Aaditya Thackeray : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे विधानसभा निवडणुकीत २० आमदार जिंकून आले आहेत. तर, संपूर्ण महाविकास आघाडीत केवळ ५६ आमदार जिंकले आहेत. आता थोड्या दिवसांनी राज्यात नवं सरकार स्थापन होईल. तत्पुर्वी उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी सोपविली आहे. याबाबत आज विजयी आमदारांची मातोश्री येथे बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

“विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसह आज बैठक झाली. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. विधिमंडळ पक्षाची ही बैठक होती. यात विधानसभेचे नवनिर्वाचित सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. विधानसभेच्या शिवसेना गटनेतेपदी भास्कर जाधव यांची निवड सर्वानुमते केली आहे. प्रतोद म्हणून सुनीलप्रभू यांची नियुक्ती केली. तर, दोन्ही विधिमंडळ (विधानसभा आणि विधान परिषद) संयुक्त गटनेता म्हणून आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे”, अशी माहिती अंबादास दानवे यांनी केली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

raj thackeray maharashtra vidhan sabha election 2024 (1)
Raj Thackeray: “निकालांनंतर महाराष्ट्रात सरप्राईज मिळतील”, राज ठाकरेंचं सूचक विधान; नेमकं राज्यात काय घडणार आहे?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Raj Thackeray
Raj Thackeray in Nashik : “निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो…”, प्रचारसभांना कंटाळून राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
sillod assembly constituency uddhav thackeray campaign for suresh bankar maharashtra assembly elections 2024
ठाकरेंची सत्तारांविरोधात भाजपला साद मतभेद असतील तर बोलू; पण आधी सिल्लोडमध्ये पराभव करण्याचे आवाहन
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला..”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान राहिले आहेत, कारण..”

हेही वाचा >> महायुतीचं अखेर ठरलं! देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री; एकनाथ शिंदे, अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद

विरोधी पक्षनेते पदावर काय म्हणाले अंबादास दानवे?

विरोधी पक्षाबाबत तिन्ही पक्ष एकत्र बैठक घेऊन निर्णय घेतील. सरकारच बनलं नाही, सराकारवर अजून कोणी दावा केला नाही. त्यामुळे सरकार बनल्यावर विरोधी पक्ष नेत्याविषयी चर्चा होईल, असं अंबादास दानवे म्हणाले.

हेही वाचा >> Prithviraj Chavan : विरोधी पक्षनेते पदावरून पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं विधान; म्हणाले, “विधानसभेत आम्हाला…”

गटनेते पद म्हणजे काय?

गटनेता हा निवडून आलेल्या सर्व आमदार आणि खासदारांचं नेतृत्व सभागृहात करत असतो. २०१९ मध्ये शिवसेनेच्या गटनेते पदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, शिवसेनेतील बंडानंतर शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांना गटनेता करण्यात आलं. त्यानतंर, आता ही जबाबदारी भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरेंवर सोपवण्यात आली आहे. निवडून आलेल्या सदस्यांची भूमिका एकच असावी, याकरता सर्वानुमते गटनेत्याची निवड केली जाते. या गटनेत्याकडे सर्वाधिकार दिले जातात. गटनेत्याकडून पक्षहितासाठी काही निर्णय घेतले जातात. परंतु, या निर्णयाविरोधात जर एखादा सदस्य गेला, तर त्याच्या निलंबनाची शिफारस सभागृह अध्यक्षांकडे केली जाते. गटनेत्याला सभागृहात अनन्यसाधारण महत्त्व असतं.