BJP leader Vasantrao Deshmukh on Jayashree Thorat: भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या सभेत भाजपाचे नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्यावर अश्लाघ्य टीका केल्यानंतर संगमनेर तालुक्यातील वातावरण तापले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द गावात सुजय विखेंची सभा शुक्रवारी सायंकाळी पार पडली. यावेळी वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरत यांच्याबद्दल नको ते विधान केले. या विधानानंतर थोरात समर्थकांनी सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यावर हल्ला केला. काही वाहनांची तोडफोड केली. तसेच सुजय विखेंचे बॅनरही फाडले. त्यानंतर आता सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “भाजपचा पटका गळ्यात घातलेले नेते पुरोगामी महाराष्ट्रात जाहीरपणे “तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही” अशी धमकी देतायत. हीच भाजपची मनुवादी मानसिकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलांबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे नेते महिलांचे रक्षण काय करणार? निवडणूक जिंकणे हा भाजपचा एकमेव अजेंडा आहे. त्यासाठी ते किती खालची पातळी गाठू शकतात हे उघड झालंय.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
What Amit Thackeray Said About Raj Thackeray and Uddhav Thackeray?
Amit Thackeray : “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये, कारण..”; अमित ठाकरे काय म्हणाले?
Anil Deshmukh son Salil Deshmukh, Salil Deshmukh Katol, Katol constituency, Salil Deshmukh latest news,
उमेदवारी अर्ज भरण्यास दोन मिनिंटाचा उशीर आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या….
Karuna Sharma Cried
Karuna Sharma : उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने ढसाढसा रडल्या करुणा शर्मा, धनंजय मुंडेंना म्हणाल्या, “तू राक्षस…”

हे वाचा >> Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव

ही अतिशय गलिच्छ टीका – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही एक्सवर पोस्ट करून या घटनेचा निषेध केला. “संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपाचे नेते वसंत देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्रीताई थोरात यांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ विधान केले. भरसभेत आपल्या मुलीच्या वयाच्या नेत्यावर अशा पद्धतीने गलिच्छ भाषेत टीका करण्यात आली, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. विशेष म्हणजे माजी खासदार सुजय विखे देखील या सभेला उपस्थित होते. त्यांनी देखील या विधानाचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केले. शिवरायांच्या ज्या राज्यात महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येत होती. त्या राज्यात महिलांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ भाषा वापरण्यात येत आहे. हे भाजपाचे संस्कार आहेत. या विधानाचा तीव्र निषेध. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो ही प्रार्थना.

अजित पवार गटाकडूनही निषेध

महाविकास आघाडीबरोबरच महायुतीकडूनही या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले की, काल संगमनेरमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. बाळासाहेब थोरात यांच्या कन्येविषयी ज्या पद्धतीने देशमुख नावाचे वृद्ध गृहस्थ बरळले ते संताप जनक आहे. भाऊ म्हणून आम्ही डॉ. जयश्री थोरात यांच्या पाठीशी खंबीर आहोत. राजकारण इतक्याही खालच्या पातळीवर जाऊ नये.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही एक्सवर पोस्ट टाकून यावर प्रतिक्रिया दिली आहे. “माझे मार्गदर्शक, माजी मंत्री श्री. बाळासाहेब थोरात यांची कन्या, माझी बहीण डॉ. जयश्रीताई यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह विधान करण्यात आलं, त्याचा तीव्र निषेध नोंदवतो! राजकारण होत राहिल, पण परस्त्रीला मातेसमान मानणारा छत्रपतींचा संस्कार त्यांच्याच महाराष्ट्रात पायदळी तुडवण्याचे काम काल झाले, ही बाब मनाला चीड आणणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जिजाऊंच्या लेकीचे भर सभेत चारित्र्य हनन होणे ही सबंध महाराष्ट्रासाठी दुर्दैवी घटना आहे. केवळ मतांवर डोळा ठेवून माझी लाडकी बहीण म्हणायचं आणि रणांगणात आव्हान उभं करणाऱ्या लेकीवर भर सभेत अश्लील शेरेबाजी करायची, तिला घराबाहेर पडू न देण्याची भाषा करायची हीच भारतीय जनता पार्टीची खरी वृत्ती आहे. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता या वृत्तीला लवकरच महाराष्ट्रातून हद्दपार करेल.

Story img Loader