मुंबई : विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीने २८८पैकी सव्वादोनशे पेक्षा जास्त जागा जिंकून महाविकास आघाडीला अस्मान दाखविले. एकट्या भाजपला तब्बल १३२ जागांवर विजय मिळाला असून बहुमताच्या जादूई आकडा गाठण्यासाठी पक्षाला केवळ १३ आमदारच कमी पडत आहेत. शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांनीही जोरदार मुसंडी मारत अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांना जोरदार हादरा दिला. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे साफ पानिपत झाले असून प्रथमच राज्याची विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना कामकाज करेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर आणलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’; प्रचार रंगात आला असताना भाजपने चर्चेत आणलेले ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ हे मुद्दे; नेत्यांमधील समन्वय आणि बूथ स्तरावर केलेले अत्यंत काटेकोर नियोजन याचा महायुतीला मोठा फायदा झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्याआडून केलेली मदतही सत्ताधारी युतीच्या पथ्यावर पडल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे घटक पक्षांमधील एकवाक्यतेचा अभाव आणि जागावाटपापासूनच अनेक मुद्द्यांवर मुख्य नेत्यांमध्ये असलेले वाद महाविकास आघाडीला भोवले. परिणामी विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या २९ जागादेखील (एकूण सदस्यांच्या १० टक्के) आघाडीतील एकही पक्ष मिळवू शकला नाही. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर गाफील राहिलेल्या महाविकास आघाडीला पक्षफुटी, संविधान आदी न चालणाऱ्या मुद्द्यांना महत्त्व दिल्याचाही फटका बसला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, धीरज देशमुख, माणिकराव ठाकरे या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निसटता विजय मिळाला. दुसरीकडे महायुतीच्या या ‘त्सुनामी’मध्ये छोटे पक्ष अक्षरश: वाहून गेले. निकालानंतर ‘किंगमेकर’ होण्याची स्वप्ने बघणाऱ्या राज ठाकरे यांचा मनसे आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला भोपळाही फोडता आला नाही.

one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Mahavikas Aghadi News
विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच?
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य

हेही वाचा : Nanded Bypoll Election Result 2024 : काँग्रेससाठी सुखद बातमी! नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजय, अशोक चव्हाणांना मोठा धक्का

महायुतीच्या या घवघवीत यशानंतर आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्कंठा आहे. बहुमताच्या अगदी जवळ पोहोचल्यामुळे आपलाच मुख्यमंत्री असावा, अशी भाजपच्या तमाम नेत्यांची भूमिका असली, तरी महायुतीचे नेते तसेच भाजपचे केंद्रीय नेते एकत्र येऊन मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील, असे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपदाबरोबरच महायुतीमधील घटक पक्षांना किती आणि कोणती खाती मिळणार, याची चर्चाही सुरू झाली आहे.

जनतेने विरोधकांना कृतीतून उत्तर दिले आहे. लोकशाहीमध्ये चांगला विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांचा सन्मान केला जाईल आणि त्यांचा आवाज छोटा किंवा मोठा असला तरी त्याला प्रतिसाद दिला जाईल. – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

हेही वाचा :CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्व विजयी उमेदवारांबरोबर बैठक, मित्र पक्षाबरोबर चर्चा करण्याबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

करोनाकाळात कुटुंबप्रमुखाप्रमाणे माझे ऐकणारा महाराष्ट्र असा वागेल असे वाटले नव्हते, काहीतरी गडबड आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित, अनाकलनीय आहे. पटला नाही तरी निकाल लागलेला आहे, कोणत्या रागापोटी ही लाट उसळली कळत नाही. – उद्धव ठाकरे, शिवसेना (ठाकरे गट)

महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आजवर अनेक निवडणुका पाहिल्या. पण, अशी निवडणूक यापूर्वी झाली नव्हती. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, अशा सर्वांनीच आम्हाला मते दिली. इतक्या मोठ्या विजयाबद्दल जनतेला दंडवत घालतो. – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Story img Loader