महाविकास आघाडीचं सरकार असताना गिरीश महाजन, नवनीत राणा, कंगना राणौत, नारायण राणे यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले होते. खोट्या कारवायांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनाही जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
रश्मी शुक्ला प्रकरणात सीबीआयाने क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला आहे. देवेंद्र फडणवीसांचा संगणक हॅक झाला होता. त्यांनी कोणताही रिपोर्ट लीक केला नाही. फडणवीसांना क्लिनचिट देण्यात आली आहे. मग विरोधकांकडून करण्यात आलेले आरोप खोटे होते का? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं.
हेही वाचा : “अजित पवारांचा कायमचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने शरद पवारांनी…”, काँग्रेस नेत्याचं विधान
एकनाथ शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार असताना गिरीश महाजन, नवनीत राणा, कंगना राणौत, नारायण राणे यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले. त्यांना जेलमध्ये डांबण्याचा प्रयत्न केला. सत्तेचा आणि यंत्रणांचा दुरूपयोग महाविकास आघाडीचं सरकार असताना झाला.”
हेही वाचा : “अजित पवार यांची दया येते, कारण ते कायम…”, भगतसिंह कोश्यारींचं विधान चर्चेत
“मलाही काही गोष्टी माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांनाही गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. पण, सीबीआयाने ‘दूध का दूध’, ‘पाणी का पाणी’ केलं आहे. सत्तेचा दुरुपयोग कोण करत होतं? आणि कोण कोणावर आरोप करतंय, याचा विचार जनता करत आहे. योग्यवेळी विरोधकांना उत्तर दिल जाईल,” असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला.