Maharashtra Politics Updates : महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्यानेच बहुधा शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषाही मंगळवारी सौम्य झाली. या साऱ्या घडामोडींमधून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीतून चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. तसंच, लवकरच महायुतीची संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे. यातच मुख्यमंत्री पदाचा तोडगा निघू शकेल. तोवर राज्याला प्रतीक्षाच करावी लागणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडी जाणून घेऊयात.
Maharashtra Breaking News Live Updates : राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? जनसामान्यांनाही पडला प्रश्न!
Live : मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, "निवडणुकीच्या पूर्वीही..."
आम्ही सर्व एकत्रितच आहोत. आमच्या महायुतीत मतभेद नाहीत. आम्ही निवडणुकीच्या पूर्वीही सांगितलं होतं. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. सर्वांच्या मनातील किंतू परंतू एकनाथ शिंदे यांनी दूर केले - देवेंद्र फडणवीस</p>
कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात शुक्रवारी पाणी नाही
एमआयडीसीमार्फत जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद राहणार आहे.
मुंबई : दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या पित्याला अटक
बोरिवली येथील ९ व १० वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांच्या पित्याला अटक केली आहे.
कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर राबविणार आता एम. आर्चची प्रवेश परीक्षा
कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून आर्किटेक्चर पदव्युत्तर पदवी प्रवेश परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ३०९ मच्छीमारी नौकांना मत्स्य विभागाने डिझेल परतावा नाकारला
रत्नागिरी जिल्ह्यातील नौकाधारकामधील ३०९ नौकाधारकांकडे नौकाच्या पुर्तेत त्रुटी आढळल्याने मत्स्य विभागाकडून या नौकांना डिझेल परतावा यादीतून वगळण्यात आले आहे. मत्स्य विभागाकडून जिल्ह्यातील मच्छीमार नौकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १ हजार ४७३ यांत्रिकी नौकांपैकी १ हजार १६४ नौकाधारकांकडे योग्य स्वरुपाचे दस्तऐवज आणि नौका आढळल्या. मात्र ३०९ नौकाधारकांकडे योग्य स्वरुपाचे दस्त नसल्याने डिझेल परतावा थांबवण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील डिझेल नौकांची तपासणी प्रभारी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त आनंद पालव यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सुरू केली. मच्छीमार नौकेचे नोंदणी प्रमाणपत्र, मासेमारी व बंदर परवान्यासह अनेक बाबींची पडताळणी करण्यात आली. यामध्ये वैध कागदपत्रे तसेच नौकेची रास्त परिस्थिती लक्षात घेऊन प्रमाणपत्र देण्यात येते.
Maharashtra Live News : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर काँग्रेसची बोचरी टीका, म्हणाले...
महाराष्ट्रात पाशवी बहुमत मिळाल्यानंतरही सरकार बनवण्यासाठी सुरू असलेला गोंधळ संशयास्पद आहे. एकनाथ शिंदे काहीही म्हणत असतील, पण वरून त्यांच्यावर दबाव आला आहे. दबावातून हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आधी का नाही केला - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस</p>
चिपळूण सावर्डेत कात फॅक्टरीतून ८० लाखांचा अवैध खैर जप्त, नाशिकच्या वन विभागाची मोठी कारवाई
नाशिकच्या हवेत खैर तस्करी प्रकरणाचे धागेदाेरे थेट चिपळूणपर्यंत पाेहाेचल्याने मंगळवारी नाशिकच्या वन विभागाने तालुक्यातील तीन कातभट्ट्यांवर छापा टाकला.
तुळजाभवानी देवीच्या मंदिर जीर्णोध्दारास प्रारंभ; पुजारी, भाविकांच्या कामाबाबत सूचनांना प्राधान्य – राणाजगजितसिंह पाटील
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तिर्थक्षेत्राचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी दोन हजार कोटींचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे.
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून कोकणात भराडी आईचे दर्शन
राज्यात महायुतीचा विजय व्हावा आणि महायुतीचे सरकार राज्यात स्थापन व्हावे, असे साकडे भराडी आईला घातले होते.
विधानसभेच्या मतदानावरून मातंग समाजातील महिला पुरुषांना मारहाण
धाराशिव : विधानसभा निवडणुकीत आमच्या सांगण्यावरून मतदान का केले नाही म्हणून परंडा तालुक्यातील कपीलापुरी येथील मातंग समाजातील महिला पुरुषांना लोखंडी रॉडने मारहाण करून चार जणांना जखमी केल्याची घटना घडली आहे . या प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन यांच्यासह बारा जणांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की कपीलापुरी ता. परंडा येथील मातंग समाजातील महिला पुरुषांना आम्ही सांगितलेल्या उमेदवाराला मतदान का केले नाही? असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने चार जणांना बेदम मारहाण केली आहे. यात एका तरुणाच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. जखमीवर येथील उपजिल्हा रुणालयात उपचार करण्यात आले .
Maharashtra Live News : "माझ्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत...", एकनाथ शिंदेंनी दिलं महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन
आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारे लोक आहेत. एवढा मोठ विजय मिळाला. या विजयाची आतापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक गणना होत आहे. यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण म्हणजे जीव तोडून मेहनत केली. लोकांमध्ये गेलो. घरी बसलो नाही. जे काही काम केलं ते मनापासून केलं. माझ्या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत मी जे काम करेन ते महाराष्ट्राच्या जनते करताच करेन. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं हा माझा उद्देश होता.
Live News : मुख्यमंत्रीपदावरून माघार घेण्यापूर्वी पंतप्रधान मोदींशी काय बोलणं झालं? एकनाथ शिंदेंनी प्रत्येक शब्द सांगितला
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरील त्यांचा दावा सोडला आहे. त्यांनी आज (२७ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. राज्यात महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र भाजपाकडून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली पाहून शिंदे यांनी माघार घेतली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “भाजपा व त्यांचं दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाबाबात व नव्या सरकारबाबत जो काही निर्णय घेईल तो निर्णय मला व शिवसेनेला मान्य असेल”. तसेच शिंदे यांना यावेळी विचारण्यात आलं की नव्या सरकारमध्ये तुमची भूमिका काय असेल? त्यावर शिंदे म्हणाले, “उद्या दिल्लीत आमच्या तिन्ही पक्षांची बैठक होईल. त्या चर्चेत माझी महायुतीच्या सरकारमधील भूमिका ठरेल”.
Eknath Shinde : सरकार स्थापनेसंदर्भात नरेंद्र मोदींनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य – एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांचं स्वागत केलं. निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच तुम्ही भेटत आहात. तुमच्या माध्यमांतून सगळ्या मतदारांचे आभार मानतो. हा जो विजय आम्हाला मिळाला तो अभूतपूर्व विजय आहे. गेल्या अनेक वर्षांत असा निकाल जनतेने दिलेले नाही. मागच्या अडीच वर्षात महायुतीने उत्तम काम केलं आहे. एकीकडे विकासकामं केली, महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली असंही एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच दुसरीकडे कल्याणकारी योजना राबवल्या. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली असंही एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं आहे. मी कार्यकर्त्यांचेही आभार मानतो असंही एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
Eknath Shinde PC Live : उपमुख्यमंत्री पद आणि मंत्रिमंडळ कसं असणार? एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाबाबत उद्या अमित शहांच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीत तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित असणार आहेत - एकनाथ शिंदे
Eknath Shinde PC Live : "मी मोदींना फोन करून सांगितलंय की...", मुख्यमंत्री पदाबाबत शिंदेंनी काय चर्चा केली?
कुठेही घोडं अडलेलं नाही. मी मोकळ्या मनाचा माणूस आहे. मी काहीही ताणून धरलेलं नाही. मी सांगितलं की सगळ्या पदांपेक्षाही लाडका भाऊ ही ओळख मोठी आहे. मी स्वतः मोदींना मी फोन केला होता, फोन करून सांगितलं की सरकार बनवताना, तुम्हाला निर्णय घेताना माझी अडचण असेल असं कधीही मनात आणू नका. तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षे संधी दिली. या राज्याचा विकास करण्याकरता.. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या. तुमचा निर्णय घ्या. महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजपासाठी अंतिम असेल तसा आमच्यासाठीही अंतिम असेल. माझी अडचण नसेल. मी काल मोदींना, अमित शाहांना फोन केला. माझ्या भावना सांगितल्या. सरकार बनवताना माझा कोणताही अडसर नसणार हे मी सांगितलं आहे.
आमच्यावर जो मतांचा वर्षाव झाला तो आमच्या कामामुळे झाला. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी माझी ओळख निर्माण झाली. ही ओळख मला सर्व पदांपेक्षा मोठी वाटते.
मी स्वतःला मुख्यमंत्री समजलो नाही. मी स्वतःला कॉमन मॅन समजत होतो. कॉमन मॅनमध्ये जाताना मला अडथळा येत नव्हता. - एकनाथ शिंदे</p>
मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलोय, त्यांच्या वेदना व्यथा पाहिल्या आहेत. आई, पत्नीचा विषय मांडला. कसे ते काटकसर करायचे, कसं घर महिना चालवायचे, कसं त्यांचं नियोजन असायचं ते माझ्या डोक्यात पहिल्यापासून होतं. ज्यादिवशी अशाप्रकारचा अधिकार माझ्याकडे येईल तेव्हा सर्वसामान्य लोकांसाठी लाडक्या बहिणी, भाऊ शेतकरी, ज्येष्ठांसाठी रुग्णांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे. अशी भावना माझ्या मनात होती. शेवटी त्यातून जावं लागतं माणसाला. त्यातून ते जात असतात. - एकनाथ शिंदे
https://www.youtube.com/watch?v=m5i0pZnYYbA&feature=youtu.be
७५ वर्षीय वृद्धाची ११ कोटींची सायबर फसवणूक, नामांकीत ब्रोकरच्या नावाने बनावट मोबाइल ॲप
शेअर बाजारातील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ७५ वर्षीय निवृत्त व्यक्तीची ११ कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार कुलाबा परिसरात घडला.
