कराड : धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यातील महायुतीचे सरकार प्रयत्नशील असून, बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या अधिकारात अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी काढलेल्या अद्यादेशाचा अभ्यास करण्यासाठी शासकीय अधिकारी व धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ या राज्यांच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे धनगर समाजाचे नेते, आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

धनगर समाजाला अनुसूचित जाती-जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कराड तहसील कार्यालयासमोर १४ दिवसांपासून आंदोलन करणारे जयप्रकाश हुलवान यांना आमदार पडळकर यांच्या हस्ते सरबत देऊन हे उपोषण विसर्जित करण्यात आले. भाऊसाहेब ढेबे यांच्यासह तहसीलदार विजय पवार, पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह धनगर समाज बांधव या वेळी उपस्थित होते.

maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
amit shah in jalgaon during campaigning
भाजपचा अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्यास विरोध; अमित शहा यांच्याकडून भूमिका जाहीर
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
Rohit Pawar scandal regarding 32 IT companies in Hinjewadi
“हिंजवडी मधील ३२ आयटी कंपन्या गुजरातला जाणार”; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, गेल्या दहा वर्षात एक ही…!
home voting in nala sopara
वसई: नालासोपाऱ्यात १२१ नागरिकांचे गृहमतदान

हेही वाचा >>> साखर व्यापाऱ्यांच्या माहितीचे संकलन; साठेबाजी, दर नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून उपाययोजना

आमदार पडळकर म्हणाले, कि  धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. अनुसूचित जाती- जमातीच्या बाबतीत बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या अधिकारात काढलेले काही अध्यादेश हे आम्ही राज्य सरकारकडे दिलेत. त्याची अधिक माहिती घेण्याबरोबरच अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने शासकीय अधिकारी आणि धनगर समाजाच्या प्रतिनिधींचे शिष्टमंडळ या राज्यांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिष्टमंडळात कोण असेल हे येत्या दोनच दिवसात निश्चित होईल असे आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस वाहन पलटी, तीन पोलीस किरकोळ जखमी

ते म्हणाले, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात आजच धनगर बांधवांच्या प्रश्नासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. धनगर समाजाचे शिष्टमंडळही या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील धनगर बांधवांना अनुसूचित जाती-जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी आपली मनस्वी तीव्र भावना असल्याचे आश्वासक प्रतिपादन आमदार पडळकर यांनी काढले. मुंबई उच्च न्यायालयात धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात आजच  न्यायमूर्तींनी ८, ११ व १५ डिसेंबरला सुनावणी ठेवली आहे. न्यायालयात धनगर समाजाच्या बाजूने  सरकारने तीन ॲफेडेव्हिट दाखल केली आहेत. न्यायालय आपली बाजू घेईल अशी आशा असल्याचे पडळकर म्हणाले.