सांगली जिल्ह्यात दिग्गज समजल्या जाणाऱ्या नेत्यांना जमिनीवर आणण्याचे काम मतदारांनी या निवडणुकीत केले आहे. शिराळ्यात मानसिंगराव नाईक, तासगावमध्ये माजी खासदार संजयकाका पाटील, जतमध्ये आमदार विक्रमसिंह सावंत यांचा मतदारांनी पराभव केला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचा विजय झाला असला, तरी त्यासाठी त्यांना करावा लागलेला संघर्ष पाहता हा निकाल धोक्याची घंटा ठरणारा आहे. भाजपचे सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ यांना विजयी करत असताना सत्यजित देशमुख, गोपीचंद पडळकर यांच्या रूपाने दोनवर दोन मोफत आमदार सांगलीकरांनी भाजपला दिले आहेत. खानापूरमधून सुहास बाबर या स्व. आमदार अनिल बाबर यांच्या वारसदारांवर मतदारांनी विश्वास ठेवला आहे.
आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या इस्लामपूर आणि पलूस-कडेगाव मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र होते. मात्र, प्रत्येक फेरीत मागे-पुढे होत अखेर आमदार जयंत पाटील व आ. डॉ. विश्वजित कदम यांना आपले गड शाबूत राखता आले असले, तरी गेल्या निवडणुकीतील मताधिक्य खूपच घटले आहे. डॉ. कदम यांचे गेल्या निवडणुकीत दीड लाखांचे मताधिक्य या वेळी २८ हजारांपर्यंत घसरले, तर आ. पाटील यांचे मताधिक्य १३ हजार ५०० पर्यंत खाली आले आहे. निशिकांत पाटील यांनी जोरदार धडक या निवडणुकीत दिली. तर पलूस-कडेगावमध्ये भाजपच्या संग्राम देशमुख यांनी घाटाखाली चांगले मतदान घेतल्याने डॉ. कदम यांचे मताधिक्य खाली आणण्यात यश मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा