Maharashtra Politics Updates: विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याची जोरदार चर्चा होत आहे. १४ व्या विधानसभेची मुदत आज (२६ नोव्हेंबर) संपत आहे. त्यामुळे आज सरकार स्थापन होणे आवश्यक असल्याची बाब राजकीय जाणकार व्यक्त करतात. दरम्यान शिवसेना (शिंदे) पक्षाकडून एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद देण्यात यावे, यासाठी दबाव टाकला जात आहे. तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिले जावे, अशी मागणी होत आहे. आज महायुतीचे नेते राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा करणार असून नवे सरकार अस्तित्वात येईपर्यंत राज्यात काळजीवाहू सरकार असेल. सरकारच्या शपथविधीबाबत सर्व बातम्या या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाइव्ह अपडेट्स

13:29 (IST) 26 Nov 2024

नंदुरबार जिल्ह्यात चार मालमोटारी आणि बसचा अपघात

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात मंगळवारी दुपारी चार मालमोटारी आणि बस अशा पाच वाहनांचा अपघात होऊन दोन मालमोटार चालक त्यांच्या कक्षातच अडकले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा…

13:08 (IST) 26 Nov 2024
Chief Minister Eknath Shinde Resigned Live: ‘बिहार पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, एकनाथ शिंदेंनी दिल्लीत..’ -रामदास आठवले

शिवसेना (शिंदे) पक्षाकडून महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबविण्याची मागणी केली जात आहे. मात्र बिहार पॅटर्न महाराष्ट्रात राबवता येणार नाही, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्रीपद मिळणार नाही, असा संदेश शिंदेंना दिलेला आहे, असेही ते म्हणाले. शिंदे यांनी आता हे मान्य करावे आणि दिल्लीला यावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना केले.

13:05 (IST) 26 Nov 2024

धक्कादायक! घरातच देहव्यापाराचा अड्डा; महिलेने अल्पवयीन नात व तिच्या मैत्रिणीला…

नागपूर : सातव्या वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना एका महिलेने देहव्यापारात ढकलले. आंबटशौकीन ग्राहकांना बोलावून घरातच देहव्यापाराचा अड्डा सुरु केला. गुन्हे शाखेने या अड्ड्यावर छापा घालून महिलेला अटक केली तर दोन्ही मुलींना पोलिसांनी देहव्यापाराच्या दलदलीतून बाहेर काढले.

सविस्तर वाचा…

13:04 (IST) 26 Nov 2024

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत : आमदार हेमंत रासने

पुणे : राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यामध्ये अनेक धक्कादायक निकाल लागले.

वाचा सविस्तर…

12:56 (IST) 26 Nov 2024

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ‘नवा गडी नवा राज’

नागपूर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्याने सध्या चर्चा नवा मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतत होत आहे. येत्या काही दिवसात नवा मुख्यमंत्री ठरल्यानंतर लगेचच म्हणजे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार असून त्याला नवे मुख्यमंत्री सामोरे जाणार आहेत.

सविस्तर वाचा…

12:33 (IST) 26 Nov 2024

महेश बालदी यांनी पुन्हा जिंकले उरणच रण, मात्र नवख्या प्रीतम म्हात्रे यांचीही निकराची झुंज

उरण : शनिवारी पार पडलेल्या मतमोजणीत उरण विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आ. महेश बालदी यांनी पुन्हा एकदा उरणचे रण जिंकले आहे

सविस्तर वाचा…

12:11 (IST) 26 Nov 2024

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते, फुले रोड एक दिशा मार्ग

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या महात्मा फुले रस्ता आणि घनश्याम गुप्ते रस्त्यांवर आणि त्यांच्या छेद रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीचा सर्वाधिक त्रास नोकरदार वर्ग, शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे.

सविस्तर वाचा…

12:01 (IST) 26 Nov 2024

Chief Minister Eknath Shinde Resigned Live: एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, ही कार्यकर्त्यांची भावना – दीपक केसरकर

प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते की आपल्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा. पण पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरवतील तो मुख्यमंत्री असेल. तीनही पक्षांनी त्यांना सर्वाधिकार दिले आहेत. महायुती म्हणून आम्ही तीनही पक्ष एकत्र असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.

