Maharashtra Politics Updates : महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असली तरी पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आल्यानेच बहुधा शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. आधी आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांची भाषाही मंगळवारी सौम्य झाली. या साऱ्या घडामोडींमधून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीतून चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. तसंच, लवकरच महायुतीची संयुक्त बैठक होण्याची शक्यता आहे. यातच मुख्यमंत्री पदाचा तोडगा निघू शकेल. तोवर राज्याला प्रतीक्षाच करावी लागणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडी जाणून घेऊयात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Breaking News Live Updates : राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? जनसामान्यांनाही पडला प्रश्न!

13:50 (IST) 27 Nov 2024

https://www.loksatta.com/nashik/potholes-on-pune-nashik-highway-reason-behind-several-accidents-zws-70-4737471/

महाराष्ट्र नवनिर्माणाची स्वप्ने पाहणाऱ्या मनसेला विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. २८८ पैकी १२८ जागा लढविलेल्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही.

सविस्तर वाचा…

13:49 (IST) 27 Nov 2024

नाशिक-पुणे मार्गावरील गुरेवाडी चौफुली खड्ड्यांमुळे अपघातप्रवण; अपघात वाढत असताना टोल कंपनीची डोळेझाक

नाशिक ते पुणे महामार्गावरील सिन्नर बाह्य वळण रस्त्यावरील खड्डे अपघातांना नियंत्रण देत आहेत. या मार्गावरील गुरेवाडी चौफुलीवर खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात घडत आहेत. सोमवारी याच ठिकाणी भरधाव खासगी बसने मोटारीला दिलेल्या धडकेत महिला वैद्यकीय अधिकारी जखमी झाली. सविस्तर वाचा…

13:47 (IST) 27 Nov 2024

भव्य धान्य गोदाम उभारणीसाठी सात सोसायट्यांशी करार

नाशिक – केंद्र सरकारच्या ‘सहकार से समृद्धी’ योजनेंतर्गत विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून ५०० ते एक हजार मेट्रिक टन क्षमतेची भव्य धान्य गोदामे उभारण्यात येणार आहेत. आशिया खंडातील ही सर्वात भव्य धान्य गोदामे असतील. या माध्यमातून धान्य साठवणुकीचा प्रश्न मार्गी लागेल, याकडे लक्ष वेधले जात आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात सात विविध कार्यकारी सोसायट्यांशी करार प्रक्रिया पार पडली.

जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास एनसीसीएफचे प्रकल्प संचालक तपसकुमार राय, जिल्हा बँकेचे प्रशासक प्रतापसिंग चव्हाण, सहकार विभागाचे प्रदीप महाजन आदींसह सहकारी सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय सहकार मंत्रालय, नाबार्ड व राज्य सहकार विभागाचा हा उपक्रम आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तो राबविला जाईल. उत्तम आर्थिक स्थिती असलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांची यासाठी निवड केली जाईल. सोसायट्यांना यासाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा वित्त पुरवठा केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील किमान ५० विविध कार्यकारी सोसायट्यांची गोदाम उभारणीसाठी निवड केली जाणार आहे. प्रारंभीचे दोन वर्ष व्याज आकारणी केली जाणार नाही. त्यानंतर केवळ एक टक्का इतके व्याज द्यावे लागणार आहे. विकास सोसायट्यांना गोदाम उभारणीतून अर्थाजर्नाची संधी असल्याकडे राय यांनी लक्ष वेधले.

13:33 (IST) 27 Nov 2024

Maharashtra Live News : महाविकास आघाडी फुटणार? आगामी निवडणुकांत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा सूर!

काही लोकांचा सूर आहे की स्वतंत्रपणे लढलं पाहिजे. बऱ्याच लोकांनी म्हटलंय की शिवसेनेने स्वतंत्रपणे लढलं पाहिजे. शेवटी सत्ता येणं किंवा न येणं. पण शिवसेना एका विचाराने काम करणारी संघटना आहे. बऱ्याच जणांनी विचार व्यक्त केला आहे. हे सत्य आहे की शिवसेना म्हणून पूर्ण ठिकाणी संघटन उभं करून निवडूक लढली पाहिजे – अंबादास दानवे, विधान परिषद आमदार, शिवसेना (उद्धव ठाकरे)

13:12 (IST) 27 Nov 2024
Maharashtra Live News : “एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा रस्ता मोकळा करावा”, भाजपाकडून मागणीला जोर!

जनतेने आम्हाला कौल दिला आहे. मोठा भाऊ असलो तरीही लहान भावाला सिंहासनावर बसवलं होतं. त्यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राची प्रगती झाली. मागच्या वेळी मोठा भाऊ म्हणून आम्ही त्यांना सिंहासनावर बसवलं होतं. आता यावेळी मनाचं औदार्य दाखवून मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा. देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, याकरता परमेश्वराकडे साकडे – अजित गोपाछडे, राज्यसभा खासदार, भाजपा</p>

12:42 (IST) 27 Nov 2024

मनोजदादा जिंकलात; तुम्ही तर ‘जायंट किलर’, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मनोज घोरपडेंचे कौतुक

कराड : ‘मनोजदादा जिंकलात तुम्ही, अभिनंदन.., तुम्ही तर ‘जायंट किलर’ ठरलात…’ अशा शब्दांत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘कराड उत्तर’चे नवनिर्वाचित आमदार मनोज भीमराव घोरपडे यांचे कौतुक व अभिनंदन केले. मनोज घोरपडे यांनी कराड उत्तरमधून सलग पाच वेळा जिंकलेल्या माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांचा ४३ हजार ६९१ मताधिक्याने दारुण पराभव केला. निमित्ताने मनोज घोरपडे यांनी बंधू संग्राम घोरपडे तसेच कृष्णत शेडगे व सहकाऱ्यांसह देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर सदिच्छा भेट घेतली. आमदार शिवेंद्रराजे भोसले हेही उपस्थित होते. फडणवीस यांनी मनोज घोरपडे यांचा या वेळी सत्कार करताना, त्यांचे तोंड भरून कौतुकही केले.

12:41 (IST) 27 Nov 2024

Maharashtra Live News : शिंदे-फडणवीसांमध्ये मुख्यमंत्री पदावरून अडलं, अजित पवारांची भूमिका काय? राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाने स्पष्टच सांगितलं…

राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण असणार? हा एकमेव प्रश्न राज्यात सर्वाधिक विचारला जात आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री पदाचा पेच निर्माण झाल्याने सरकार स्थापन होण्यासही अडचणी येत आहेत. दरम्यान, यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची काय भूमिका आहे हेही पाहणं महत्त्वाचं आहे.

सविस्तर वृत्त वाचा

12:39 (IST) 27 Nov 2024

ठाणे महापालिकेत उंदरांचा सुळसुळाट, अधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरात उंदीर पकडण्यासाठी पिंजरे

ठाणे : ठाणे शहराच्या कारभाराचे मुख्य केंद्र असलेल्या पाचपाखाडी भागातील ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीत उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. अधिकाऱ्यांच्या कार्यालयात असलेल्या महत्वाची कागदपत्रे उंदिर कुरतडण्याची भिती व्यक्त होत असून या भितीतूनच अधिकाऱ्यांनी आता आपल्या कार्यालयात उंदिर पकडण्यासाठी पिंजरे ठेवली आहेत.

सविस्तर वाचा….

11:51 (IST) 27 Nov 2024

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती जमीनदोस्त करा, उच्च न्यायालयाचे कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला आदेश

कल्याण – बनावट कागदपत्रांच्या आधारे ६५ इमारतींची उभारणी करून नागरिकांची फसवणूक केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांंकर दत्ता, न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी या सर्व बेकायदा इमारती येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत तोडण्याचे आदेश कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला दिले आहेत.

सविस्तर वाचा….

11:40 (IST) 27 Nov 2024

निवडणूक कामाच्या मानधनात तफावत?

विधानसभा निवडणुकीसाठी काम केलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येते. मात्र, या मानधनाच्या रकमेत तफावत असल्याचे समोर आले आहे. मतदान केंद्रे वेगळी असली, तरी कामाचे स्वरूप समान असताना मानधनाच्या रकमेत तफावत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…

11:37 (IST) 27 Nov 2024

आमदारकीसाठी महायुतीत पुन्हा चढाओढ, नक्की काय आहे प्रकार ?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त झाल्या असून, या जागांवर पुण्यातील कोणाला संधी दिली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा…

11:35 (IST) 27 Nov 2024

आमदार होताच कार्यकर्त्यांनी घेतला ‘हा ‘ मोठा निर्णय ! नवनिर्वाचित आमदारांच्या शुभेच्छांचे शहरभर फलक, प्रशासनाकडून कारवाईचा फक्त देखावा

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला राज्यात मोठे यश मिळाले आहे. आज पर्यंतच्या इतिहासात कोणत्याही एका पक्षाला मिळाल्या नव्हत्या इतक्या जागा महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविणाऱ्या भाजपला मिळाल्या आहेत. सविस्तर वाचा…

11:34 (IST) 27 Nov 2024

पुण्यातील मावळमध्ये हॉटेल मालकाने केली ग्राहक मित्राची हत्या; वेटर सोबत झाले होते वाद!

पुण्यातील मावळमध्ये हॉटेल मालकाने ग्राहकाची हत्या केली आहे. प्रसाद उर्फ किरण अशोक पवार अस हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. घटने प्रकरणी हॉटेल मालक अक्षय येवलेला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. सविस्तर वाचा…

11:33 (IST) 27 Nov 2024

पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार! देशात पुढील ६ महिन्यांत होणाऱ्या मोठ्या बदलाची गडकरींची माहिती

देशात शंभर टक्के बायोइथेनॉलवरील वाहने लवकरच धावणार आहेत. देशातील मोटार उत्पादक कंपन्यांकडून पुढील सहा महिन्यांत शंभर टक्के बायोइथेनॉलवर चालणाऱ्या मोटारी सादर करण्यात येणार आहेत. सविस्तर वाचा…

11:33 (IST) 27 Nov 2024

Maharashtra Live News : “जावई आणि लेकीने आता सासरी जावे”, धर्मरावबाबा आत्राम म्हणाले…

शरद पवार गटाने मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात भाग्यश्री यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अहेरी विधानसभेत वडील विरुद्ध मुलगी, दुसरीकडे बंडखोर उमेदवार पुतण्या अम्ब्रीशराव आत्राम, अशी तिरंगी लढत झाली.

सविस्तर वृत्त वाचा

11:30 (IST) 27 Nov 2024
Maharashtra Live News : “शेवटी बाप हा बापच असतो…”, मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचं बॅनर चर्चेत!

धर्मराव आत्राम यांनी विजयानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोस्टर लावले असून त्यात आखिर बाप बाप होता है, असं त्यांनी म्हटलंय. त्यांच्याविरोधता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाकडून त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी देण्यात आली होती. हे दोघेही अहेरी विधानसभा मतदासंघातून निवडणूक लढवत होते.

11:29 (IST) 27 Nov 2024

महायुतीला प्रचंड बहुमत तरीही मुख्यमंत्री कोण हे का ठरत नाही? संजय राऊत यांचा सवाल

तीन पक्षांच्या युतीला सैतानी बहुमत मिळालं आहे. भाजपाला मित्र पक्ष मिळून १४० जागा मिळाल्या आहेत. महायुतीला २३० हून जास्त जागा मिळआल्या आहेत. एवढं मोठं यश मिळूनही जर का मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नसेल तर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा एकमेकांच्या तंगड्यांमध्ये तंगडं अडकवण्याचा कार्यक्रम पडद्यामागे सुरु आहे असं वक्तव्य संजय राऊत यांनी ( Sanjay Raut ) केलं आहे. असं जर असेल तर बहुमत लोकांनी का दिलं? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

11:27 (IST) 27 Nov 2024

दुसऱ्या पत्नीला आई म्हणण्यास नकार दिल्याने मुलाची हत्या, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

मुंबई : दुसऱ्या पत्नीला आई म्हणण्यास नकार दिल्याने मुलाचा खून केल्याच्या आरोपाप्रकरणी सत्र न्यायालयाने एकाला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सविस्तर वाचा….

11:27 (IST) 27 Nov 2024

राष्ट्रपती पदकविजेत्या पोलिसाची अटक बेकायदा, तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई : हत्येच्या प्रकरणात सदोष तपास केल्याचा आरोप करून राष्ट्रपती पदकविजेत्या पोलिसाला केलेली अटक उच्च न्यायालयाने नुकतीच बेकायदा ठरवली.

सविस्तर वाचा….

11:26 (IST) 27 Nov 2024

VIDEO : वाघाच्या बछड्यांनीही घेतला कोवळ्या उन्हाचा आनंद

नागपूर : ताडोबाची खरी राणी कोण ? असा प्रश्न जर कुणी विचारलाच तर समोर नाव येतं ते “छोटी तारा” या वाघिणीचे. ताडोबात पहिल्यांदा रेडिओ कॉलर कोणत्या वाघिणीला लावली असेल तर ती “छोटी तारा” या वाघिणीला.

सविस्तर वाचा….

11:26 (IST) 27 Nov 2024

Sanjay Raut on Dy Chandrachud: “माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जाता जाता…”, संजय राऊत यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्यांना काही कळते का?’

सर्वोच्च न्यायालयाने काय करावे हे राजकीय पक्ष ठरविणार का? असा सवाल उपस्थित करून माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षावर टीका केली होती. त्याला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सविस्तर वाचा

11:26 (IST) 27 Nov 2024

बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसच्या पराभवाने मुकुल वासनिक यांची दिल्ली दरबारी अडचण!

बुलढाणा : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा मुकुल वासनिक ‘यांचा जिल्हा’ अशी बुलढाण्याची ओळख. काँग्रेसचा वर्षानुवर्षे बालेकिल्ला राहिलेल्या बुलढाण्यात यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसवर पराभवाची नामुष्की ओढवली.

सविस्तर वाचा….

10:39 (IST) 27 Nov 2024

Maharashtra Live News : राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सत्तास्थापनेचं घोडं कुठे अडलं?

राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. जनसामान्यांमध्ये आता एकच प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय. राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असणार, याविषयीची नाका नाक्यावर आणि पारावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री पद ठरत नसल्याने सत्ता स्थापनेचा मुहुर्तही लांबला गेला आहे.

महाराष्ट्र सरकार स्थापन २०२४