Premium

सांगलीची जागा अखेर काँग्रेसनं सोडली; महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर, पाहा कोण कुठून निवडणूक लढवणार?

मुंबईच्या शिवालयमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर करण्यात आला असून सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी सर्वसहमतीने फॉर्म्युला ठरल्याचं म्हटलं आहे.

mva press conference seat sharing for loksabha election 2024
मविआचं जागावाटप ठरलं, ४८ जागांचा फॉर्म्युला जाहीर! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही प्रमुख विरोधी आघाड्यांच्या जागावाटपाचा मुद्दा मोठ्या चर्चेत आला होता. कुणाला कुठली जागा मिळणार? याविषयी प्रचंड उत्सुकता होती. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षांमधले दोन्ही गट सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूला असताना उरलेले भाजपा व काँग्रेस यांच्यासह जागावाटप कसं केलं जाणार? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. अखेर आज महाविकास आघाडीनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तीन पक्षांमध्ये जागावाटप नेमकं कसं ठरलंय, याची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोण किती जागा लढवणार?

मुंबईतल्या शिवालयमध्ये महाविकास आघाडीची आज संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यात शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी संजय राऊतांनी जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला. त्यानुसार शिवसेना सर्वाधिक २१ जागा, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १० जागा लढवणार आहे.

सांगलीची जागा काँग्रेसनं सोडली!

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून मोठा प्रश्न निर्माण झाला होता. विश्वजीत कदम व विशाल पाटील यांनी सांगलीच्या जागेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. या जागेवर उद्धव ठाकरेंनी आधीच ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर केला होता. त्यानुसार ही जागा काँग्रेसनं ठाकरे गटासाठी सोडली आहे. या पार्श्वभूमीवर आता स्थानिक काँग्रेस नेते कोणती भूमिका घेतात? याकडे लक्ष लागलं आहे.

कोण कुठल्या जागेवरून निवडणूक लढणार?

यावेळी संजय राऊत यांनी कोणत्या पक्षाला कोणत्या जागा मिळाल्या आहेत, याचीही यादी जाहीर केली. त्यानुसार काँग्रेसला नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर-मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि उत्तर मुंबई हे मतदारसंघ मिळाले आहेत.

मविआमध्ये सांगलीचा वाद चिघळणार? काँग्रेस की ठाकरे गट? उमेदवारीबाबत विशाल पाटील म्हणाले…

दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य या जागा मिळाल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला बीड, बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड या जागा आल्या आहेत.

“सर्वसहमतीने झालेल्या निर्णयाचं वाचन करण्यात आलेलं आहे. ४८ पैकी एकाही जागेबाबत मतभेद नाही. सर्वांमध्ये एकवाक्यता आहे”, अशी प्रतिक्रिया यावेळी शरद पवार यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mahavikas aghadi mva seat sharing formula sangli for shivsena congress ncp sharad pawar faction pmw

First published on: 09-04-2024 at 12:10 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा