मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज, मंगळवारी संपुष्टात येत आहे. मात्र सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत कायम आहे. दोन्ही आघाड्यांतील सहा प्रमुख पक्षांनी आपापल्या उमेदवार याद्या जाहीर केल्या असल्या, तरी नेमके कोणता पक्ष किती जागा लढणार हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यातच काही ठिकाणी मित्रपक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत असल्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्यास पक्षांना वेळ मिळणार आहे. त्यामुळे जागावाटपाचे नेमके चित्र दिवाळीनंतरच स्पष्ट होईल, असे मानले जात आहे.

भाजपने १४६ उमेदवार जाहीर केले असून त्यामुळे शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या पक्षांना मनासारख्या जागा सोडल्या नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीत जागावाटप जवळपास पूर्ण झाले असून, केवळ १० टक्के जागांचा प्रश्न असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन महिन्यांपूर्वी केला होता. मात्र सत्ताधारी पक्षांमध्ये अद्याप एकवाक्यता झाली नाही. भाजपने १४६, शिवसेनेने (शिंदे) ८०, तर राष्ट्रवादीने (अजित पवार) ४९ उमेदवारांची घोषणा केली आहे. लोकसभेत शिंदे यांच्या मनाप्रमाणे जागावाटप झाले होते. आता मात्र भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते. भाजप १५० किंवा त्यापेक्षा अधिक जागा लढणार आहे. शिवाय भाजपने काही इच्छुकांना शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांमध्ये पाठविले आहे. मित्र पक्षांपैकी रिपब्लिकन आठवले गटासाठी एकही जागा सोडण्यात आलेली नाही. आठवले यांना केंदात राज्यमंत्रीपद दिले एवढेच पुरेसे आहे, अशी टिप्पणी भाजपकडून केली जात आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी; कारवाईचं कारण काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा

हेही वाचा : १९ लाख हेक्टरवर नुकसान, राज्यातील शेतीला परतीच्या पावसाचा मोठा फटका

महाविकास आघाडीतही काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) यांच्यातील धुसफुस कायम आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर जागावाटपाची चर्चा लवकरात लवकर संपवून प्रचारावर भर देण्याची रणनीती मविआतील नेत्यांनी आखली होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस उजाडला तरीही जागावाटपावर सहमती होऊ शकली नाही. महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत शेवटपर्यंत घोळ सुरू होता. महाविकास आघाडीत काही मतदारसंघांमध्ये परस्परांच्या विरोधात उमेदवार उभे करण्यात आले आहेत. यावर चर्चेतून तोडगा काढला जाईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. जागावाटपात पुरेसे प्रतिनिधित्व दिले गेले नसल्याने मविआतील छोटे पक्ष नाराज असून ते आपले उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत.

वनगांच्या डोळ्यांत पाणी

पालघर/ कासा : पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना शिवसेना (शिंदे) पक्षातर्फे उमेदवारी डावलल्याने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड केली. आमच्या प्रामाणिकपणाचे हेच फलित आहे का, असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपली फसवणूक केल्याचे आरोप करताना त्यांच्या डोळ्यांत चक्क पाणी आले.

हेही वाचा : Ajit Pawar NCP 4th Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

अजित पवार भावूक

पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लोकसभा निवडणुकीप्रमाणेच भावनिक मुद्द्यावर फिरणार असल्याचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर स्पष्ट झाले. ‘सुप्रियाच्या विरोधात उमेदवार देणे ही चूक होती. पण, आता चूक कोणी केली,’ असा सवाल करत अजित पवार यांनी भावनिक साद घातली.

Story img Loader