सांगली जिल्ह्यात दिग्गज समजल्या जाणाऱ्या नेत्यांना जमिनीवर आणण्याचे काम मतदारांनी या निवडणुकीत केले आहे. शिराळ्यात मानसिंगराव नाईक, तासगावमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील, जतमध्ये आमदार विक्रमसिंह सावंत यांचा मतदारांनी पराभव केला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचा विजय झाला असला, तरी त्यासाठी त्यांना करावा लागलेला संघर्ष पाहता हा निकाल धोक्याची घंटा ठरणारा आहे. भाजपचे सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांना विजयी करत असताना सत्यजित देशमुख, गोपीचंद पडळकर यांच्या रूपाने दोनवर दोन मोफत आमदार सांगलीकरांनी भाजपला दिले आहेत. खानापूरमधून सुहास बाबर या स्व. आमदार अनिल बाबर यांच्या वारसदारांवर मतदारांनी विश्वास ठेवला आहे.

आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या इस्लामपूर आणि पलूस-कडेगाव मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र होते. मात्र, प्रत्येक फेरीत मागे-पुढे होत अखेर आमदार जयंत पाटील व आ. डॉ. विश्वजित कदम यांना आपले गड शाबूत राखता आले असले, तरी गेल्या निवडणुकीतील मताधिक्य खूपच घटले आहे. डॉ. कदम यांचे गेल्या निवडणुकीत दीड लाखांचे मताधिक्य या वेळी २८ हजारांपर्यंत घसरले, तर आ. पाटील यांचे मताधिक्य १३ हजार ५०० पर्यंत खाली आले आहे. निशिकांत पाटील यांनी जोरदार धडक या निवडणुकीत दिली. तर पलूस-कडेगावमध्ये भाजपच्या संग्राम देशमुख यांनी घाटाखाली चांगले मतदान घेतल्याने डॉ. कदम यांचे मताधिक्य खाली आणण्यात यश मिळाले.

हेही वाचा >>>संख्याबळाला मान की शिंदेंचा सन्मान?

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण

जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्थानिक विरुद्ध बाहेरचा या प्रचारात विजय संपादन केला. आक्रमक प्रचाराबरोबरच तेच ते चेहरे जतने नाकारले. काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांच्याबाबत जनतेत असलेली नाराजी, माजी आमदार विलासराव जगताप यांचा कमी झालेला प्रभाव आणि मूळचा भाजपचा मताधार यावर स्वार होत आमदार पडळकर यांनी हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणला आहे. तमणगोंडा रविपाटील यांची भाजपमधील बंडखोरी मोडीत काढून आमदार पडळकरांनी विजय संपादन करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास सार्थ ठरवला.

हेही वाचा >>>Nanded Bypoll Election Result 2024 : काँग्रेससाठी सुखद बातमी! नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत विजय, अशोक चव्हाणांना मोठा धक्का

खानापूरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात बंडखोरी होऊनही शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर यांनी दणदणीत विजय संपादन केला. तासगाव-कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी एकही प्रचार सभा घेतली नसताना रोहित पाटील यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. लोकसभेत मताधिक्य कमी होऊनही पुन्हा विधानसभेच्या मैदानात उतरलेल्या माजी खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा एकदा मतदारांनी घरी बसण्याचा आदेश दिला.

Story img Loader