Girish Kuber on BJP Winning in Maharashtra Election Result 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चे निकाल आता जाहीर झाले असून त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. २८८ पैकी २३५ जागांवर घवघवीत यश मिळवून महायुती पुन्हा सत्तारूढ होणार असून मविआतील सर्व पक्षांना मिळून अवघ्या ४९ जागा मिळाल्या आहेत. त्याव्यतिरिक्त अपक्ष व इतर पक्ष मिळून ४ ठिकाणी उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व असा विजय मिळाल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांचा विजय व विरोधकांचा पराभव याचं मूल्यांकन केलं जात आहे. यासंदर्भात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण केलं आहे.

तीन ‘C’ आणि विजयाची ‘रेसिपी’!

गिरीश कुबेर यांनी महायुतीच्या विजयामागे तीन ‘C’ अर्थात Cash (पैसा), Cast (जातीय गणितं) व Communalism (धार्मिक ध्रुवीकरण) या घटकांचा मोठा वाटा असल्याचं विश्लेषण मांडलं. “कास्ट, कॅश आणि कम्युनॅलिजम या तीन ‘सीं’नी क्रॉप या चौथ्या ‘सी’वर मात केली असं म्हणता येईल. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या हातात रोख रक्कम देण्याची राजमान्य पद्धत स्वीकारली गेली. त्याचा प्रचंड फायदा झाला”, असं ते म्हणाले.

Ladki Bahin Yojana Next Installment Date
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात दलित आणि ओबीसींना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न? नेमकं कारण काय?
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?

Maharashtra Election Winner Candidate List: राज्याच्या २८८ मतदासंघांमध्ये नेमकं काय घडलं? वाचा विजेत्यांची संपूर्ण पक्षनिहाय यादी!

“निवडणुकीचं वारं बदलतंय याचं पहिलं चिन्ह मतदानाच्या दिवशी महिला सण-समारंभासारख्या सजून मतदानासाठी रांगेत उभ्या राहिल्याचं दिसणं हे होतं. तेव्हा पहिल्यांदा लक्षात आलं की महिला मतदार निर्णायक ठरणार आहेत”, असं त्यांनी नमूद केलं.

दुसरा ‘C’ – जातीय समीकरणं…

“दुसरा मुद्दा कास्टचा. लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा मोठा फटका भाजपाला बसला. भाजपानं त्यावर मात करण्यासाठी मराठा आंदोलनाला हात न लावता किंवा त्यांना आव्हानं न देता त्यांच्याविरोधात तितक्याच सक्षम असणाऱ्या छोट्या जातींचं एकत्रीकरण यशस्वीपणे केलं. त्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी गेल्या चार महिन्यात गावोगावी जाऊन जवळपास साडेतीनशे बैठका घेतल्या. त्याची चर्चा फारशी कुठेही झाली नाही. तो मुद्दा अतिशय निर्णायक ठरला”, असं विश्लेषण गिरीश कुबेर यांनी केलं.

“मराठा एकगठ्ठा मतदारांना छोट्या छोट्या अनेक गटांच्या मतदारांनी एकत्रितपणे निष्प्रभ केलं. साधं उदाहरण द्यायचं तर २४ वर्षांच्या एका पैलवानाला ८ वर्षांच्या तीन काडी पैलवानांनी आव्हान द्यावं तसं या छोट्या गटांना एकत्र करून भाजपानं हा मुद्दा निष्प्रभ ठरवला. त्यामुळे ‘कास्ट’ हा मुद्दा त्यांच्या बाजूने गेला”, असं गिरीश कुबेर आपल्या विश्लेषणात म्हणाले.

NCP Sharadchandra Pawar Winner Candidate List: शरद पवारांचे किती शिलेदार जिंकले आणि कोण पराभूत झाले? पाहा संपूर्ण यादी

तिसरा ‘C’ – धार्मिक ध्रुवीकरणाचं गणित

दरम्यान, महायुतीला मदत करणारा तिसरा घटक म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण असल्याचं विश्लेषण गिरीश कुबेर यांनी मांडलं. “जातीच्या मुद्द्याला अतिशय चतुरपणे धर्मवादाची जोड दिली गेली. बटेंगे तो कटेंगे हे त्याचं उदाहरण. याचा प्रभाव शहरांमध्ये पडला. शहरी सुस्थितीत असलेला वर्ग भाजपाचा मतदार आहे. सामाजिक स्थैर्य आल्यानंतर धार्मिक भावना वाढीस लागते असं जगभर आपण बघतो. त्याचप्रकारे हे मतदान झालं”, असं ते म्हणाले.

“या तीन ‘सीं’नी भाजपाच्या विरोधात जाणाऱ्या क्रॉप या चौथ्या ‘सी’वर मात केली. पिकांचे पडलेले दर हा भाजपाविरोधातला मोठा मुद्दा असेल असं मानलं जात होतं. विशेषत: विदर्भ आणि मराठवाडा. सोयाबीन, कापूस, कांद्याच्या भावाचा मुद्दा होता”, असं ते म्हणाले.

‘चमचमीत यशाची रेसिपी’

“देशात मतदारांना लाभार्थी करण्याचा प्रयत्न चालू असताना महाराष्ट्रात त्याला यश आलं. त्याला जात आणि धर्माची फोडणी दिली तर तो बनणारा पदार्थ निवडणुकीतलं चमचमीत यश देतो असं दुर्दैवानं म्हणावं लागेल. हा विरोधकांना मोठा धडा आहे. यातून ते किती सावरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल”, अशा शब्दांत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचं विश्लेषण गिरीश कुबेर यांनी केलं.

Story img Loader