नांदेडमध्ये भोकर येथील पोलीस मित्राच्या घरी जेवणाचा कार्यक्रम उरकून नांदेडकडे परत येत होते. त्याचवेळी पोलीस कर्मचार्‍याच्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात २ पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत याशिवाय इतर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (९ जानेवारी) रात्री उशिरा भोकर रस्त्यावरील खरबी येथे घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी सुनील सांभाळकर यांच्या भोकर येथील घरी रविवारी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी दीपक देवानंद जाधव, ईश्‍वर सुदाम राठोड, प्रितेश ईटळगावकर आणि सदानंद सपकाळ हे चौघेजण गेले होते.

पोलिसांच्या कारची उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून धडक

कार्यक्रम आटोपल्यानंतर हे सर्व चारचाकी वाहनाने (क्र.एम. एच. २६ व्ही. १८६८) परत येत होते. त्याचवेळी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांची कार भोकर-नांदेड महामार्गावर खरबी शिवारात उभा असलेला ऊसाच्या ट्रॉलीला (एम.एच. २६ ए.आर. ११५६) मागून धडकली.

या अपघातात ईश्‍वर राठोड आणि दीपक जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर सदानंद सपकाळ, प्रितेश ईटळगावकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना नांदेड येथे एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हेही वाचा : हिंगोली जिल्ह्यात खासगी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू,२४ जखमी

भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत कांबळे, जमादार हनुवते आणि राजेश दुथडे हे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचल्यानंतर जखमींना नागरिकांच्या मदतीने नांदेड येथे हलवण्यात आले. मृत झालेल्या दोघांचे मृतदेह भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले. या प्रकरणी पुढील कारवाई भोकर पोलीस करीत आहेत.