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाटांचे आजपासून क्रमांक बदलले, फलाट क्रमांक ‘१०’ऐवजी ‘९ ए’ आणि फलाट क्रमांक ‘१० ए’ऐवजी ‘१०’
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दादर स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल केल्याची घोषणा केली.
वैमानिक तरूणीची मुंबईत आत्महत्या, पवई पोलिसांनी केली मित्राला अटक
दिल्लीतील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय वैमानिक तरूणीच्या आत्महत्या प्रकरणी पवई पोलिसांनी २७ वर्षीय मित्राला अटक केली आहे.
प्राधिकरण दर्जासाठी प्रस्ताव; ‘झोपु’ योजनेसाठी स्वमालकीच्या भूखंडांवरील योजनेसाठी पालिकेची मागणी
मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना आता विविध सरकारी प्राधिकरण आणि महामंडळांच्या माध्यमातून मार्गी लावल्या जात आहेत.
अण्णा भाऊ साठे स्मारकाचा मार्ग मोकळा, झोपु प्राधिकरणाकडून निविदा प्रसिद्ध; ३०५ कोटी खर्च करून पाच मजली इमारतीची उभारणी
सुमारे ३०५ कोटी रुपये खर्चाच्या या स्मारक प्रकल्पासाठी वास्तुरचनाकार आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी मंगळवारी झोपु प्राधिकरणाने निविदा प्रसिद्ध केली.
मुंबई : डोंगरीमधील इमारतीला भीषण आग
डोंगरी येथील निशाण पाडा मार्गावरील ‘अन्सारी हाईट्स’ या १५ मजली इमारतीला बुधवारी दुपारी १ च्या सुमारास भीषण आग लागली.
CM Eknath Shinde Live : एकनाथ शिंदे महायुतीच्या बाजूनेच बोलतील, भाजपा नेत्यांचा दावा
एकनाथ शिंदे महायुतीच्या बाजूने बोलतील, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या संबंधित नेत्यांना संभाव्य मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देणे स्वाभाविक आहे, परंतु अंतिम निर्णय हा जनतेच्या जनादेशाशी जुळला पाहिजे. भाजपाला मिळालेले प्रचंड जनसमर्थन नजरेआड करता येणार नाही- सुधीर मुनगंटीवार
काळजीवाहू मुख्यमंत्री थोड्याचवेळात पत्रकारांशी संवाद साधणार आहे. निवडणूक निकालानंतर ते बरेच दिवस माध्यमांसमोर आले नाहीत. ते नाराज असल्याची चर्चा आहेत. दरम्यान, आज त्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून आज तो मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं जातंय.
इथे पाहा लाईव्ह प्रक्षेपण - https://www.youtube.com/live/m5i0pZnYYbA
विधानसभेतील धक्कादायक निकालानंतर अखेर मनसेने मौन सोडलं, ईव्हीएमवर संशय; भाजपावरही फसवणुकीचा दावा!
१२८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करून एकही जागा न पटकावलेल्या मनसेने गेले काही दिवस शांततेची भूमिका घेतली होती. परंतु, आता त्यांनीही त्यांची चुप्पी तोडली असून मनसेचे अविनाश जाधव यांनी ईव्हीएमवर रोख ठेवला आहे. तसंच, महायुतीने मनसेची फसवणूक केल्याचंही अविनाश जाधव म्हणाले.
पालिकेच्या परिवहन सेवेच्या भंगार बसला आग लागण्याचे सत्र सुरूच; पुन्हा नालासोपाऱ्यात आग दुर्घटना
नालासोपारा पूर्वेच्या भागात पालिकेच्या परिवहन सेवेच्या भंगार बसला आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पुन्हा एकदा भंगार बस ने पेट घेतला आहे. सविस्तर वाचा…
कार्ला गडावर जात आहात ? …रज्जू- मार्गाने जा
कार्ला येथील एकविरा देवी मंदिराकडे जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) तयार करण्यात येणाऱ्या रज्जू मार्गाचे काम आता लवकरच सुरू होणार आहे. सविस्तर वाचा…
हरित क्रांतीतील स्वामिनाथन यांच्याप्रमाणेच जैवइंधन क्रांतीत प्रमोद चौधरींचे मोठे योगदान! गडकरी यांचे गौरवोद्गार
जैवइंधनातील प्रगतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. यातून गावे सशक्त होणार असून, ग्रामीण भागातून शहरात स्थलांतर करण्याचे प्रमाण कमी होईल. देशात हरित क्रांतीत एम.एस.स्वामिनाथन यांचे योगदान मोठे होते. सविस्तर वाचा…
पिंपरी-चिंचवडमध्ये दर वर्षी तीन हजार झाडांवर कुऱ्हाड?
महापालिकेकडून दर वर्षी किमान एक लाख वृक्षारोपण केले जात असले, तरी दर वर्षी महापालिकेकडूनच सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक झाडे तोडण्यास परवानगी देण्यात येते. शिवाय विनापरवाना झाडांंवर कुऱ्हाड घालण्यात येत असल्याने शहरातील झाडांची संख्या घटत असल्याचे निदर्शनास आले आहे. सविस्तर वाचा…
Maharashtra Breaking News Live Updates : राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? जनसामान्यांनाही पडला प्रश्न!