वसईत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भामटपाडा पुलाजवळ पेंढा वाहून नेणाऱ्या वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. शुक्रवारी (२८ जानेवारी) संध्याकाळी ८ च्या सुमारास हा प्रकार घडला. स्थानिक ग्रामस्थ व अग्निशमन दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आली आहे.
जनावरांना लागणारा चारा म्हणून लागणारा पेंढा भाताणे येथे भरुन भालिवली मार्ग येत असताना अचानक आग लागली. महामार्गावर पाठीमागून येणाऱ्या दुचाकी स्वाराने आग लागल्याची माहिती चालकाला दिली. तेव्हा भामटपाडा पुलाजवळ गाडी बाजूला घेण्यात आली. याची माहिती नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना देताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविले.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : VIDEO: मध्य प्रदेशमध्ये उधमपूर-दुर्ग एक्स्प्रेसला आग, प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं
सुरुवातीला अग्निशमनची गाडी दाखल होईपर्यंत भामटपाडा ग्रामंस्थानी एका दुकानातून पाईप घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. भालीवली येथे विद्युत वाहक तारा लागल्याने ही आग लागली होती. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, जनावरांना लागणारा चारा जळून खाक झाला आहे.