कर्जत : राज्यातील लक्षवेधी असणाऱ्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमधून आमदार रोहित पवार यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर,खासदार अमोल कोल्हे हे उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील सर्व तीर्थक्षेत्रांची भेट देऊन दर्शन घेत यानंतर आमदार रोहित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवार अर्ज भरल्यानंतर कर्जत येथील गोदड महाराज मंदिरामध्ये कर्जत व जामखेड तालुक्यातील वारकरी संप्रदायामधील अनेक मंडळी उपस्थित होते. या सर्वांचे आशीर्वाद रोहित पवार यांनी घेतले.
अक्काबाई मंदिरापासून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये हजारो नागरिक सहभागी झाले भव्य अशा सजवलेल्या गाडीमध्ये अमोल कोल्हे भूषण सिंह राजे होळकर व रोहित पवार हे नागरिकांना अभिवादन करत होते. यावेळी रस्त्यावर पुष्पवृष्टी करण्यात येते होती. जोरदार घोषणाबाजी हातामध्ये रोहित पवार यांचे बॅनर तुतारीची चिन्ह घेऊन कार्यकर्ते उत्साहाने फिरसे वादा रोहित दादा असे म्हणत नाचत होते.
हेही वाचा >>> पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पण प्रतिज्ञापत्रातील ‘या’ नोंदीमुळे अडचणीत येण्याची शक्यता!
दुपारी दोन वाजता आमदार रोहित पवार यांनी कर्जत तहसील कार्यालयामध्ये येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ह भ प प्रकाश महाराज जंजिरे, ह भ प वामन खराडे गुरुजी याच पमाणे रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार, वडील राजेंद्र पवार, पत्नी कुंती व मुले उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला.