Mahim Election Result: Amit Thackeray vs Mahesh Sawant vs Sada Sarvankar Vote Counting Highlights : माहीम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन्ही गट इथे कमकुवत झाले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटांनी गेल्या काही महिन्यांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहे. मनसेने पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर शिवसेनेने (शिंदे) विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना येथून उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांना या मतदारसंघात त्यांच्या मित्रपक्षांकडून पाठिंबा मिळालेला नाही. शिवसेनेचा (शिंदे) महायुतीतील मित्रपक्ष भाजपाने या मतदारसंघात अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार महेश सावंत यांनी देखील सरवणकर व ठाकरेंपाठोपाठ जोरदार प्रचार केला आहे. माहीममधील मुस्लीमबहुल भागातही त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mahim Election Results 2024, AMIT THACKERAY vs MAHESH SAWANT vs SADA SARVANKAR Vote Counting Mahim Assembly Election Results 2024 Highlights in Marathi_ Mahim Vidhan Sabha Election Results 2024 Highlights : माहीम मतदारसंघाबाबतच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

18:13 (IST) 23 Nov 2024

Mahim Election Results 2024 : महेश सावंत विजयी

शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार महेश सावंत यांना ५०,२१२ मतं मिळाली आहेत. त्यांनी १,३१६ मतांसह त्यांनी सदा सरवणकरांचा (शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार) पराभव केला आहे. त्यांना ४८,८५७ मतं मिळाली आहेत. तर, मनसेच्या अमित ठाकरे यांना ३३,०६२ मतं मिळाली आहेत.

14:59 (IST) 23 Nov 2024

१४ व्या फेरीनंतर सदा सरवणकरांची मोठी मुसंडी

१२ फेऱ्यांनंतर पिछाडीवर असलेल्या सदा सरवणकरांनी मतमोणीच्या १३ व्या व १४ व्या फेरीत जास्तीत जास्त मतं मिळवली आहेत. आता महेश सावंत व सदा सरवणकर यांच्यातील मतांचा फरक केवळ १२५१ मतांचा आहे.

14:18 (IST) 23 Nov 2024

Amit Thackeray : अमित ठाकरे पराभूत, राज ठाकरेंना मोठा धक्का

ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांना ११ फेऱ्यांनंतर ३०,३९५ मतं मिळाली आहेत. तर सदा सरवणकरांना २६,७१२ मतं मिळाली आहेत. अमित ठाकरे यांना १८,३९५ मतं मिळाली असून ते १२ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांचा पराभव निश्चित असल्याचं चित्र दिसत आहे.

14:11 (IST) 23 Nov 2024

अमित ठाकरे पराभूत, राज ठाकरेंना मोठा धक्का

13:06 (IST) 23 Nov 2024

मत मोजणीच्या आठव्या फेरीत महेश सावंत आघाडीवर तर अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर

आठ फेऱ्यांमधील मतमोजणी पूर्ण झाली असून आठव्या फेरीत शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार महेश सावंत आघाडीवर असून त्यांना २४४५० मतं मिळाली आहेत. तर अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत, त्यांना ११८८६ मतं मिळाली आहेत. सदा सरवणकर १६९७० मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

12:38 (IST) 23 Nov 2024

Amit Thackeray Dadar Mahim Vidhan Sabha Constituency : राजपुत्र पिछाडीवर; उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला जायंट किलर!

तिन्ही उमेदवारांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा, पाणी व रहदारीशी संबंधित समस्या सोडविणे, जुन्या चाळी व इमारतींचा पुनर्विकास, छत्रपती शिवाजी महाराज पार्क धूळमुक्त आदी मूलभूत व पायाभूत सुविधा देण्याच्या मुद्द्यांवर भर दिला असून भविष्यात यासंबंधित विविध कामे करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून दिले आहे. दरम्यान, सध्या हाती येत असलेल्या कलांनुसार अमित ठाकरे प्रचंड पिछाडीवर आहेत.

सविस्तर वृत्त वाचा

11:56 (IST) 23 Nov 2024

Amit Thackeray ; अमित ठाकरे १० हजार मतांनी पिछाडीवर

अमित ठाकरे १० हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

पाच फेऱ्यांमधील मतमोजणी पूर्ण झाली असून अमित ठाकरे यांना केवळ ६,६४२ मतं मिळाली आहेत. ते तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार महेश सावंत यांच्याकडे १० हजार मतांची आघाडी मिळाली आहे. आतापर्यंत त्यांना १६,६४८ मतं मिळाली आहेत. सदा सरवणकर ९,२१० मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

11:06 (IST) 23 Nov 2024

Mahim Assembly Election Result 2024 Live Updates : राज ठाकरेंना मोठा धक्का, माहिममध्ये सरवणकरांना अमितपेक्षा दुप्पट मतं

राज ठाकरेंना मोठा धक्का, माहिममध्ये सरवणकरांना अमित ठाकरे यांच्यापेक्षा दुप्पट मतं मिळाली आहेत.

09:51 (IST) 23 Nov 2024

Amit Thackeray : अमित ठाकरेंना धक्का, तिसऱ्या फेरीनंतर मोठी घसरण

अमित ठाकरेंना धक्का, तिसऱ्या फेरीनंतर मोठी घसरण, माहीममध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत आघाडीवर आहेत, सदा सरवणकर दुसऱ्या व अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

09:41 (IST) 23 Nov 2024

Amit Thackeray ; अमित ठाकरेंची आघाडी कायम

दुसऱ्या फेरीनंतरही अमित ठाकरे यांची आघाडी कायम

09:11 (IST) 23 Nov 2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल कुठे पाहू शकाल? जाणून घ्या

महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. ही निवडणूक खूप चुरशीची झाली आहे. महाराष्ट्रात काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकसत्ता.कॉमवर तुम्ही सगळे क्षणाक्षणाचे अपडेट्स पाहू शकणार आहेत. निकालांकडे ( Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ) अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

08:27 (IST) 23 Nov 2024

Mahim Constituency Vidhan Sabha Election Result Live Updates : माहीममध्ये अमित ठाकरे आघाडीवर

माहीममध्ये अमित ठाकरे आघाडीवर असून विद्यमान आमदार सदा सरवणकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

08:02 (IST) 23 Nov 2024

अन्यथा मनसेची मान्यता रद्द होईल, निवडणूक आयोगाचा नियम काय?

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला त्यांची निवडणूक आयोगाने दिलेली मान्यता टिकविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत किमान तीन आमदार व तीन टक्के मत मिळवावी लागतील. अन्यथा त्यांची मान्यता रद्द होऊ शकतो. राज ठाकरेंची मनसे यंदा १२३ जागा लढत आहे. यामध्ये त्यांनी किमान ३ आमदार निवडून आणावेच लागतील. २०१४ व २०१९ मध्ये मनसेचा केवळ एकेक आमदार निवडून आला होता. २००९ मध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाने १३ आमदार निवडून आणले होते.

दरम्यान, मनसेचे माजी आमदार प पक्षातील वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर म्हणाले, या निवडणुकीत आमचे अनेक आमदार निवडून येतील. निवडणूक आयोगाचे सर्व निकष आम्ही सहज पूर्ण करू.

मनसेला मान्यता टिकवण्यासाठी ४८ लाख मतं मिळवावी लागतील. २०१४ मध्ये मनसेला १४.६५ लाख मतं मिळाली होती. तर २०१९ मध्ये १२.४८ लाख मतं मिळाली होती.

07:47 (IST) 23 Nov 2024

Mahim Assembly Election Result 2024 Live Updates : सर्वांचं निकालाकडे लक्ष

माहीम विधानसभा निकालामध्ये मतांची घसरण, पक्षांची स्थिती, आणि मतदारांची निष्ठा या बाबी महत्त्वाच्या ठरल्या. यंदा मतदारांनी आपली भूमिका स्पष्टपणे दाखवली असून, या निकालांनी आगामी राजकीय समीकरणांवर प्रभाव पाडला आहे.

07:23 (IST) 23 Nov 2024

Mahim Constituency Vidhan Sabha Election Result Live Updates : एकूण मतदारसंख्या

एकूण मतदारसंख्या: २३५४७९

एकूण मतदारांनी मतदान केले: १२४०२८

मतदानाची टक्केवारी: ५२.७ (२० नोव्हेंबर २०२४)

07:16 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Live Updates: राज्यातील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) राज्यात २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढला. वाढलेलं मतदान कुणाच्या पारड्यात पडलं, हे आज समजेल. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. महायुतीमधील भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षांना एक्झिट पोल्समध्ये मविआपेक्षा अधिक जागा दाखविल्या गेल्या आहेत. तर महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षांना महायुतीपेक्षा थोड्या कमी जागा दाखविल्या गेल्या. अपक्ष, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचीही कामगिरी कशी असेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा

07:10 (IST) 23 Nov 2024

Mahim Assembly Election Result 2024 Live Updates : २०१९ ची परिस्थिती काय होती?

माहीम विधानसभा मतदारसंघ २०१९ च्या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात एकूण ६ उमेदवार रिंगणात होते. येथे शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी ६१,३३७ मते (४९.५) मिळवून आघाडी घेतली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे उमेदवार संदीप देशपांडे यांना ४२,६९० मते (३४.४) मिळाली होती.

07:07 (IST) 23 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीची सत्ता

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीतच मुख्य लढत झाली आहे. अनेक मतदानोत्तर चाचण्यांमध्ये राज्यात महायुतीची सत्ता येील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही एक्झिट पोल्समधून मविआच्या बाजूने कल दर्शवला आहे. त्रिशंकू स्थितीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

EditDelete

06:33 (IST) 23 Nov 2024

Mahim Constituency Vidhan Sabha Election Result Live Updates : आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार

दिड तासांनी मतमोजणीला सुरुवात होईल, दुपारपर्यंत दादर-माहीमच्या जनतेचा कल लक्षात येईल.

06:25 (IST) 23 Nov 2024

Mahim Assembly Election Result 2024 Live Updates : मनसेला दोन ते चार जागा मिळण्याची शक्यता

बहुसंख्य एक्झिट पोल्सनी मनसेला त्यांच्या पोलमध्ये स्थान दिलेलं नाही. त्यामुळे निवडणुकीत मनसेची कामगिरी कशी असेल याचा अंदाज बांधता आलेला नाही. केवळ दैनिक भास्करच्या एक्झिट पोलनुसार मनसेला दोन ते चार जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

05:44 (IST) 23 Nov 2024

Mahim Constituency Vidhan Sabha Election Result Live Updates : राज्याला मनसेशिवाय पर्याय नाही : अमित ठाकरे

मनसेशिवाय राज्यात सत्ता स्थापन होणार नाही, असा दावा अमित ठाकरेंनी केला आहे. मी लोकांपर्यंत पोहचलो आहे. मी प्रत्येक घरात जाऊन लोकांशी संवाद साधला आहे.

04:47 (IST) 23 Nov 2024

Mahim Assembly Election Result 2024 Live Updates :अमित ठाकरेंचं डिपॉझिट वाचलं तरी मोठी गोष्ट : सरवणकरांचा चिमटा

माहीममध्ये अमित ठाकरेंचं डिपॉझिट वाचलं तरी खूप मोठी गोष्ट असेल, असं वक्तव्य सदा सरवणकर यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं.

03:57 (IST) 23 Nov 2024

Mahim Constituency Vidhan Sabha Election Result Live Updates : माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघात ५२.६७ टक्के मतदान झाले होते. यंदा (२०२४) माहीममध्ये ५८ टक्के मतदान झालं आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा माहीममधी मतदान ५.३३ टक्क्यांनी वाढलं आहे.

02:40 (IST) 23 Nov 2024

Mahim Assembly Election Result 2024 Live Updates : मुंबईत ५५ टक्के मतदान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात मतदान पार पडलं. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे.मुंबई उपनगरांत ५५.७७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. माहीममधील मतदारसांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.

01:59 (IST) 23 Nov 2024

Mahim Constituency Vidhan Sabha Election Result Live Updates : तिरंगी लढत

मनसेने पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर, शिवसेनेने (शिंदे) विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. शिवसेनेने (ठाकरे) येथून महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

01:08 (IST) 23 Nov 2024

Mahim Assembly Election Result 2024 Live Updates : पाच अपक्षांची माघार

माहिम मतदारसंघात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघातून एकूण १९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पाच अर्ज बाद करण्यात आले आहेत. एकूण १४ अर्ज स्वीकारण्यात आले आहेत.

00:00 (IST) 23 Nov 2024

Mahim Constituency Vidhan Sabha Election Result Live Updates : २००९ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

नितीन सरदेसाई (मनसे) – ४८,७३४ मतं

सदा सरवणकर (काँग्रेस) – ३९,८०८ मतं

आदेश बांदेकर (शिवसेना) – ३६,३६४ मतं

23:01 (IST) 22 Nov 2024

Mahim Assembly Election Result 2024 Live Updates : २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

सदा सरवणकर (शिवसेना) – ४६,२९१ मतं

नितीन सरदेसाई (मनसे) – ४०,३५० मतं

विलास आंबेकर (भाजपा) – ३३,४४६ मतं

22:04 (IST) 22 Nov 2024

21:23 (IST) 22 Nov 2024

Mahim Assembly Election Result 2024 Live Updates : मनसेची मोठी ताकद

माहीम विधानसभा मतदारसंघात (Mahim Assembly constituency) शिवसेनेप्रमाणे मनसेचेही हजारो मतदार आहेत. २००९ साली मनसेने हा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावला होता.