Maharashtra Assembly Election Result 2024 Analysis: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाले असून आता त्यातील अनेक बाबींचा सविस्तर ऊहापोह राजकीय विश्लेषकांकडून केला जात आहे. काहींसाठी हे निकाल धक्कादायक ठरले आहेत तर काहींसाठी अपेक्षित. लोकसभा निवडणुकीत अवघ्या १७ जागांपर्यंत पिछाडीवर पडलेल्या महायुतीनं यावेळी जोरदार मुसंडी मारत तब्बल तीन चतुर्थांश जागा खिशात घातल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला पन्नाशीही गाठता आली नाही. आता विरोधकांकडून यावर ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात असताना राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी काही मुद्द्यांच्या आधारे या निकालांचं विश्लेषण केलं आहे. त्यात महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (एकनाथ शिंदे) या महयुतीतील मित्रपक्षांना मिळालेल्या इतक्या मोठ्या विजयाबरोबरच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचाही संदर्भ त्यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

योगेंद्र यादव यांनी इंडियन एक्स्प्रेससाठी लिहिलेल्या विश्लेषणात्मक लेखामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांबाबत सविस्तर भाष्य केलं आहे. आपल्याला महायुतीच्या विजयाचं किंवा सहज जिंकता येण्यासारखी परिस्थिती असूनही मविआच्या पराभवाचं आश्चर्य वाटलं नसून ज्या प्रमाणात महायुतीला हा विजय मिळाला आहे, त्याचं जास्त आश्चर्य वाटत आहे, असं योगेंद्र यादव यांनी या लेखात नमूद केलं आहे.

निकालातील ४ आश्चर्यकारक बाबी!

योगेंद्र यादव यांनी निकालातल्या चार आश्चर्यकारक बाबींचा लेखात उल्लेख केला आहे. “सर्वात पहिली बाब म्हणजे हा इतका मोठा विजय! महायुतीला जवळपास तीन चतुर्थांश जागा आणि एकूण मतांच्या वाट्यामध्ये तब्बल १४ टक्क्यांची भरघोस वाढ मिळाली आहे. असे विजय अशक्य नसले तरी दुर्मिळ असतात. दुसरी गोष्ट म्हणजे या निकालात कोणत्याच प्रकारच्या ‘पॅटर्न’चं अस्तित्व दिसलं नाही. जणूकाही राज्यात कायमच अस्तित्वात असणारे धार्मिक, शहरी-ग्रामीण, आघाड्यांमध्येही पक्षनिहाय भेद कुठल्यातरी अदृश्य हातांनी पुसून टाकले होते”, अशा शब्दांत योगेंद्र यादव यांनी आपलं मत मांडलं आहे.

“या घटकांमधली तिसरी बाब म्हणजे नाट्यमयरीत्या फिरलेला कौल. लोकसभेत महायुतीला १७ तर मविआला ३० जागा मिळाल्या होत्या. पण विधानसभेला ते उलट होऊन महायुतीला तब्बल २३५ तर मविआला फक्त ५० जागा मिळाल्या. त्याशिवाय १४ टक्क्यांची मतांच्या हिश्श्यातली भरघोस वाढ. फक्त पाच महिन्यांत हा लोलक एका बाजूने थेट दुसऱ्या टोकावर पोहोचला. ही बाबही राजकारणात अशक्य नाही. पण या सगळ्यापेक्षा जास्त आश्चर्यकारक ठरलेला चौथा घटक म्हणजे निकालांमधला एकदम विरुद्ध दिशेनं घडलेला बदल”, असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.

विरुद्ध दिशेला झालेला बदल..सर्वात आश्चर्यकारक घटक!

योगेंद्र यादव यांच्यामते एखाद्या राष्ट्रीय पक्षानं आपला लोकसभा निवडणुकीदरम्यानचा पराभव राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर फिरवावा असं उदाहरण देशाच्या इतिहासात खचितच असेल. “लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये लागणारे विरुद्ध निकाल हे लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रीय पक्षांच्या यशाशी निगडित असतात. उदाहरणार्थ २०१८ मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमधल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. पण लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपानं या राज्यांत काँग्रेसला धोबीपछाड दिली होती. किंवा २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आपची दिल्लीत पीछेहाट होऊनही पुढच्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपनं राज्यात भाजपाला मात दिली होती. यंदा झारखंडमध्ये झालेल्या निवडणुकीतही हेच दिसून आलं. पण एका राष्ट्रीय पक्षानं राज्यात लोकसभा निवडणुकीत झालेली पीछेहाट अशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीत फिरवल्याचं एकही उदाहरण दिसत नाही”, असं विश्लेषण योगेंद्र यादव यांनी केलं आहे.

Maharashtra Election Winner Candidate List: महाराष्ट्रात कोण कुठे कुणाविरोधात जिंकलं? वाचा संपूर्ण २८८ मतदारसंघांच्या निकालाची सविस्तर यादी!

“महाराष्ट्राचा राजकीय इतिहास पाहाता भाजपाची या निवडणुकीत वाईट कामगिरी होणं अपेक्षित होतं. पण निवडणुका अतिशय वेगात फिरल्या आणि चुकीच्या दिशेनं गेल्या. ही निवडणूक गुगलीच होती”, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

हे असं का घडलं? काही उत्तर आहे?

मविआच्या चुका आणि महायुतीचं सरस धोरण या पार्श्वभूमीवर हे घडल्याचं बोललं जात आहे. पण एवढंच विश्लेषण पुरेसं आहे का? असा प्रश्न योगेंद्र यादव यांनी उपस्थित केला आहे. “मविआनं अंतर्गत क्लिष्ट समीकरणं, दूरदृष्टीचा अभाव आणि टाळता येण्यासारखे मतभेद यावर मात केली नाही. हे खरं आहे. लोकसभा निवडणुकीतील विजयानं मविआला विधानसभा निवडणुकीची मोहीम सुरू करण्यासाठी एक सक्षम पाया रचून दिला होता. मुद्द्यांची अजिबात कमतरता नव्हती. सेना-राष्ट्रवादीतील पक्षफुटीपासून उद्धव ठाकरेंनी करोना काळात केलेल्या कामापर्यंत सगळं होतं. तरीही गेल्या पाच महिन्यांत मविआला या मुद्द्यांचा फायदा करून घेता आला नाही. जागावाटपातील दिरंगाई, जाहीरनाम्याला झालेला उशीर, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्यातील असमर्थता आणि भाजपाच्या चालींना उत्तर देण्यात आलेलं अपयश या बाबी मविआच्या विरोधात गेल्या”, असं योगेंद्र यादव यांचं मत आहे.

“भाजपाप्रणीत महायुतीनं लोकसभेतील पीछेहाटीतून धडा घेत विचारपूर्वक धोरण आखलं आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. योजनांच्या घोषणा, निधीवाटप, ओबीसी व दलितांच्या मतांचं केंद्रीकरण, संघ परिवाराच्या यंत्रणेचा योग्य वापर, डमी उमेदवार अशी सर्व तयारी भाजपानं केली. निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दोन्ही आघाड्यांच्या धोरणातील हा बदल ठळकपणे जाणवला. पण यातून महायुतीला मविआवर फारतर ५ टक्के मताधिक्य मिळण्याची शक्यता असेल. पण १४ टक्क्यांची घवघवीत वाढ खरंच शक्य आहे? हे अशक्य आहे. वास्तव हे आहे की माध्यमं, पोलस्टर्स, राजकीय नेते, अगदी महायुतीनंही इतक्या मोठ्या विजयाचा अंदाज बांधला नव्हता. कोणत्याही अंदाजांमध्ये एवढ्या मोठ्या विजयाचा उल्लेख नव्हता”, असं योगेंद्र यादव या लेखात म्हणतात.

Maharashtra Politics : ईडी-सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा मागे असणाऱ्या नेत्यांचं विधानसभेत काय झालं? कोण विजयी अन् कोणाचा पराभव?

ईव्हीएममुळे खरंच गडबड झाली?

दरम्यान, या लेखात योगेंद्र यादव यांनी ईव्हीएमवरील आरोपांवरही भाष्य केलं. “ईव्हीएमवर आरोप करणं घाईचं ठरेल, पण त्यावर शंका उपस्थित न करणं अशक्य आहे. पण आत्तापर्यंत आपल्याकडे यासंदर्भात दावा करण्यासाठी असणारे पुरावे पुरेसे नाहीत. हे आरोप करणाऱ्यांना आणखी भक्कम पुरावे उभे करावे लागतील. फक्त डोळ्यांना दिसतंय त्याहीपलीकडे या निवडणूक निकालांमध्ये खूप काही नक्कीच आहे. या वर्षभरातली ही तिसरी निवडणूक आहे ज्याच्या निकालांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत आणि त्यांची उत्तरं देण्यात आलेली नाहीत. निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकीच्या डेटासंदर्भातील प्रश्नांना अद्याप उत्तरं दिलेली नाहीत. वाईट बाब ही आहे की हे सगळं सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर घडताना दिसत आहे. जर आपल्याला शेजारी राष्ट्रांमध्ये होणाऱ्या निवडणूक गोंधळाच्या दिशेनं जायचं नसेल, तर आपल्याला आत्ताच कृती करावी लागेल”, असं आवाहन योगेंद्र यादव यांनी लेखाच्या शेवटी सगळ्यांना केलं आहे.