सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि पुर्वाश्रमीचे भाजपचे, सध्याचे महाविकास आघाडी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले असतानाच दिपावली निमित्त एकत्रित श्री देव विठ्ठल मंदिर मध्ये आरती केली. संविधानाने दिलेल्या मताच्या अधिकाराचा वापर करून अनिष्ट प्रवृत्ती, नरकासुराला हरविण्याचे दोघांनीही दिपावली शुभेच्छा देताना आवाहन केले आहे.

सावंतवाडी येथील श्री देव विठ्ठल मंदिर मध्ये भल्या पहाटे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली यांनी हजेरी लावली. या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी मनोभावे प्रार्थना करत आरतीत सहभाग घेतला आणि शुभेच्छाही दिल्या. नरकासुर दहनानंतर दीपावली निमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. सावंतवाडी येथील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिर येथे पहाटे सावंतवाडीकर नतमस्तक झाले. विधानसभेचे प्रतिस्पर्धी उमेदवार देखील या निमित्ताने एकत्र दिसून आले.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
call has been made to destroy Ranamodi plant by burning it during Narakasura and Holi festival
वनस्पती रानमोडीचा नरकासूर‌ समजून दहन
There was no attack on BJP rebel candidate Vishal Parab car
भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला नाही,तो वाट चुकलेला परप्रांतीय कामगार
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा

हे ही वाचा… वनस्पती रानमोडीचा नरकासूर‌ समजून दहन

दीपावली निमित्त सावंतवाडीकर श्री विठ्ठल रखुमाई चरणी नतमस्तक झाले. पहाटेच्या काकड आरती प्रसंगी महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राजन तेली एकत्र दिसून आले. दोघांकडून विठ्ठलाचे दर्शन घेत आराधना करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना दीपक केसरकर व राजन तेलींकडून दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Story img Loader