Complete List of Sharad Pawar NCP Winner candidate: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला महाविकास आघाडीमध्ये २८८ पैकी ८६ मतदारसंघ मिळाले होते. काही मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. तर ४० मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळाला. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेत शरद पवार पक्षांच्या शांतपणे भूमिका घेत कमी पण महत्त्वाच्या जागा स्वतःच्या पदरात पाडून घेतल्या होत्या. शरद पवार यांनी स्वतः प्रचारात उतरून वातावरण निर्मिती केली. ज्यामुळे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पाहायला मिळाले. राज्य सरकारच्या धोरणांवर टीका करत असतानाच राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने अजित पवार गट आणि महायुतीला लक्ष्य केले. मात्र प्रत्यक्ष निकालात शरद पवारा गटाला फारसे यश मिळालेले नाही. ८६ पैकी केवळ १० जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर ७६ ठिकाणी त्यांचे उमेदवार पराभूत झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा