शिंदे-फडणवीस-पवार यांच्या महायुतीतील मंत्री सतत विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता मंत्री विजयकुमार गावित यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे सुंदर झाले आहेत. तसे, मासे खाऊन तुमचेही डोळे सुंदर होतील, असं वक्तव्य विजयकुमार गावित यांनी केलं होतं. या विधानाप्रकरणी राज्य महिला आयोगाने विजयकुमार गावित यांना नोटीस बजावत तीन दिवसांत उत्तर सादर करण्यास सांगितलं आहे.
विजयकुमार गावित काय म्हणाले?
“तुम्ही ऐश्वर्या राय बघितली ना? ती समुद्राच्या किनारी राहणारी, बंगळुरुच्या समुद्राच्या किनारी राहणारी. ती दररोज मासे खायची. तिचे डोळे बघितले ना? तसे तुमचेही डोळे होणार. मासे खाल्ले, तर दोन फायदे आहेत. मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात. डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितलं तरी पटवूनच घेणार. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचं तेल असतं,” असं विजयकुमार गावित यांनी म्हटलं.
हेही वाचा : अजित पवारांचा एक प्रश्न अन् शिंदे गटात अस्वस्थता; मुख्यमंत्र्यांना थेट म्हणाले, “तुमच्या ठाण्यात…”
“तीन दिवसांत उत्तर सादर करावे”
याबद्दल ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर म्हणाल्या, “गावित यांनी केलेला उल्लेख महिलांचा अपमान करणारं आहे. महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार विजयकुमार गावित यांना नोटीस बजावली आहे. गावितांना उत्तर सादर करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. गावितांनी आपला खुलासा सादर करावा.”
“प्रत्येकवेळी उदाहरण देताना महिला कशासाठी लागतात?”
लोकप्रतिनिधींकडून अशी वक्तव्ये सतत करण्यात येतात, याबाबत काही ठोस पावले उचलणार का? या प्रश्नावर रूपाली चाकणकर यांनी म्हटलं, “सभागृहात, जाहीर सभेत महिलांबद्दल वक्तव्य करण्यात आली आहेत. त्यामुळे पक्षांनीच आपल्या भूमिका ठरवून घेतल्या पाहिजेत. प्रत्येकवेळी उदाहरण देताना महिला कशासाठी लागतात? महिलांना दुय्यम लेखायचं, वक्तव्य करायची हे समाजाला मान्य होत नाही.”
हेही वाचा : “आग लगे बस्ती में…”, विजयकुमार गावितांना जितेंद्र आव्हाडांचा टोला; म्हणाले, “पोरी कशा पटवायच्या…”
“सक्त ताकीद पक्षाच्या प्रमुखांनी नेते, मंत्र्यांना द्यावीत”
“विधानभवनात अशाप्रकारची वक्तव्य न होण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्रव्यवहार केला आहे. अशा प्रकारची वक्तव्य करू नये, अशी सक्त ताकीद सर्व संबंधित पक्षाच्या प्रमुखांनी नेतेमंडळी किंवा मंत्रीमहोदयांना द्यावीत. जेणेकरून समाजात स्त्रीयांचा सन्मान राखला जाईल,” असेही रूपाली चाकणकर यांनी सांगितलं.