Maharashtra Politics Updates: विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याची जोरदार चर्चा होत आहे. १४ व्या विधानसभेची मुदत आज (२६ नोव्हेंबर) संपत आहे. त्यामुळे आज सरकार स्थापन होणे आवश्यक असल्याची बाब राजकीय जाणकार व्यक्त करतात. दरम्यान शिवसेना (शिंदे) पक्षाकडून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद देण्यात यावे, यासाठी दबाव टाकला जात आहे. तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिले जावे, अशी मागणी होत आहे. आज महायुतीचे नेते राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असून नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत राज्यात काळजीवाहू सरकार असेल. सरकारच्या शपथविधीबाबत सर्व बातम्या या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

Live Updates

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाइव्ह अपडेट्स

20:23 (IST) 26 Nov 2024

महाविकास आणि बविआचे उमेदवार टपाली मतदानात अव्वल

वसई- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पालघर जिल्ह्यातील ६ पैकी ५ जागांवर महायुतीचे उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत. मात्र टपाली मतदानात सर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पिछाडीवर असल्याचे आढळून आले आहेत. या सर्व मतदारसंघात महाविकास आणि बविआच्या उमेदवार टपाली मतदानात अव्वल आहेत. महायुतीला ईव्हीएम मध्ये बहुमत आहे आणि टपाली मध्ये ते मागे आहेत असे सांगून विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे.

पालघर जिल्ह्यातील ६ पैकी ५ विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी प्रचंड मताधिक्य घेत विजय मिळवला आहे. या विजयामुळे महाविकास आघाडी तसेच बहुजन विकास आघाडीचे पानिपत झाले आहे. महायुतीचा विजय निर्भेळ नसल्याचा आरोप कॉंग्रेस आणि बहुजन विकास आघाडीने केला आहे. निवडणूक मतदानातील आकडेवारीत कागदोपत्री झालेल्या टपाली मतदानात ( महायुतीचे पालघर जिल्ह्यातील सहाच्या सहा उमेदवार त्यांच्या मतदारसंघात क्रमांक दोन वर राहिल्याचे आढळून आले आहे.

20:23 (IST) 26 Nov 2024

लाचप्रकरणी दिंडोरी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यास कोठडी

नाशिक - सरकारकडून प्राप्त निधीचे लेखा परीक्षण होऊनही प्राप्त निधीवर २० हजार रुपये दलालीची मागणी करुन रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दिंडोरी तालुका वैद्यकीय अधिकारी हरीभाऊ मांडगे यास अटक करण्यात आली. मंगळवारी न्यायालयात त्यास बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

तक्रारदार हे दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे परिसरातील सरकारी आयुर्वेद दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या दवाखान्यास २०२०-२०२१ ते २०२३-२०२४ पर्यंतचे शासनाकडून प्राप्त अनुदान म्हणून दोन लाख ७० हजार रुपये प्राप्त झाले. हा निधी दवाखान्याच्या विविध कामांसाठी वापरण्यात आला असून त्या खर्चाचे लेखापरीक्षणही करण्यात आले होते. परंतु, तरीही दिंडोरी तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे (५०, रा. म्हसरूळ) याने तक्रारदाराकडे निधीवर दलाली मागितली. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

19:59 (IST) 26 Nov 2024

नातेसंबंधांत दुरावा आल्यानेच बलात्काराची तक्रार, वकिलाविरोधातील गुन्हा रद्द करताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

याचिकाकर्ता वकील आणि तक्रारदार हे एकमेकांना शाळेपासून ओळखत होते. तथापि, जानेवारी २०२० मध्ये ते पुन्हा संपर्कात आले.

सविस्तर वाचा...

19:43 (IST) 26 Nov 2024

उपनगरातील किमान तापमानात आणखी घट

या आठवड्यातही उपनगरातील किमान तापमानातील घट कायम असून, मंगळवारी सांताक्रूझ केंद्रात किमान तापमान १७ अंशाखाली नोंदले गेले.

सविस्तर वाचा...

19:42 (IST) 26 Nov 2024

मुंबई : गोवंडीतील शिवाजी नगरमधील हवा ‘अतिवाईट’

दोन दिवसांपासून काही भागात हवेची गुणवत्ता ‘अतिवाईट’ ते ‘वाईट’, तर काही भागात ‘मध्यम’ असल्याची नोंद झाली आहे.

सविस्तर वाचा...

19:36 (IST) 26 Nov 2024

भंडारा : महायुतीचा उमेदवार हरला, तरी भाजप जिल्हाध्यक्षाचे अभिनंदन…ध्वनिफितीतील संवादामुळे…

साकोली विधानसभेची लढत अतिशय अटीतटीची आणि रंगतदार झाली. भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणारे महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना अवघ्या २०८ मतांनी पराभव पत्करावा लागला.

सविस्तर वाचा...

19:36 (IST) 26 Nov 2024

यश काँग्रेसचे, चर्चा मात्र भाजपच्या पराभवाचीच! अकोला पश्चिममध्ये ३० वर्षांनंतर परिवर्तन; मुस्लिमांचे मत विभाजन टळणे काँग्रेससाठी ठरले फायदेशीर

विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात तब्बल ३० वर्षांनंतर परिवर्तन घडले. मतदारसंघात आता काँग्रेसच्या यशाऐवजी भाजपच्या पराभवाचीच अधिक चर्चा रंगली आहे.

सविस्तर वाचा...

19:29 (IST) 26 Nov 2024

Who is New CM of Maharashtra Live: फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, भाजपा महिला आघाडीने रक्ताने लिहिले पत्र

देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी राज्यभरातून भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. छ. संभाजीनगरमध्ये महिला आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहिण्यात आले. गेली पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी पक्षासाठी अहोरात्र काम केलं आहे. त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. मात्र त्यांनी कामामध्ये कुठलीच कसर सोडली नाही. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे मुख्यमंत्री करावं, अशी मागणी छत्रपती संभाजीनगरच्या भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

19:00 (IST) 26 Nov 2024

Who is New CM of Maharashtra Live: मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार, राज्यात गुजरात पॅटर्न राबविणार?

विधानसभा निवडणुकीनंतर आता लवकरच सत्तास्थापन होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा यंदा गुजरात पॅटर्न राबवू शकते. मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

18:42 (IST) 26 Nov 2024

Who is New CM of Maharashtra Live: अजित पवारांमुळे शिवसेनेची (शिंदे) बार्गेनिंग पॉवर घटली, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा आरोप

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आम्हाला चालतील, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे गटाचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी आरोप केला की, अजित पवार यांच्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे.

17:55 (IST) 26 Nov 2024

Who is New CM of Maharashtra Live: सागर बंगल्यावरील हालचाली वाढल्या, शिवसेना-राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांच्या भेटीला

शिवेसना (शिंदे) पक्षाचे नेते संजय राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. सत्तास्थापनेसंदर्भात आता वर्षा ऐवजी सागर बंगला चर्चेच्या केंद्र स्थानी आहे.

16:34 (IST) 26 Nov 2024

Maharashtra Live News: ‘शरद पवार नावाचा अध्याय राज्याच्या राजकारणातून संपला’, भाजपा नेत्याची टीका

शरद पवार यांनी विधानसभेआधीच राजकारणातून स्वेच्छानिवृत्ती घ्यायला हवी होती. ती त्यांनी घेतली नाही. आता लोकांनीच त्यांना सेवानिवृत्तीवर पाठवले आहे. शरद पवार कोलांट्या उड्या घेणारा माणूस आहे. शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला आहे, अशी टीका भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली.

16:05 (IST) 26 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election Result: मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ ठरविण्यासाठी ५-६ दिवस जाणार, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

महायुतीमधील तीनही पक्षांचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन पाच-सहा दिवसांत मुख्यमंत्री, मंत्रिमंडळात कोण असणार? याचा निर्णय घेतील. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. त्यामुळे त्यासाठी काही दिवस लागतील, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

https://twitter.com/PTI_News/status/1861349550386225464

16:03 (IST) 26 Nov 2024

विरोधक मुक्त मतदारसंघाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष

ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या वागळे इस्टेट भागातून पाचवेळा काँग्रेस पक्षातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात दोनदा विधानसभेची निवडणूक लढलेले मनोज शिंदे यांनी नुकताच शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेले मनोज शिंदे हे त्यांचे कट्टर समर्थक कसे बनले, याविषयी आता वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.

वाचा सविस्तर...

15:37 (IST) 26 Nov 2024

‘मुख्यमंत्री देवाभाऊच!’ नागपुरात भाजप महिला आघाडीचे टेकडी गणपतीला साकडे..

राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असून मुख्यमंत्री कोण होणार याबाबत जनतेमध्ये उत्सुकता आहे. नागपूरच्या भाजप कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा आहे.

सविस्तर वाचा...

15:26 (IST) 26 Nov 2024

“रेल्वेत गेल्या दहा वर्षांत ५ लाख जणांना नोकऱ्या”, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा दावा

पदभरती प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

15:25 (IST) 26 Nov 2024

बिच्चारे कराळे गुरुजी! मार खाल्ला, मतंही गेली; आता कारवाई…

आपल्या वऱ्हाडी बोलीने राज्यात परिचित झालेले खदखद मास्तर म्हणून ओळखल्या जाणारे नितेश कराळे यांचे ग्रहमान काही ठीक नसल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा...

15:25 (IST) 26 Nov 2024

अमरावती : तीन आमदारांना मंत्रिपदाचे वेध! कुणाची वर्णी लागणार?

जिल्‍ह्यातील आठपैकी सात जागांवर महायुतीने विजय संपादन करून जिल्‍ह्याच्‍या राजकारणावर वर्चस्‍व प्रस्‍थापित केले आहे. आता नव्‍या सरकारमध्‍ये महायुतीमधून मंत्रिपदासाठी तीन जणांची दावेदारी पुढे आली आहे.

सविस्तर वाचा...

15:15 (IST) 26 Nov 2024

नंदुरबार जिल्ह्यात बस उलटल्याने तीन प्रवासी गंभीर जखमी

नंदुरबार : जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील राजनी फाट्याजवळ सोमवारी बस उलटून तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.

सविस्तर वाचा...

15:00 (IST) 26 Nov 2024

धक्कादायक अन् धोकादायकही, सायबर गुन्हेगार बनवताहेत कंपन्यांचे बनावट संकेतस्थळ!

नागपूर : सायबर गुन्हेगारांनी आता अनेक कंपन्यांचे बनावट संकेतस्थळ तयार करणे सुरू केले आहे. त्यावरील क्रमांकावर संपर्क करणाऱ्या ग्राहकांना सायबर गुन्हेगार जाळ्यात ओढून फसवणूक करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

सविस्तर वाचा...

14:58 (IST) 26 Nov 2024

Uddhav Thackeray Shiv Sena on EVM: उद्धव ठाकरेंच्या पराभूत उमेदवारांची EVM यंत्रावर नाराजी, मोठे पाऊल उचलण्याची तयारी

शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पराभूत आमदारांची बैठक मातोश्री येथे संपन्न झाली. या बैठकीत पराभूत आमदारांनी ईव्हीएम यंत्रात गडबड असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर खल झाल्यानंतर ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमधील पावत्यांची छाननी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली असून आगामी काळात आंदोलन हाती घेण्याचीही चर्चा झाली.

14:37 (IST) 26 Nov 2024

भंडारा : नाना पटोले यांच्याबद्दल अपशब्द, शिवीगाळ; व्हायरल ऑडियो क्लिपने खळबळ

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल (दि.२३) नोव्हेंबर रोजी लागले. साकोली विधानसभेत लागलेल्या निकालानंतर या मतदारसंघातील वातावरणच तापलेले आहे.

सविस्तर वाचा...

14:13 (IST) 26 Nov 2024

कल्याणमध्ये खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्याविरुध्द लैंगिक छळाचा गुन्हा

कल्याण : कल्याण पश्चिमेतील एका खासगी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी संबंधित रुग्णालय कर्मचाऱ्या विरुध्द रविवारी गुन्हा दाखल केला.

वाचा सविस्तर...

14:12 (IST) 26 Nov 2024

ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीत ११७ उमेदवारांना ५०० हून कमी मते

ठाणे : ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीत २४४ उमेदवार निवडणूक लढवित होते. या उमेदवारांपैकी ११७ उमेदवारांना पाचशेहून कमी मते मिळाली आहेत. यापैकी अंबरनाथ मतदारसंघातील १७ उमेदवार आणि कल्याण पश्चिम या मतदारसंघातील १६ उमेदवारांना ५०० हून कमी मते मिळाली.

वाचा सविस्तर...

14:12 (IST) 26 Nov 2024

Who is Chief Minister of Maharashtra Live: 'देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री, शिंदेंनी दिल्लीत मंत्रीपद घ्यावे' - रामदास आठवले

एकनाथ शिंदेंसाठी देवेंद्र फडणवीस चार पावले मागे आले होते, आता एकनाथ शिंदे यांनी दोन पावले मागे येण्याची गरज आहे. भाजपाकडे प्रचंड बहुमत आहे. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री बनावे किंवा केंद्रात येऊन मंत्री बनावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

https://twitter.com/ANI/status/1861317219336233412

14:12 (IST) 26 Nov 2024

कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोप निश्चित करण्यासाठी अर्ज

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी नऊ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करून खटला सुरू करण्यात यावा, असा अर्ज सरकार पक्षाकडून न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

14:07 (IST) 26 Nov 2024

भाजपमध्ये मंत्री पदासाठी अंतर्गत स्पर्धा; मुनगंटीवार, भांगडिया, जोरगेवार एकमेकांचे स्पर्धक

चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार निवडून आल्याने मंत्री पदासाठी पक्षांतर्गत स्पर्धा वाढली आहे.

सविस्तर वाचा...

14:07 (IST) 26 Nov 2024

“जावई आणि लेकीने आता सासरी जावे”, धर्मरावबाबा आत्राम म्हणाले…

अहेरी विधानसभेत वडील विरुद्ध मुलगी, दुसरीकडे बंडखोर उमेदवार पुतण्या अम्ब्रीशराव आत्राम, अशी तिरंगी लढत झाली.

सविस्तर वाचा...

14:05 (IST) 26 Nov 2024

Chief Minister Eknath Shinde Resigned Live: ‘शिंदेंना दिल्लीत बोलविण्याचे अधिकार आठवलेंकडे नाहीत’, शिवसेनेचे प्रत्युत्तर

एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत येऊन केंद्रीय मंत्री बनावे, असे विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले होते. यावर आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदेंना दिल्लीत बोलविण्याचे कोणतेही अधिकार रामदास आठवलेंकडे नाहीत, त्यांच्या विधानाला अर्थ नाही, असे संजय शिरसाट म्हणाले.

13:44 (IST) 26 Nov 2024

शिलेदारांच्या गडातच संदीप नाईकांची पिछाडी, भाजपमध्ये मात्र गड राखले

नवी मुंबई : भाजपसोबत बंडखोरी करत पक्षाच्या जवळपास २५ माजी नगरसेवकांना सोबत घेत बेलापूर विधानसभा मतदारसंघात मंदा म्हात्रे यांच्याविरोधात रणशिंग फुंकणाऱ्या संदीप नाईक यांना त्यांच्या जवळच्या शिलेदारांच्या प्रभागांमध्येच अपेक्षीत यश मिळाले नसल्याचे चित्र आता पुढे येत आहे.

सविस्तर वाचा...

Shinde group demands implementation of Bihar pattern of Chief Minister post print politics news

मुख्यमंत्रीपदाचा ‘बिहार पॅटर्न’ राबवा! शिंदे गटाची मागणी (संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

Story img Loader