Maharashtra Vidhan Sabha Election : विधानसभेत १० मोठ्या नेत्यांचा पराभव; काँग्रेस, भाजपा, प्रहारसह राष्ट्रवादीतील दिग्गजांचा पराभवात समावेश

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्यामुळे दिग्गजांना धक्का बसला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election
(फोटो-प्रातिनिधिक छायाचित्र)

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज (२३ नोव्हेंबर) रोजी जाहीर झाला. विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. खरं तर ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी अटीतटीची होईल असं अनेकांना वाटलं होतं. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत उलट निकाल लागला आणि महाविकास आघाडीला धक्का बसला. एवढंच नाही तर काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्यामुळे दिग्गजांना धक्का बसला आहे.

बाळासाहेब थोरातांचा पराभव

विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचा पराभव झाला आहे. संगमनेरमधून थोरात पराभूत झाले आहेत. ते आत्तापर्यंत त्यांनी आठवेळा निवडणूक लढवली होती आणि ते एकदाही हरले नव्हते. मात्र आता नवव्या वेळी त्यांचा पराभव झाला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो.

Maharashtra Assembly Election 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : “प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यास रोखलं”, सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
marathi muslim seva sangh on vote jihad
‘व्होट जिहाद’ हा भाजपाचा दुष्प्रचार, मराठी मुस्लिम सेवा संघाचा आरोप
Kishor Patkar latest marathi news
नवी मुंबई: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी किशोर पाटकर, बंडाच्या हंगामात पक्ष जोडणीचे आव्हान
maharashtra vidhan sabha election 2024
विधानसभा निवडणुकीत चंद्रपुरात भाजपला गटबाजीचे ग्रहण
Mumbai BJP President Adv Ashish Shelar will contest the election from West Assembly Constituency Mumbai print news
वांद्रे पश्चिम मतदारसंघात आशिष शेलार यांची प्रतिष्ठा पणाला
Ghatkopar East, Prakash Mehta, Parag Shah,
अखेर प्रकाश मेहता आणि पराग शाह यांचे मनोमिलन

हेही वाचा : राज ठाकरेंची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अविश्वसनीय..”

पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे. भाजपाचे डॉ. अतुलबाबा भोसले हे या मतदारसंघातून विजयी ठरले आहेत. महाविकास आघाडीची मोट बांधण्याकरता पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर होते. तसंच, महाविकास आघाडीची सत्ता आल्यास पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होऊ शकतील, अशी शक्यताही बांधली जात होती. परंतु, त्यांचा दारुण पराभव झाला आहे.

यशोमती ठाकूर यांचा पराभव

काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा तिवसा विधानसभा मतदारसंघात पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात भाजपाचे राजेश वानखडे विजयी झाले आहेत. खरं तर राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाल्यामुळे काँग्रेसला धक्यावर धक्के बसले आहेत.

धीरज देखमुखांचा पराभव

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर ग्रामीणमधून धीरज देखमुख यांचा पराभव झाला आहे. धीरज देखमुख यांच्यासाठी अभिनेता रितेश देशमुख यांचा प्रचार केला होता. मात्र, तरीही धीरज देखमुख यांचा पराभव झाल्यामुळे मोठा धक्का बसला.

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव

विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यामध्ये कसबा पेठ मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात भाजपाचे हेमंत रासने यांचा विजय झाला आहे.

प्रहारचे बच्चू कडू यांचा पराभव

आमदार बच्चू कडू यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. बच्चू कडू यांच्या विरोधातील महायुतीचे उमेदवार प्रविण तायडे विजयी झाले आहेत. बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीला आव्हान दिलं होतं.

संजयकाका पाटील यांचा पराभव

तासगाव-कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघात सांगलीचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव झाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला होता. तसेच लोकसभेची निवडणूक त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून लढवली होती. मात्र, त्यातही त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीतही संजयकाका पाटील यांचा पराभव झाला. या मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे रोहित पाटील यांचा विजय झाला आहे.

शशिकांत शिंदेंचा पराभव

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांचा कोरेगाव मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे महेश शिंदे हे विजयी झाले आहेत. महत्वाचं म्हणजे शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतही शशिकांत शिंदे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

राम सातपुतेंचा पराभव

भारतीय जनता पक्षाचे आमदार राम सातपुते यांचा माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उत्तमराव जानकर यांनी पराभव केला. त्यामुळे आमदार राम सातपुते यांना मोठा धक्का बसला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra vidhan sabha election result 2024 bjp congress shivsena ncp defeat of 10 great leaders in maharashtra politics gkt

First published on: 23-11-2024 at 20:50 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या