11:56 (IST) 26 Nov 2024

वाशी, बेलापूरने भाजपला तारले चुरशीच्या लढतीत संदीप नाईक यांचा थोडक्यात पराभव

नवी मुंबई : वाशीकर मतदारांनी भरभरून दिलेली साथ आणि सीबीडी-बेलापूरच्या घरच्या मैदानात मंदा म्हात्रे यांना मिळालेले निर्णायक मताधिक्य यामुळे अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपला कसेबसे तारल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

सविस्तर वाचा…

11:52 (IST) 26 Nov 2024

Chief Minister Eknath Shinde Resigned Live: “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देणे म्हणजे…”, दीपक केसरकर यांचे विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देणे म्हणजे ही एक केवळ औपचारिकता आहे. ते आता काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतील. लवकरच सरकारचा शपथविधी पार पडेल.”

11:38 (IST) 26 Nov 2024

CM Eknath Shinde give resignation to Governor CP Radhakrishnan: एकनाथ शिंदे आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार दिला. नवीन मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करतील.

11:33 (IST) 26 Nov 2024
Maharashtra CM Oath Taking Ceremony Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, पुढचा मुख्यमंत्री कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करताच आता १४ वी विधानसभा विसर्जित झाली आहे. आता पुढचा मुख्यमंत्री कोण? याची उत्सुकता लागली आहे. तसेच एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री झाले नाहीत, तर त्यांच्याकडे कोणते पद असणार? याचीही चर्चा रंगली आहे.

11:25 (IST) 26 Nov 2024

नागपूर : सरस्वती शाळेच्या बसलचा भीषण अपघात, एक विद्यार्थी ठार, ८ ते १० विद्यार्थी गंभीर जखमी

नागपूर : हिंगणा परिसरातील सरस्वती माध्यमिक विद्यालयाची शाळेची बस पर्यटनाला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात खाली कोसळली.

सविस्तर वाचा…

11:25 (IST) 26 Nov 2024
Maharashtra CM Oath Taking Ceremony Live: मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. आता नवे सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.

11:18 (IST) 26 Nov 2024

Maharashtra CM Oath Taking Ceremony Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात दाखल; राजीनामा देणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजभवनावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राजभवनात पोहोचले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे आपला राजीनामा आज राज्यपालांना सुपूर्द करतील.

11:10 (IST) 26 Nov 2024

थंडीसह बाजारात मटारच्या हंगामाला सुरुवात, दरही निम्म्यावर

नवी मुंबई : सध्या घाऊक आणि किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. त्यामुळे वर्षभर गगनाला भिडलेले दरही निम्म्यावर आले आहेत.

सविस्तर वाचा…

11:00 (IST) 26 Nov 2024

Maharashtra CM Oath Taking Ceremony Live: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात दाखल, मुख्यमंत्री शिंदे मात्र…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राजभवनावर दाखल झाले आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र अद्याप वर्षा बंगल्यावर आहेत. ते काही वेळात राजभवनात पोहोचतील, असे सांगितले जात आहे.

10:52 (IST) 26 Nov 2024

नाशिक गारठले – तापमान १०.८ अंशावर – हंगामातील सर्वात कमी पातळी

नाशिक : आठवडाभरापासून कमी होणाऱ्या तापमानाने मंगळवारी हंगामातील १०.८ अंश ही नीचांकी पातळी गाठली. तर निफाडच्या कृषी विज्ञान केंद्रात ८.८ अंश तापमानाची नोंद झाली.

सविस्तर वाचा…

10:32 (IST) 26 Nov 2024

Maharashtra CM Oath Taking Ceremony: महायुतीचे नेते ११ वाजता राजभवनला भेट देणार; अजित पवार म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसादरमाध्यमांशी बोलताना म्हटले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह आम्ही राजभवनात जाणार आहोत. सरकारस्थापनेचा दावा करणारे पत्र राज्यपालांना देणार आहोत. महायुतीला बहुमत मिळाले असून ते आम्हाला शपथविधीसाठी आमंत्रित करतील. त्यानंतर राज्यात काळजीवाहू सरकार काम करेल.

मुख्यमंत्रीपदाचा ‘बिहार पॅटर्न’ राबवा! शिंदे गटाची मागणी (संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता