Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष यांच्या महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना झाल्याचे पाहायला मिळाले. ज्यामध्ये महायुतीमधील तीन प्रमुख पक्षांना २२० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. तर एकट्या भाजपाचे १३० हून जास्त आमदार निवडून आले आहेत. मात्र मतांच्या टक्केवारीचा विचार करायचा झाल्यास, सर्वाधिक चांगली कामगिरी ठरली ती अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची.
विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला मिळणाऱ्या मतांचा टक्का वाढवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. अजित पवारांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत फक्त ३.६० टक्के मते मिळाली होती, जी या विधानसभा निवडणूकीत वाढून १०.५६ टक्के इतकी झाली आहेत.
एप्रिल महिन्यात झालेली लोकसभा निवडणूक आणि नोव्हेंबरमध्ये झालेली विधासभा निवडणूक या दोन्ही निवडणुकींमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी मात्र ६ टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात घटली आहेत. भारतीय जनता पक्षांच्या मतांचा टक्का देखील किंचित कमी झाल्याचे पाहायला मिळाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने मात्र त्यांच्या मतांची टक्केवारी जवळपास होती तेवढी टिकवली आहे.
विधानसभा निवडणुकीत मतांचा टक्का वाढला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा. शनिवारी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान दुपारी एक वाजेपर्यंत काँग्रेसला १०.८८ टक्के मते मिळाली होती, ज्यामध्ये काँग्रेस पक्ष फक्त १९ जागांवर आघाडीवर होता. तर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने १३ जागा जिंकल्या होत्या आणि त्यावेळी काँग्रेस पक्षाने एकूण मतांच्या १६.९२ टक्के मते मिळवली होती. दुसरीकडे भाजपाने विधानसभा निवडणुकीत १२७ जागांवर विजय मिळवला आहे, ज्यामध्ये पक्षाला २५.३२ टक्के मते मिळाली. लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये भाजपाने ९ जागा या २६.१८ टक्के मतांसह जिंकल्या होत्या.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा स्ट्राइक रेट सर्वाधिक होता. त्यांच्या पक्षाने लढवलेल्या १० पैका ८ जागा जिंकल्या होत्या. ज्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १०.२७ टक्के मते मिळवली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाने १३ जागा जिंकल्या ज्यामध्ये पक्षाने ११.६७ टक्के मते मिळवली.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत ७ जागा जिंकल्या होत्या, यावेळी त्यांना १२.९५ टक्के मते मिळाली होती. पण विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने ऐतिहासिक ५४ जागा जिंकल्या आहेत, ज्यामध्ये त्यांना १२.५० टक्के मते मिळली आहेत. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला ९ लोकसभेच्या जागा मिळाल्या होत्या आणि त्यांना १६.७२ टक्के इतकी मते मिळाली होती. आता विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला १२ जागा आणि १०.७४ टक्के मते मिळाली आहेत.
हेही वाचा >> राज ठाकरेंची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अविश्वसनीय..”
हेच महायुतीच्या विजयाचं कारण
काँग्रेसचा घसरलेला मतांचा टक्का आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची वाढलेली मते हेच महाराष्ट्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विजयाचे प्रमुख कारण असू शकते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्व जाती-धर्मातील लोकांचा पाठिंबा मिळाला होता. पण हा पाठिंबा काँग्रेस पक्षाला पुढचे काही महिने टिकवून ठेवता आला नाही.
मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाचा विधानसभा निवडणुकीत प्रभाव दिसून येईल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण हा संघर्ष झाल्याचे दिसून आले नाही. एकंदरीत ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीमधील इतर पक्षांची मते महायुतीकडे विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्याकडे गेली.