहिल्या यादीत भंडारा जिल्ह्यातील तीनपैकी एकाही मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाचा समावेश नाही.
निलेश राणेंचा शिवसेनेच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा शिंदे गटातील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी एका मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता आमदार होणंही अवघड झालं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री सोडा, आता ते आमदार तरी राहतात का?’, असा सवाल करत सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातांवर खोचक टीका केली होती. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखेंना इशारा देत हल्लाबोल केला आहे. “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर”, असं जयश्री थोरात यांनी म्हटलं आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात जयश्री थोरात बोलत होत्या.
रस्त्यात टेम्पो पार्किंग जीवावर बेतले, अपघातात एक ठार
नवी मुंबई : जलद गती मार्गावर वाहन पार्क करणे नियमबाह्य असतानाही शीव पनवेल मार्गावर अनेक ठिकाणी जड अवजड वाहने पार्क केली जातात. अशाच एका बेकायदा पार्क केलेल्या टेम्पोचा अंदाज न आल्याने टेम्पोला एक कार धडकली .
नागपूर : हरियाणातील पराभवानंतर महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक विविध समाजाचे दबाव पक्षावर वाढले आहे. काँग्रेससाठी हरियाणा अनुकूल असल्याचे सर्व सर्वेक्षणातून स्पष्ट झाले होते. परंतु, तेथील जाट समाज विरुद्ध इतर असे समीकरण घडून आले व ते भाजपच्या पथ्यावर पडले.
नागपूर : महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची स्थिती वाईट झाली असून त्यांचे हाल पाहावत नाही. त्यांची स्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे.. त्यांच्या मागे कोणी शिल्लक राहिलेले नाही. कोई लौटा दे मेरे बिते हुये दिन अशी त्यांची अवस्था झाली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली अदानी समूहाला मुंबईतील शेकडो हेक्टर जागा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांनी आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. शिरूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक समन्वयक, बांधकाम विभाग-पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्यातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. ज्ञानेश्वर (माऊली) आबा कटके यांचा प्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी दुपारी साडे चार वाजता डोंबिवलीतील कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा येथे येत आहेत. कल्याण ग्रामीणमधून मनसेतर्फे राजू पाटील हे एकमेव उमेदवारीचे दावेदार आहेत.
नागपूर : भारी कपडे, महागडा मेकअप आणि फिरायची सवय असलेल्या तरुणीचे कंपनीत मजूर असलेल्या युवकाशी लग्न झाले. घरात जेमतेम पैसे येत असल्यामुळे आर्थिक अडचण येत होती. तरीही पत्नी नेहमी पैशाची मागणी करुन आपली हौस पूर्ण करण्याचा हट्ट करीत होती. पतीच्या तुटपुंज्या पगारात काहीही होणार नाही, असे लक्षात आल्यानंतर पत्नीने थेट शरीरविक्री करण्याचा निर्णय घेतला.
महाविकास आघाडीत तीन पक्ष आहे. आघाडी म्हणून लढताना थोडीफार नाराजी राहू शकते. नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ. १७ जागांचा तिढा अद्याप बाकी आहे. उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत सर्व चर्चा संपेल. आम्ही काल हायकमांडबरोबर चर्चा केली. तसेच या जागांचा मार्ग कसा काढायचा यावरदेखील बोललो आहे, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
अमरावती : प्रथम सत्ताधारी महायुतीने आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर महाविकास आघाडी आपला चेहरा जाहीर करेल, असे स्पष्टीकरण दिले. तरीही मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरूच आहे. त्यातच आता काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत, असे विधान केल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.
नागपूर : शहरात गुंडांच्या टोळ्यामध्ये पिस्तूल वापर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक गुन्हेगारांच्या टोळीकडे मध्यप्रदेश-उत्तरप्रदेशातून आणलेल्या देशी बनावटीच्या पिस्तूल आढळून येत आहेत.
नाशिक : शनिवारी रात्री मुसळधार वादळी पावसाने चांदवड, देवळा, पेठ या तालुक्यांसह सिन्नर, नाशिक आणि निफाड भागास चांगलेच झोडपले. चांदवडमध्ये दोन बंधारे फुटून उमराणे, परसूल भागात तारांबळ उडाली.
भाजपाकडून पहिली यादी जाहीर होताच, देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर घडामोडींना वेग आला आहे. भाजपा नेते भीमराव तपकीर, भारती लव्हेकर, मुरजी पटेल हे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले आहेत.
महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणताही वाद नाही. विदर्भातील जागांवरही काहीच वाद नाही. उद्या संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडीची जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.
अयोध्या प्रकरणाचा निकाल देण्यापूर्वी मी देवाची पूजा करताना देवाकडेच मदत मागितली होती, असं विधान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रियी दिली आहे. ते देवांची प्रार्थना करतात म्हणूनच त्यांनी नरेंद्र मोदींना गणपतीच्या आरतीला बोलवलं होतं. ते संविधानावर विसंबून नाही. कायद्याचं पुस्तक त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाही. त्यांना साक्षात्कार होता, त्यानुसार ते निर्णय घेत असावे, असं लोकांच्या मनात येऊ शकतं. ईश्वराची इच्छा काय त्यापेक्षा संविधानाची इच्छा काय हे महत्त्वाचे आहे. शिवसेनेला न्याय देऊ नका, हे ईश्वराच्या मनात नक्कीच नसेल. विष्णूच्या १३ व्या अवतराचा साक्षात्कार त्यांना झाला असेल आणि त्यानुसार विधानसभेची मुदत संपल्यानंतरही ते आमदारांच्या अपात्रतेचा आणि चिन्हाबाबतचा निर्णय देऊ शकत नसतील, तर नक्कीच मी सरन्यायाधीशांच्या पायाचं तीर्थ प्यायला तयार आहे, कारण ते विष्णूचे १४ वे अवतार असू शकतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरविल्याने मोठा फटका बसलेल्या भाजपने ९९ उमेदवारांच्या यादीत बहुतांश आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. रविवारी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील या पहिल्या फळीतील नेत्यांचा समावेश आहे. मात्र यादी जाहीर होताच अनेक मतदारसंघांत बंडाचे वारे वाहू लागले असून काही नाराज नेते बंडाच्या पवित्र्यात आहेत.