महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार औरंगाबाद प्रदेशातील गिरीबालाजी पाणी वापर संस्था टाकळी अंबड, ता. पैठण यांना द्वितीय पुरस्कार पुणे प्रदेशातील जय हनुमान पाणी वापर संस्था, यादववाडी ता. पारनेर व तृतीय पुरस्कार काळभैरव पाणी वापर संस्था, शेंद्री ता. गडहिंग्लज यांना जाहीर करण्यात आला आहे.
या राज्यस्तरीय पुरस्कारातील प्रकल्प प्रथम जायकवाडी, द्वितीय कुकडी व तृतीय शेंद्री ल. पा. प्रकल्पात या पाणी वापर संस्था कार्यरत आहेत. राज्यस्तरीय पुरस्कारांना प्रथम सात लाख, द्वितीय पाच व तृतीय तीन लाख रुपये व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे.
प्रदेशस्तरीय पुरस्कारप्राप्त पाणी वापर संस्था नाशिक प्रथम सप्तश्रृंगी पाणी वापर संस्था अंतखेली ता. निफाड, ओझर खेड प्रकल्प व द्वितीय नेत्रावती पाणी वापर संस्था पाचोरे वणी ता. निफाड ओझरखेड प्रकल्प यांचा समावेश आहे.
पुणे प्रदेशात प्रथ्ांम श्रीकृष्ण पाणी वापर संस्था पाटगांव ता. जुन्नर कुकडी प्रकल्प, व द्वितीय भैरवनाथ कालवा पाणी वापर सहकारी संस्था शिवथर ता. सातारा कृष्णा घोम प्रकल्प यांना जाहीर झाला आहे.
कोकण विभागात श्रीदेवी माऊली पाणी वापर संस्था आंबोली ता. सावंतवाडी लघु पाटबंधारे योजना आंबोली यांना जाहीर झाला असून, कोकणात द्वितीय क्रमांकाची एकही पाणी वापर संस्था घोषित झालेली नाही. जलसंपदा मंत्री सुनील तटकरे कोकणचे असूनही पाणी वापर संख्या व प्रकल्प यांची वानवा या ठिकाणी उघड झाली आहे.
अमरावती विभागात प्रथम कमळगंगा पाणी वापर संस्था हिवरालाहे ता. कारंजा हिवरालाहे ल. पा. योजना व द्वितीय विठ्ठल रखुमाई पाणी वापर संस्था पिंपळशेंडा ता. मूर्तिजापूर पिंपळखेडा लघु पाटबंधारे यांना पुरस्कार जाहीर झाले.
औरंगाबाद विभागात प्रथम ज्ञानेश्वर माऊली पाणी वापर संस्था पिंपळखेड जायकवाडी प्रकल्प व द्वितीय आप्पासाहेब नागदकर पाणी वापर संस्था नागद ता. कन्नड गडदगड मध्यम प्रकल्पाला पुरस्कार जाहीर झाला.
नागपूर विभागात प्रथम गंगापूर्ती पाणी वापर संस्था निसतखेडा ता. मौदा पेंच प्रकल्प व द्वितीय जिजाऊ पाणी वापर संस्था येडगांव ता. अर्कुनी इटीचाडोह प्रकल्प यांना जाहीर झाला आहे.
राज्यातील सहा प्रादेशिक विभागातील पाणी वापर संस्थांना प्रदेशस्तरीय प्रथम व द्वितीय क्रमांकाना अनुक्रमे तीन व दोन लाख रुपये व प्रशस्तिपत्रक असे या सन २०१२-१३ करीता जाहीर झालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज्याच्या जलनीतीनुसार सिंचन व्यवस्थापनात लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग असण्यासाठी सिंचनप्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यानुसार पाणी वापर संस्थांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
पुरस्कारप्राप्त संस्थांनी विशेष आमसभा बोलावून सभेत पैशाच्या विनियोगाबाबत निर्णय घ्यावयाचा आहे. पाणी वापर संस्थेच्या प्रशासकीय व कार्यालयीन नवीन बाबींसाठी पुरस्कार रकमेच्या ५ टक्केपर्यंत खर्च करण्यासाठी मुभा आहे. पाणी वापर संस्थेने सामूहिक उपयोगासाठी छोटे ट्रॅक्टर, मळणी यंत्र आदीसाठी सर्वाच्या संमतीने खर्च करावयाचा आहे. पुरस्काराची रक्कम दैनंदिनी खर्चासाठी करता येणार नाही. तसेच शिल्लक रक्कम पाणी वापर संस्थेच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेव, राष्ट्रीय बचत करता येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा