माळशेज घाटात कोसळलेला कडा दूर करण्यासाठी आणखी तीन दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग २२२ चे मुरबाड विभागाचे उपअभियंता प्रदीप दळवी यांनी दिली.
माळशेज घाटात दरड कोसळून दुर्घटना घडली होती. घाटात दरड कोसळल्याने कल्याण-नगर मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. या मार्गावरील शिळा हटवून रस्ता पूर्ववत करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, पावसामुळे रस्ता पूर्ववत होण्यासाठी अजून तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे, असे दळवी यांनी सांगितले. दरम्यान, आय.आर.बी. कंपनीच्या पथकाने या घाटामध्ये भेट देऊन दरडींची पाहणी केली.

Story img Loader