सांगलीच्या कवठे-एकंद येथे सोमवारी संध्याकाळी शोभेची दारू बनविणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. सांगली-तासगाव महामार्गवर असणाऱ्या ईगल कंपनीत ही घटना घडली. याठिकाणी शोभेची दारू बनवणारे अनेक कारखाने आहेत. या स्फोटात आत्तापर्यंत पाच कामगारांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान मृतांची आणि जखमींची संख्या वाढण्याची भीती प्रशासनातर्फे वर्तविण्यात आली आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अग्निशामन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र, आगीची तीव्रता पाहता आता सांगली आणि तासगाव येथील अग्निशामन दलालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

Story img Loader