पुणे-सातारा महामार्गावर गुरूवारी झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील चार तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. हे सर्वजण शिरवळ येथून पुण्याकडे परतत होते. त्याचवेळी साताऱ्याच्या हद्दीतीत वडाप येथे त्यांची जीप सिमेंटच्या कठड्याला धडकल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात जीपमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण भोर तालुक्यातील चारोळा या गावातील रहिवासी होते. या अपघाताचे नेमके कारण अद्यापही समजू शकले नसले तरी पोलिसांकडून या सगळ्याचा तपास सुरू आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 03-03-2016 at 08:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major accident on mumbai satara national highway