लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : संजय राऊत यांच्या अंगात आले आणि आमचे सरकार आले, मात्र राऊतांच्या अंगात आलेल उतरलेच नाही. त्यामुळे आमचे महाविकास आघाडीचे सरकार गेले या शब्दात काँग्रेसचे आ. डॉ. विश्वजित कदम यांनी कडेगाव तालक्यातील प्रचार सभेत बोलताना राऊत यांच्यावर खोचक टीका केली.

Sharad Pawar Slams Raj Thackeray
Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
Amit thackeray and mitali thackeray
Amit Thackeray Love Story : “मी पोद्दारचा, ती रुईयाची, ती ज्या मुलाला बघायला जायची…”; अमित ठाकरेंनी सांगितली लव्हस्टोरी!
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…

लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि कॉंग्रेस पक्षादरम्यान सांगली लोकसभा मतदारसंघावरून टोकाचे मतभेद झाले होते. त्या निवडणुकीत कॉंग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आघाडीचे अधिकृत शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) उमेदवाराचा पराभव केला होता. या निवडणुकीत डॉ. कदम आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप झाले होते. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत देखील डॉ. कदम यांनी पुन्हा एकदा राऊत यांच्यावर हल्ला चढवत महाविकास आघाडीचे सरकार जाण्यास त्यांना जबाबदार धरले आहे. यामुळे या दोन पक्ष आणि नेत्यांमधील कलगीतुरा आता विधानसभेला सुरू झाला आहे.

आणखी वाचा-Sharad Pawar : “राज ठाकरे काहीही ठोकून देतात, मूर्खासारखं..” शरद पवारांची खोचक शब्दांत टीका

आ. डॉ. कदम पलूस-कडेगाव मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. या वेळी प्रचार सभेत बोलताना आ. कदम म्हणाले, की गेल्या वेळी मी निवडून आलो आणि सरकार येईल असे वाटत नव्हते. मी विनोदाने म्हणत असतो, संजय राऊत याच्या अंगात आले आणि सरकार आले. पण अडचण एवढी झाली की राऊताच्या अंगातील कधी उतरलेच नाही. त्यांच्यामुळेच आमचे महाविकास आघाडीचे राज्यात आलेले सरकारही गेले.