भाजपाच्या काशिराम पावरा हे शिरपूर विधानसभा मतदारसंघात १ लाख ५९ हजार ४४ मतांनी विजयी ठरले आहेत. डॉ. जितेंद्र ठाकूर यांचा त्यांनी पराभव केला. काशिराम पावरा यांना १ लाख ७८ हजार ७३ मते मिळाली असून जितेंद्र ठाकूर यांना ३२ हजार १२९ मते मिळाली आहेत. बागलान मतदारसंघातून दिली बोरसे विजयी ठरले असून त्यांनी १ लाख २९ हजार २९७ मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. तर बारामती विधानसभा मतदारसंघातही अजित पवारांनी १ लाखांच्या मार्जिनने विजय मिळवला आहे. बोरिवली विधानसभा मतदारसंघातून संजय उपाध्याय यांनी संजय भोसले यांच्यावर १ लाख २५७ मतांनी मात केली आहे.
हेही वाचा >> Mahayuti vs Maha Vikas Aghadi Winner : महायुती की महाविकास आघाडी? तुमच्या मतदारसंघात कोण ठरलं वरचढ? वाचा २८८ मतदारसंघांची संपूर्ण यादी!
सर्वांत कमी मताधिक्य कोणाला?
तर, सर्वांत कमी मताधिक्य असलेला मतदारसंघ आहे मालेगाव दक्षिण. या मतदारसंघातून मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचा विजय झाला असून त्यांना १ लाख ९ हजार ३३२ मते मिळाली आहेत. तर त्यांच्या विरोधातील आसिफ शेख राशिद यांना १ लाख ९ हजार २५७ मते मिळाली आहे. अवघ्या ७५ मतांच्या फरकाने आसिफ राशिद हरले आहेत. बेलापूर विधआनसभा मतदारसंघात मंदा म्हात्रे यांनीही संदीप नाईक यांच्याविरोधात अवघ्या ३७७ मतांनी मात केली आहे. तर बुलढाणा येथे संजय गायकवाड यांनीही जयश्री शेळके यांच्याविरोधात ८४१ मतांनी विजय मिळवला आहे.