Maharashtra Election Result 2024 BJP Candidates Defeated: भाजपाचा विजयरथ १६ ठिकाणी रोखणारे ‘ते’ उमेदवार कोण? ११ ठिकाणी काँग्रेसशी झाली थेट लढत!

16 Constituencies Where BJP Candidates were Defeated: भाजपा उमेदवारांचा महाराष्ट्रभर विजय होत असताना १६ मतदारसंघांमध्ये भाजपाचा पराभव झाला.

bjp candidate winners list
भाजपाच्या उमेदवारांचा पराभव झालेले १६ मतदारसंघ कोणते? (फोटो – प्रातिनिधिक छायाचित्र)

Maharashtra Assembly Results Against BJP 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आले असून विरोधकांचा मोठा पराभव झाला आहे. राज्यात महायुतीला तब्बल २३५ जागांवर विजय मिळाला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला अवघ्या ४९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. एकट्या भाजपानं राज्यात १३२ जागांवर विजय मिळवत जवळपास एकहाती निवडणुका फिरवल्याचं निकालांवरून पाहायला मिळत आहे. या निवडणूक निकालांमुळे अनेक सत्तासमीकरणं उद्ध्वस्त झाली असून अनेक समीकरणांची नव्याने जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यावरून आता राजकीय चर्चा सुरू झाली असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या ऐतिहासिक विजयाबाबत विश्लेषण केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीत १४८ जागा लढवल्या. त्यापैकी तब्बल १३२ जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिंकून आले आहेत. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेसाठीचा बहुमताचा १४५ चा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपाला अवघ्या १३ जागा कमी पडल्या. पण महायुतीनं जिंकलेल्या २३५ जागांपैकी एकट्या भाजपाच्या १३२ जागा असल्यामुळे सत्तास्थापनेच्या चर्चा आणि वाटपामध्ये भारतीय जनता पक्षाचा मोठा दावा असेल हे आता नक्की मानलं जात आहे. पण एकीकडे भारतीय जनता पक्षाचा विजयरथ चौखुर उधळलेला असताना पक्षाच्या १६ उमेदवारांना पराभूत करणाऱ्या उमेदवारांची चर्चा सुरू आहे. नेमक्या कोणत्या पक्षाच्या उमेदवारांनी भाजपाचा हा विजयरथ रोखला आहे?

कोण कुठे जिंकलं, कुठे पराभूत झालं…

k

१. अकोला पश्चिममध्ये भाजपाचे विजय कमलकिशोर अग्रवाल यांचा काँग्रेसचे साजिद खान यांनी पराभव केला.

२. उमरेडमझ्ये भाजपाचे सुधीर पारवे यांचा काँग्रेसचे संजय मेश्राम यांनी पराभव केला.

३. नागपूर पश्चिममध्ये भाजपाच्या सुधाकर कोहळेंचा काँग्रेसच्या विकास ठाकरेंनी पराभव केला.

४. नागपूर उत्तरमध्ये भाजपाच्या मिलिंद माने यांचा काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी पराभव केला.

५. साकोलीमध्ये भाजपाच्या अविनाश ब्राह्मणकरांचा अवघ्या २०८ मतांनी पराभव करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जिंकून आले आहेत.

६. आरमोरीमध्ये भाजपाचे कृष्णा गजबे यांचा काँग्रेसचे रामदास मसराम यांनी पराभव केला.

७. ब्रह्मपुरीमधून भाजपाचे कृष्णलाल सहारे यांचा काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी पराभव केला.

८. वणी विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे संजीव बोडकुरवार यांचा ठाकरे गटाचे संजय देरकर यांनी पराभव केला.

९. यवतमाळमध्ये भाजपाचे मदन येरावार यांचा काँग्रेसचे अनिल मंगुळ यांनी पराभव केला.

१०. डहाणू मतदारसंघातून भाजपाचे विनोद मेढा यांचा माकपचे विनोद निकोले यांनी पराभव केला.

११. मालाड पश्चिममध्ये भाजपाचे विनोद शेलार यांचा काँग्रेसचे अस्लम शेख यांनी पराभव केला.

१२. वर्सोव्यात भाजपाच्या भारती लव्हेकर यांचा ठाकरे गटाचे हरून खान यांनी पराभव केला.

१३. भाजपाचे राम शिंदे यांचा कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे रोहित पवार यांनी पराभव केला आहे.

१४. भाजपाच्या अर्चना पाटील चाकूरकर यांचा काँग्रेसचे अमित देशमुख यांनी पराभव केला.

१५. भाजपाच्या राम सातपुतेंचा माळशिरसमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उत्तमराव जानकर यांनी पराभव केला.

१६. पळुस-कडेगावमध्ये भाजपाचे संग्राम देशमुख यांचा काँग्रेसचे विश्वजीत कदम यांनी पराभव केला.

Maharashtra Election Winner Candidate List: राज्याच्या २८८ मतदासंघांमध्ये नेमकं काय घडलं? वाचा विजेत्यांची संपूर्ण पक्षनिहाय यादी!

भाजपाच्या १६ पराभूत उमेदवारांची यादी

मतदारसंघभाजपा उमेदवारविजयी उमेदवार
अकोला पश्चिमकमलकिशोर अग्रवालसाजिद खान – काँग्रेस
उमरेडसुधीर पारवेसंजय मेश्राम – काँग्रेस
नागपूर पश्चिमसुधाकर कोहळेविकास ठाकरे – काँग्रेस
नागपूर उत्तरमिलिंद मानेनितीन राऊत – काँग्रेस
साकोलीअविनाश ब्राह्मणकरनाना पटोले – काँग्रेस
आरमोरीकृष्णा गजबेरामदास मसराम – काँग्रेस
ब्रह्मपुरीकृष्णलाल सहारेविजय वडेट्टीवार – काँग्रेस
वणीसंजय बोडकुरवारसंजय देरकर – ठाकरे गट
यवतमाळमदन येरावारअनिल मंगुळ – काँग्रेस
डहाणूविनोद मेढाविनोद निकोले – माकप
मालाड पश्चिमविनोद शेलारअस्लम शेख – काँग्रेस
वर्सोवाभारती लव्हेकरहरून खान – ठाकरे गट
कर्जतराम शिंदेरोहित पवार – शरद पवार गट
लातूर शहरअर्चना पाटील चाकूरकरअमित देशमुख – काँग्रेस
माळशिरसराम सातपुतेउत्तमराव जानकर – शरद पवार गट
पळुस कडेगावसंग्राम देशमुखविश्वजीत कदम – काँग्रेस

विजयी व पराभूतांची यादी पाहिली असता भाजपाच्या पराभूत झालेल्या १६ उमेदवारांना हरवणाऱ्या पक्षांमध्ये ११ उमेदवार काँग्रेस पक्षाचे आहेत. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे दोन तर माकपच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra vidhan sabha election result 2024 winners list against bjp candidates pmw

First published on: 24-11-2024 at 10:34 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा