रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा ब्रिजवर पहाटे २ वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरमधील एकूण २२ प्रवाशांपैकी १४ प्रवासी जखमी झाले आहेत. कोकणातून मुंबईचा परतीचा प्रवास करताना हा अपघात झाला आहे.
टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच ४३ बीपी ०७५६) खेडवरून मुंबई सांताक्रूझकडे जात होती. त्यावेळी पेण हमरापूर ब्रीजवरील बंद पडलेल्या कॉईल ट्रेलरला (एमएच ४६ एआर ००७४) मागून धडक दिल्याने अपघात घडला.
हेही वाचा : सूर्या नदीवरील पुलावर झालेल्या अपघाताचं गूढ जर्मनीत उलगडणार? पालघर पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
सर्व अपघातग्रस्तांना सामाजिक कार्यकर्ते कल्पेश ठाकूर यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतून तत्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.