क्विंटलला आधी सोळा हजार, आता साडेअकरा हजार रुपये!
आहारातील आत्यंतिक गरजेच्या तूरडाळीने गेल्या आठवडय़ात गाठलेली उच्चांकी दरपातळी या आठवडय़ात घसरू लागल्याने सर्वसामान्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे. सोमवारी बाजारात सर्वच डाळींच्या भावात मोठी घसरण झाली. क्विंटलला सोळा हजार रुपयांपर्यंत सर्वोच्च भावापर्यंत गेलेल्या तूरडाळीचे दर शनिवारी अडीच हजारांनी, तर सोमवारी दोन हजार रुपयांनी खाली आले. या डाळीचा ठोक भाव २१५ वरून १८० रुपये, तर किरकोळीचा भाव २३५ वरून २०० रुपयांपर्यंत उतरला. डाळींच्या साठवणूकविषयक धोरणात्मक बदल केंद्र सरकारने दिलेला आदेश, तसेच मध्य प्रदेश सरकारने हा बदल पहिल्यांदा लागू केल्यामुळे बाजारपेठेतील कृत्रिम भाववाढ थांबण्यास मदत झाली आहे. बाजारपेठेत माल नसताना अचानक भाववाढ केली जात होती. कृत्रिम भाववाढीला आळा घालण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केल्याने बाजार चांगलाच हलला व भाववाढीची सूज ओसरू लागली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा